परिचय एका पुस्तकाचा

‘साहित्यात बराचसा मान मचकुरापेक्षा माथ्ल्यामुळे मिळतो हे ध्यानात येई पर्यंत पन्नाशी आली .’ या सुरवातीच्या वाक्याने जी मनाची पकड घेतली ते ‘इत्यलम’ या शेवटच्या शब्दा पर्यंत. मुकुंदराजाच्या विवेकसिंधू पासून ते शाहिरांच्या लावण्यापर्यंतचा इतिहासाचे हे अजोड विडंबन! एक छोटेखाननी पुस्तक .फक्त शहात्तर पानांचं !विडंबन हे विनोदाच व्रात्य तरी लाडक आपत्य,याची प्रचीती देणार.

अनेक ग्रंथांचा जाहीर थोरपणा आणि अंगभूत मेद्व्रधी’ पाहून थक्क झालेल्या लेखक महाशयांनी, त्यातील चरबी वितळवून उरलेल्या वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याचा केलेला खटाटोप, हा या पुस्तकाचा आवाका !

महाराष्ट्रात मराठी का बोलतात ? याला मस्त उत्तर दिले आहे ‘आता मराठी बोलण्याचे मुख्य कारण इथल्या लोकांना एवढी एकच भाषा येते हे ! मुसलमानांनी उर्दू शिकवण्याचा प्रयत्न केला व तोबा -तोबा करत परत गेले .विशेषतः मिरज आणि सावंतवाडी येथील मुसलमानांचे उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि बऱ्हाणपुरी प्राण सोडला असे म्हणतात . पुढे मराठे दिल्लीवर चालून गेले आणि पेशव्यांचे वकील दबारात आणि वकिलीणबाई करोलबागेत उर्दू बोलायला लागल्यावर “हल्ला चालेल पण उर्दू आवर ” आश्या मागण्या आल्या ………….पुढे इंग्रजाने आपली भाषा शिकवण्याचा निकाऱ्याचा प्रयत्न केला .दीडशेवर्ष अव्याहत परीश्रामानंतार देखील -ब्याट-ब्यांक-ब्याडमिटण -गुडह्याबिटस -य्यांड-ब्याड ह्याबिट्स वगैरे ऐकून ,महाराष्ट्र मराठी लोकांवर सोपवून स्वतःची इंग्रजी सुधारण्यासाठी मायदेशी परतला .(मायदेशयातील ‘माय’हा मराठी का इंग्रजी याबद्दल मात्र येथे वाद चालू आहे) ‘

हि फटकेबाजी अशीच चालू राहते .मुकुंदराज ,त्यांचा वीवेकसिंधू,हेमाडपंत व त्यांची मोडीलिपी ,करत गाडी श्रीचक्रधर आणि महानुभाव पंथा पर्यंत पोहोन्चते.

‘महानुभाव पंथाचा मुख्य फायदा मराठीच्या प्राध्यापकांना झाला .ह्या पंथाची स्थापना करणारे श्रीचक्रधरस्वामिना त्रिकालज्ञान होते .त्यामुळे मराठी ऑनर्सची सोय त्यांनी आठशे वर्ष्यापूर्वीच करून ठेवली ‘हि टिपण्णी मजा आणते.

तेराव्या शतकातील ग्रंथकारांचे त्रोटक परिचयातील एक धम्माल परिचय -‘सजन कसाई -जनातेसाठी रक्त सांडणारा आद्य मराठी लेखक ,यांच्या साहित्याला आगळी धार होती .सजन कसायाइतका दुसऱ्या कुठल्याही कवीचा मास -contact नव्हता .’

पुढे एकनाथांची बुद्धी फार तीव्र होती म्हणे पण ‘गणित कच्चे होते .हिशोबठीशोब करायला वेळ लागायचा . एक पैशाची चूक शोधून काढायला एक रात्रीचा ओव्हर टाइम करावा लागला.—.हेडक्लार्क तरी किती सांभाळून घेणार ?’

