नवीन लेखन...

जहाज आणि डॉल्फिन

ज्युनियर इंजिनीयर असतांना एका दिवशी दुपारी जेवणानंतर मेन डेकवर मिडशीप क्रेनच्या सहाय्याने जहाजावरील चैन ब्लॉक आणि लिफ्टिंग इक्वीपमेंट टेस्टिंग साठी गेलो होतो. टेस्टिंग झाल्यांनातर पुन्हा इंजिन रूम जाऊन काम करण्याचा कंटाळा आला होता. मेन डेकवर बऱ्याच दिवसानंतर आलो होतो सकाळी उठल्यापासू केबिन मधून इंजिन रूम आणि इंजिन रूम मधून केबिन एवढंच, फक्त खाण्यापिण्याच्या वेळेत मेस रूम मध्ये थोडासा वेळ जायचा तेवढाच कारण काम आणि कामामुळे आलेला थकवा यामुळे इतर कुठेही जायची ताकद आणि त्यातल्या त्यात इच्छा पण नसायची. जवळपास सात ते आठ दिवसांनी मेन डेकवरील शुद्ध हवेत आलो होतो. चार ते साडेचार वाजले असतील थंडगार वारा सुटला होता जहाज ब्राझील जवळच्या समुद्रातून फुल स्पीड मध्ये पुढे पुढे जात होत. मिडशीप ला म्हणजेच जहाजाच्या बरोबर मध्यभागी होतो तरीपण जहाज वेगाने पाणी कापत पुढे जात असल्याने जहाजावर लाटा आदळून पाण्याचे तुषार वाऱ्यामुळे उडत उडत येऊन आमच्यापर्यंत पोचत होते. थंडगार वारा आणि त्यात पाण्याचे तुषार अंगावर पडत असल्याने खूप मजा येत होती. दहा बारा मिनिटे झाली होती मागे उडणारे तुषार आणि मागे पडत जाणारे पांढरे शुभ्र फेसाळणारे पाणी पाहून मन काहीकेल्या भरत नव्हते. कानावर शब्द आले अरे वो देखो डॉल्फिन है उधर आणि खरोखर डॉल्फिनची एक जोडी जहाजाच्या बाजूने पुढे पुढे येत होती. जहाजाच्या वेगाशी जणू काही त्या दोन्ही डॉल्फिन्सनी स्पर्धा लावली होती. जहाज फुल स्पीड मध्ये होते तरीपण डॉल्फिन पुढे पुढे निघत होते आम्ही सुद्धा डॉल्फिन्स जसे जसे पुढे जात होते तस तसे जहाजाच्या फोरकॅसलं म्हणजे पुढच्या भागापर्यंत सुरवातीला वेगाने चालू लागलो आणि नंतर नंतर अक्षरशः पळू लागलो. दोन्ही डॉल्फिन्स उड्या मारत मारत पुढे पुढे जात होते आम्ही जहाजाच्या पूर्ण टोकाला येऊन खाली वाकून पाहिलं तर एवढा वेळ दोन्ही डॉल्फिन्स जहाजाच्या बाजूने येत होते ते जहाजाच्या एकदम जवळ आले आणि जहाजाच्या एकदम पुढे येऊन बरोबर मध्यभागी येऊन उंच उंच उड्या मारत काही मिनिटे पुढे पुढे येत राहिले. जहाजाच्या मागून येऊन जहाजाला पाठीमागे सारून आणि जहाजाच्या बरोबर मध्यभागी येऊन उड्या मारून मारून दोन्ही डॉल्फिन्स आम्हाला दाखवत होते की बघा कसं हरवलं तुम्हाला. दोन्ही डॉल्फिन्स मग पुन्हा बाजूला जाऊन आणखी काही मिनिटे जहाजासोबत पुढे आले आणि काही वेळाने मागे फिरले मागे फिरल्यावर सुद्धा ते उड्या मारत मारतच जातांना दिसत होते. ते माघारी जात असताना त्यांना टाटा बाय बाय करण्यासाठी आमचे हात वर जाऊन हालतच राहिले होते.

मांडव्याच्या किनाऱ्यावर लाँच मधून आणि श्रीवर्धनला मच्छी बोट मध्ये फिरायला गेलो असताना गादा माश्याला समुद्रात वर खाली करताना पहिले होते त्यावेळी हे डॉल्फिन आहेत असे सांगितले जायचे. जहाज जॉईन केल्यापासून प्रत्यक्षात पहिल्यांदाच डॉल्फिन्स ना पहिले होते. त्या जोडीमध्ये एक नर आणि एक मादी होती का कोण जाणे पण ब्राझीलच्या समुद्रात पाहिलेल्या एकमेव जोडीनंतर मला डॉल्फिन्स कधीही एकटे दुकटे किंवा इव्हन जोडीनेसुद्धा दिसले नाहीत.
भूमध्य समुद्र आणि काळा समुद्रात खूप वेळा डॉल्फिन्स दिसायचे पण ते झुंडीने यायचे आणि झुंडीने माघारी फिरायचे.
गल्लीतले कुत्रे कसे कोणी अनोळखी आला की एकत्र येऊन भुंकतात त्याच्यावर.

कुत्रेच ते आणि असे कुत्रे भुंकणारच.

डॉल्फिनसारखा मिश्किल समुद्री जीव पाहिल्यावर अस वाटायचं की जहाज जेव्हा जेव्हा अनोळखीपणे एखाद्या डॉल्फिन्स असलेल्या भागातून जात असते तेव्हा त्या भागातील सर्व डॉल्फिन्स एकत्र येतात आणि पाहुण्याचे स्वागत केल्यागत आमचं जहाज जोपर्यंत त्यांच्या भागातून बाहेर पडत नाही तोपर्यंत डुबक्या मारत मारत जहाजाचा वेगासोबत रमत गमत सफर करतात. त्यांचा भाग संपला की पुन्हा उलटे फिरतात आणि रमत गमत तसेच उड्या मारत मागे फिरतात.
दुबुक दुबुक करत उड्या मारत मारत आपआपल्या कुटुंब कबिल्यासह जेव्हा हे शेकडो डॉल्फिन काही वेळ जहाजासोबत सफर करतात तेव्हा स्वतःच्या कुटुंबापासून दूर असून देखील असे थोडेफार का होईना पण आनंददायी क्षण प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेत कितीतरी वेळा.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनीयर
कोन भिवंडी ठाणे

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..