नवीन लेखन...

जैसे ज्याचे कर्म तैसे

“त्याची आजची सकाळ झाली तीच मुळी खिचडीच्या “प्रसन्न” विचारांनी ..

आळस झटकून पायाखालचा लोड उचलत शेवटी तो उठला .. आज कामाचाही लोड जरा कमी होता .. त्यात कालपासून बाहेर मुसळधार पाऊस … भरीला आषाढी एकादशीची कृपा .. आज दुपारी साबुदाण्याची गरमागरम खिचडी असल्याची बायकोकडून खुशखबर .. सगळे योग कसे अगदी जुळून आले होते .. अजून काय पाहिजे होतं एका “अल्पसंतुष्ट” नवऱ्याला ..

सकाळी बायको जरा भाजी आणायला म्हणून निघाली .. “मी परत येईपर्यंत तुझं सगळं आवरून ठेव !!” केला इशारा जाता जाता .. पण धमकीवजा.. तरीही सवयीप्रमाणे पठ्ठ्या बसलाच मोबाईल खरवडत.. यावर्षी वारकऱ्यांचा आकडा नसेल इतके विठ्ठल दिसले फोनमध्ये.. “विठ्ठलासाठी स्टेटस” की “स्टेटससाठी विठ्ठल” तेच समजत नव्हतं ..

बघता बघता पटकन १५ मिनिटं गेली .. इतक्यात बायकोची “आकाशवाणी” आठवली .. टॉवेल खांद्यावर अडकवून हा आंघोळीला पळाला .. जाता जाता फ्रीजपाशी काहीतरी करायला गेला .. काम करून मागे वळला आणि .. धूडूप्पप् ..
टॉवेलचा धक्का लागून शेजारच्या ओट्यावरची छोटी बाटली खाली पडली..

खाद्य खोबरेल तेल होतं त्यात .. “तेल फार सांडलं , ओटा खराब झाला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील” असा आता मेंदूकडून इशारा आला .. भराभर आवरलं , तेल पुसलं, फडकं धुतलं .. वगैरे. ती यायच्या आत “जैसे थे” ..
सगळं कसं विक्रमी वेळात.. नशीब बलवत्तर म्हणून तेल फार वाया गेलं नव्हतं.. नाहीतर वास काही लपला नसता … पितळ उघडं पडलं असतं ..

हा एकदम वेळेत तयार होऊन बसला.. बायको आली पण तिच्या यातलं काहीच लक्षात आलं नाही .. बच गया साला !! .. गब्बरची गोळी न लागलेल्या शोलेतल्या कालियासारखे भाव ..

सगळ्या धामधूमीनंतर “न्यू नॉर्मल” झाल्यामुळे गडी स्वतःवरच खुश .. अखेर “वो घडी आ गई” मिल बैठेंगे तीन यार .. आप मै और साबूदाणा खिचडी .. मोठ्या उत्साहानी त्यानी मस्त वाफळणाऱ्या खिचडीचा पहिला घास खाल्ला ..
खाता खाता एकदम थांबलाच .. बाकी सगळं प्रमाण व्यवस्थित होतं पण तरी चव थोडी निराळीच होती .. कसला तरी “वेगळाच वास” येत होता.. घास पटकन घशाखाली उतरेना ..

त्याने काही प्रतिक्रिया द्यायच्या आत बायकोनीच विचारलं.. “कशी झालीये खिचडी ?? मस्त लागतेय ना ?? जरा वेगळा प्रयोग केलाय !!.. “हो हो .. अगदी मस्त !!”

नाही हे उत्तर देणं शक्यच नव्हतं.. तिच्या चेहऱ्यावरचा “आनंद आणि धाक” याचा संमिश्र परिणाम

“अरे ss … परवा एक रेसीपी बघितली !” “तुपाऐवजी खोबरेल तेलातली खिचडी !” “काय काय करायचं होतं म्हणून बऱ्याच दिवसांपूर्वी आणलंय ते खोबरेल तेल!” “पण या ना त्या कारणानी राहूनच जात होतं नेहमी”

“खरं तर परवा ती रेसिपी बघूनसुद्धा आज मी विसरलेच होते बरं !”…“पण फोडणी द्यायला गेले इतक्यात ती खोबरेल तेलाची बाटली अगदी पुढे दिसली !” “पांडुरंगानी संकेतच दिला जणू …. मग लगेचच घातलं !!”…

“केळ्याचे वेफर्स किंवा तळलेल्या गऱ्यांसारखा मस्त खमंग वास येतोय ना ??”

गब्बरच्या नकळत शेवटी दुसरी गोळी मात्र कालियाला लागलीच.. बाटली पुढे आणणारा पांडुरंग समोरच बसलाय हे त्या रखमाबाईना कसं सांगणार? सहन होत नाही आणि सांगताही येत नाही..

गुणगान गात , कौतुक करत संपवावी लागली .. “खोबरेल तेलातली खिचडी” .. भोगतोय आता .. काय करणार बिचारा ?..

“जैसे ज्याचे कर्म तैसे , फळ देतो रे ईश्वर !!”

— क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 56 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..