दासोपंतांचे कौतुक तर अफलातून आहे.-‘दासोपंतानी एकंदर सव्वालक्ष पदे लिहिली. त्यांना रोज दोन पैश्यांची शाई लागत असे म्हणे. पंधराव्या शतकात दुध पैशाला तीन शेर होते,दारात म्हैस आणलीतर दोन शेर .जिथे दुध पैशाला दोन तीन शेर होते ,तेथे दोन पैश्याला गघाळभर शाई निश्चित .दासोपंताचे सकाळी भरलेले गघाळ संध्याकाळी रिकामे होई.नौकाराला ढब्बू पैसा देवून लगेच शाईच्या पुड्या आणायला पिटाळत.असला गघाळ -गघाळ श्याया वापरणारा शायर त्यानंतर झाला नाही.’

एक भन्नाट मास्टर पिस, तुकाराम आणि रामदास यांची तुलना -‘वास्तविक मुक्तेश्वर,तुकाराम आणि रामदास ह्या तिघांनी मिळून “ज्ञानेश्वर ते रामदास” हा कार्यक्रम केला असतातर हाउसफुल गेला असता .पण त्या काळी आजच्या सारखी त्रीकुटे नव्हती. शिवाय रामदासाची शिवाजी महाराजांशी जरा अधिक ओळख असल्यामुळे ते नेहमी हिल स्टेशनवर राहत. ह्या (तुकाराम आणि रामदास ) दोघांचे काही मौलिक मतभेद होते. तुकोबा “भिक्षा पात्रअवलंबणे |जळो जिणे लाजीरवाणे|” म्हणायचे तर रामदासांनी “ब्राम्हणाची मुख्य दीक्षा | मागितली पाहिजे भिक्षा |ओम भवती ह्या पक्षा| रक्षिले पाहिजे |” असे भडाभडा म्हणून टाकले होते.म्हणजे दोघांचे पक्षनिष्ठ मतभेद होते.तुकारामबुवाना पंढरपूरचा थेसिस मान्य होता तर रामदासाचा रामभक्ती मुळे नासिक प्रबंधावर भर !………………बाकी तुकाराम आणि रामदास दोघेही प्रपंचात फेल गेलेले असले तरी एकाने “प्रपंच करावा नेटका “म्हटले आहे आणि तुकोबांनी “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ” म्हटले आहे.साहित्य आणि साहित्यिकाचे खाजगी जीवन ह्यांचा काडीमात्र सम्बन्ध नसतो हे यावरून सिद्ध होते .’ असले विवंचन तुम्हास कोठेच सापडणार नाही !आता एक टेल पीस !. श्री कृष्णचा परिचय . हुज हु मध्ये ‘वाय ‘ मध्ये सापडेल म्हणे तो असा ‘-यादव श्रीकृष्ण वासुदेव -जन्म मथुरा.बालपण पहिल्या दिवसा पासून गोकुळ.बालपणी मुरलीवादक म्हणून प्रसिद्ध.डेअरी फार्मिगचे प्राथमिक शिक्षण.पुढे सांदिपनी विद्यालयातून एस .एस .सी ..त्या नंतर राजकारणात प्रवेश.कंस, चाणूर ,वगैरेचा पराभव.भारतीय युद्धात प्रथम मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफिय्रस मधून पाण्डवातर्फे कौरावाकडे अम्ब्यासीडर .तिथे वाटाघाटी फिस्कटल्यानंतर प्रत्यक्ष आर्मी जॉईन.
ट्रान्सपोर्ट खात्यात सारथ्याच्या हुद्यावर नेमणूक.’ कृष्णाची अशी ओळख ! धन्य झालो.

वाचनाची हि वावटळ थांबते तेव्हा मन पिसा सारखे डुलत डुलत ,मंद हेलकावे खात भूतलावर म्हणजेच भानावर येते.१९६७मध्ये प्रसिद्ध झालेले हे लिखाण आजही आनंददायी ,आणि मन प्रसन्न करणारे वाटते.अमरत्व अमरत्व ते या हून काय निराळे असते!

एव्हाना तुम्ही पुस्तकाचे व लेखकाचे नाव ओळखलेच असेल.’मराठी वाङ्मयाचा (गाळीव ) इतिहास ‘ पु .ल. देशपांडे .

— सु र कुलकर्णी

या पुस्तक परिचयाचा माझा प्रयत्न कसा वाटला ? आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .

About सुरेश कुलकर्णी 100 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…