नवीन लेखन...

इतिहासातली मुंबई – एस्प्लनेड हाऊस

 

“२९, एस्प्लनेड हाऊस, हजारीमल सोमाणी मार्ग, फोर्ट, मुंबई -१…”

वरील पत्त्यावरून आपणापैकी अनेकांनी अनेक वेळा प्रवास केला असेल..विशेषत: नरिमन पाॅईंटला कामाला जाणारे आणि मध्य रेल्वेवर राहाणारे हजारो मुंबईकर या पत्त्यावरून दररोज प्रवास करत असतातच..त्यापैकी क्वचित कोणाचं या राजमहालासारख्या दिसणाऱ्या खानदानी वास्तूकडे लक्षही गेलं असेल परंतू या वास्तूचा मालक कोण याची चवकशी त्यांनी केली असेल का याची मात्र मला शंकाच येते..मालक कोण याबाबतीत कदाचीत कुणाचं कुतूहल चाळवलंही गेलं असेल मात्र आपणं मुंबईकरांच्या ट्रेनच्या टाईम टेबलशी घट्ट जखडलेल्या रोजमर्राच्या आयुष्यात ते शमवणं शक्यही होत नसावं हे ही खरंच..!

असो. हे घर आहे हिन्दूस्थानच्या उद्योग विश्वाचे पितामह व ‘टाटा उद्योग समुहा’चे संस्थापक जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांचं..! जमशेटजी टाटांनी १८८५ मध्ये हे तीन मजली राजेशाही घार बांधायला सुरूवात करून १८८७ मध्ये या घरात ते राहायला गेले.. म्हणजे आत्ता घराचं १३०वं वर्ष सुरू आहे..तत्कालीन व्हि.टी. स्टेशन या नंतर एक वर्षाने म्हणजे १८८८ मध्ये पूर्ण झालं..गम्मत म्हणजे व्हि.टी. स्टेशन बांधतांना जे दगड स्टेशनच्या बांधकामास योग्य वाटले नाहीत त्या बाजूला काढलेल्या दगडातून जमशेटजींचे आर्किटेक्ट मि. माॅरीस यांनी टाटांची ‘एस्प्लनेड हाऊस’ ही वास्तू उभारली..! १९३० सालापर्यंत ही वास्तू टाटांकडे होती व त्यानंतर ती ‘आरडी सेठना स्काॅलरशीप फंड’ व्यवस्थपनाकडे ट्रान्सफर करण्यात आली..

हायकोर्ट-फ्लोरा फाऊंटनवरून आपण सिएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो की हमरस्त्याला दोन फाटे फुटतात..एक फाटा किंचित उजवीकडे वळून समोर थेट सिएसटी स्टेशनच्या दिशेने जातो तो ‘डॅा. डि.एन. रोड’..तर दुसरा फाटा अगदी आपल्या नाकासमोर जातो तो ‘एम.जी. (महात्मा गांधी) रोड’..या एम.जी.रोडवरून सरळ चालत गेलं की पहिल्याच क्राॅसिंगला उजव्या हाताला ‘अलेक्झांड्रा हायस्कूल’ लागतं..इथूनच एम.जी रोडला किंचीत उजवी टांग मारून समोर जाणारा एक रस्ता दिसतो हा ‘हजारीमल सोमाणी मार्ग..’. हा रस्ता पुढे ‘बाॅम्बे जिमखान्या’वरून सिएसटी स्टेशनच्या दिशेने जातो..या हजारीमल सोमाणी मार्गावर उजव्या हाताच्या अलेक्झांड्रा हायस्कूलला अगदी लागून आपलं ‘२९, एस्प्लनेड हाऊस’ आपली भारदस्त छाप पाहणाऱ्याच्या मनावर सोडत उभं असलेलं आपल्याला अगदी सहज दिसेल..

या वास्तूचं वैशिष्ट्यवर्णन मी इथं करणार नाही..त्याची अनेकानेक वर्णनं इंटरनेटवर उपलब्ध आहेत ती आपण जरूर वाचावीत..परंतू आपल्यापैकी जर कोणी काम-धंद्यानिमित्ताने या रस्त्यावरून नेहमी किंवा काही वेळ जात-येत असाल, तर इथं किंचित काळ थांबून या पवित्र वास्तूचे दर्शन घेतल्याशिवाय पुढं जाऊ नका अशी विनंती मात्र आग्रहाने करेन..

खरंतर टाटांचं हे ‘एस्प्लनेड हाऊस’ बघाव ते सायंकाळी दिवेलागणीच्या सुमारास..मला तरी दिव्यांच्या सोनेरी मंद प्रकाशात उजळलेलं ‘एस्प्लनेड हाऊस’चं संप्रकाशात घेतलेलं दर्शन नेहमी एखाद्या पुरातन, पावन, मंदीरासारखं वाटत आलं आहे..

जाता जाता-

याच हजारीमल सोमाणी मार्गावरून सिएसटी स्टेशनच्या दिशेने जाताना पुढे ‘डाॅईश बॅंके’ची युरोपियन शैलीत बांधलेली आणि पांढऱ्या शुभ्र रंगात नटलेली एक इमारत दिसेल..ही इमारत जमशेटजी टांटांचे द्वितीय पुत्र सर रतन टाटा यांचे निवासस्थान..या वास्तूचंही दर्शन अवश्य घ्यावं..या वास्तूची भव्यता अनुभवायची असेल तर ही वास्तू थोडं दूर जाऊन आझाद मैदानातून बघावी..

आणखी एक, टांटांच्या ‘एस्प्लनेड हाऊस’ समोरील रस्त्यानेच मुंबईतली दुसरी व ‘एका भारतीया’च्या मालकीची देशातील पहिली मोटर कार धावली..साल होतं १९०१ आणि त्या गाडीचे मालक होते, अर्थातच जमशेटजी टाटा..!!

-गणेश साळुंखे
9321811091

मोटरकार संदर्भ – पुस्तक ‘स्थल-काल’, लेखक श्री. अरूण टिकेकर, सन २००४.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..