नवीन लेखन...

काच कांगऱ्या

आईची बांगडी वाढली की तिचे तुकडे करून एक खेळ खेळला होतो आम्ही एकाच रंगाचे चार तुकडे असे घेऊन चौघे जण हा खेळ खेळू शकतात. समोरासमोर बसून. फरशी वर खडूने एक आकृती काढली जाते. तेव्हा समोरासमोर प्रत्येकाचे एक घर असते. म्हणजे चौकटीत फूली मारलेली असते. तिथे आपल्या कांगऱ्या ठेवायच्या. आणि मध्यभागी एक घर असते. खेळाची अशी तयारी झाली की मग बहुतेक कवड्या दिल्या जात नसल्याने चिंचोका घेऊन ते दगडाने फोडून दोन चिंचोक्याचे चार भाग करून त्याचा डाव टाकायचा. उताणे पडतील तेवढे घर कांगरी पुढे सरकवायची. वाटेत दुसर्‍या कांगरीला मारुन किंवा कुणी आपल्या कांगरीला मारले की आपापल्या घरात जायचे. पुन्हा डाव सुरू. अनेक वार झेलत. अनेक वार करत आतल्या चौकटीत गेल्या वर मध्यभागी असलेल्या घरात चारही कांगऱ्या गेल्या की तो सुटला. शेवटी शेवटी दोघात चुरस असते. एक कायमच बाहेर राहतो. खूप छान वेळ जातो. घरात बसून. कसलेही खर्च नको..
खेळाचे नियम कुणीही मोडत नाही. भांडण नाही. घरात असल्याने घरचे लोक निर्धास्त. खेळ संपला की कांगऱ्या. चिंचोका. खडू एका डबीत आणि फरशी वरची चौकट फडक्याने पुसून टाकली की बस्स. आनंद आणि मजा हा फायदा. या वरुन मला सहजच वाटले की आपणही असेच आपल्या घरात राहतो. जीवनाची वाटचाल करताना अनेक प्रसंग असे येतात की कधी वार करावे लागतात तर कधी वार झेलावे लागतात. परिस्थितीचे वार अनेक प्रकारचे. प्रत्येक खेळ खूप काही शिकवून जातो. बघा ना आता चौघांची चार घरे. आणि शेवटी सगळ्यात मोठे घर यात फरक आहे तो असा विभक्त कुटुंब आणि एकत्र कुटुंब याची माहिती आहेच तुम्हाला.कधी कधी एकेक करुन जातात व दोघेच राहताता मग एकटेच रहावे लागते. त्यामुळे अशा वेळी रडायच नाही तर लढायचे असते . नियमानुसार वागले पाहिजे. जशी कांगरी जिला पूर्वी मारलेल असत पण ती त्याच्याच घरी गेल्यावर तर तिथे मारायचे नाही. वैरभाव ठेवू नये ही शिकवण. एकदा तरी एखाद्या कांगरीला मारुन तिला तिच्या घरी पाठवल्या शिवाय मोठ्या घरात जाण्याची परवानगी नसते. म्हणजे जिंकण्यासाठी लढावे लागते. मन मारुन धैर्याने. सगळे मोठ्या घरात एकत्र आले तर जास्त सुरक्षितता असते तसेच एकत्र कुटुंबात असते..
लॉकडाऊन मुळे घरातील सुरक्षितता आपण समजू शकलो. त्यामुळे आता ही हेच तत्व पाळू या. यात आणखी एक गोष्ट म्हणजे सगळ्यांना एकमेकांना समजून सांभाळून घेऊन आधार दिला जातो हे मधल्या मोठ्या घराची शिकवण आहे.. तेव्हा खेळ आणि त्यातून काय शिकायचे हे पाहिले पाहिजे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?

–सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..