नवीन लेखन...

म्युच्युअल फंड

I Am Mutual Fund

नमस्कार… मी म्युच्युअल फंड बोलतोय…..

खूप वर्षांपासून तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती. खरं तर तुमच्यावर खुप अारोप करायचेत, तक्रार करायचीय जमलंच तर हक्कानं रुसुनही बसायचंय, पण हे सगळं नेमकं कधी करावं हेच कळत नव्हतं. काय अाहे ना कि, अापण जो पर्यंत स्वत:ला सिद्ध करत नाही, तो पर्यंत कुणी अापल्याला हिंग लावुन विचारत नाही हेच खरं…. अाता शेअरबाजार सर्वोच्च स्थानी गेला अाहे, म्हटलं हिच योग्य वेळ अाहे हे सर्व बोलण्याची

प्रथम मी माझा अल्पसा परिचय परत एकदा करुन देतो. माझा जन्म १९६४ साली संसदेत झाला, १९८७ सालापासुन मी वयात अालो, १९९५ पासुन मी कर्तत्व गाजवायला सुरुवात केली. अाज माझ्या ताफ्यात ४५ कंपन्या अाणि ३००,००० च्या अासपास स्किम्स अाहेत. SIP, Daily- Weekly-Monthly STP, Lumpsum Investment करण्यासारखी वेगवेगळी अायुधं अाहेत. छत्रपति शिवाजी महाराजांचा अादर्श घेत गनिमी काव्याचा वापर करुन मी महागाईशी झालेल्या अनेक लढाया अाजपर्यंत जिंकल्यात. माझा परतावा नेहमीच “करमुक्त” होता. मी गेल्या २०-२५ वर्षापासुन स्वत:ला सिद्ध करत अालोय. पण तुमचा जीव त्या पीपीएफ आणि फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये अडकुन बसला. मी मानतो कि, पीपीएफ कंम्पाऊंडिंग पद्धतीने व्याज देतो, पण कंम्पाऊंडिंगमध्ये मी “बाहुबली” अाहे, माझ्या SIP चा मुकाबला तर कुणीही करु शकत नाही पण तुम्ही PPF च्या मोहात अडकुन मला विसरलात, चक्क दुर्लक्ष केलंत माझ्याकडे…….. “जरा इतिहासाची पाने उलटून बघा, तुमच्या लक्षात येईल कि , पीपीएफ माझ्यासमोर किती छोटा बच्चु अाहे ते…_

पुरावाच द्यायचा झाला तर गेल्या १५ वर्षात दरवर्षी १ लाख रु तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवले असतील, तर ते अाता ३५ लाख असतील पण तेच माझ्यात गुंतवले असते तर १.३२ करोड असले असते, पण तुमच्या डोळ्यावर पीपीएफच्या “फिक्स”ची पट्टी बांधलेली. घोडा भरकटु नये म्हणुन दोन्ही डोळ्यांच्या कडेला धातुचे अावरण बांधले जाते तसंच तुम्ही स्वत:ला करुन घेतलंत, माझं तर काहीच अडलं नाही पण शेवटी नुकसान कुणाचं झालं? तुमचंच ना!!

तीच गोष्ट बँक एफडी ची..सर्वांना या एफडीने वेड लावलंय. एखाद्या चेटकीणीने सुंदर स्त्रीचं रुप घ्यावं आणि माणसांनी भुरळुन घरातील घरदांज, खानदानी पत्नीचा कसलाही विचार न करता तिच्या भ्रामक सौदर्यांला बळी पडावं तसं झालं तुमचं या एफडीच्या बाबतीत.. अाता हळुहळु तिचा मेकअप उतरतो अाहे तिचं खरं रुप दिसत अाहे, व्याजदर खाली येता अाहेत म्हणुन तुम्ही निदान अाता माझ्या डेट फंडाकडे बघतायत तरी.. पण इतके दिवस तिला पटवण्यासाठी , कर वाचवण्यासाठी काय काय नाटकं केलीत ते अाठवा ना जरा……फाॅर्म १५ जी/ १५ एच काय…….. !! एकाच बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखात एफडी करणं काय…….!! एफडी मॅच्युअर्ड झाली कि परत त्याची रिन्युअल काय…जास्त व्याज मिळवण्याच्या चक्करमध्ये कुठं पतसंस्थेत जावुन एफडी कर, तर कुठं चक्क मल्टीलेवल चेन मध्ये जावुन गुंतवणुक करुन कपाळ भिंतीवर अादळुन घेतलंत..पण शेवटी काय झालं….एवढं सगळं करण्यापेक्षा थोडं माझ्याकडे प्रेमाने बघीतलं असतं तर या सर्वांची उत्तर “डेट फंडात” सापङली असती. कर वाचला असता, पांढरा पैसा पांढराच राहिला असता अाणि तुमचा पैसा घेवुन कुणी पळुन गेल नसतं.

तिच गोष्ट “रियल इस्टेटची”……… खुप भाव दिला हो तुम्ही त्याला. कुठलाही पारदर्शक व्यवहार नाही, सगळाच अडामधडाम व्यवहार केलात. माझ्या सुशिक्षित सल्लागारापेक्षा “रियल इस्टेटचा” अडाणी दलाल तुम्हाला जवळचा वाटला. बिनीच्या गोलंदाजाने जीव तोडून गोलंदाजी करावी, फलंदाजाला त्रिफळाचीत करावं पण एवढं करुनही अम्पायरने त्याच्यावर विनाकारण डूख धरत तो नोबाॅल देत त्याला नाॅट अाऊट द्यावा, हे तुम्हाला खरोखरच अन्यायकारक अाहे असं वाटत असेल तर थोडं थांबा.. तुमच्याकडूनही असाच माझ्यावर अन्याय झाला कि नाही!!!!

हो…निदान इतिहास तरी हेच सांगतोय. अाज मी पूर्ण तयारीनेच तुमच्याकडे आलोय, माझ्याकडे आता काही फंडाचा मागिल २० वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षाचा इतिहास उपलब्ध अाहे.

अगदी शानदार, पारदर्शक करमुक्त २०% च्या ही पुढे परतावा देवुनही गुंतवणुकीसाठी तुम्ही “रियल इस्टेट”चे लाड केले व मला पुर्णपणे अजुनही स्विकारलं नाही असा माझा अारोप अाहे अाणि माझ्या इक्विटी फंडाची कामगिरी पाहता तो खरा अाहे हे तुम्हाला नक्कीच पटेल. किमान यापुढे तरी तुम्ही त्यांची दखल घेवुन त्यांना प्रथम प्राधान्य देताल ही माझी अपेक्षा नक्कीच गैरवाजवी म्हणता येणार नाही.

खाली अनुक्रमे फंडाचे नाव, त्यांचे वय व परतावा (दर साल दर शेकडा, कंम्पाऊंड म्हणजेच चक्रवाढ दराने, बरं का) दिलेला अाहे.

Hdfc Taxsaver 20.81 29.23%

Hdfc Equity Fund 22.26 25.51%

Reliance Growth 21.49 25.30%

Franklin Ind Prima 23.35 24.79%

Franklin Ind Bluechip 23.35 24.48%

Birla Balanced 95 22.15 23.62%

Hdfc Prudence 23.18 22.25%

Tata Ind Taxsaving 21.01 21.92%

Reliance Vision 21.49 21.38%

Hdfc Top 200 fund 20.56 21.33%

Sbi Magnum Taxgain 24.02 20.64%

Hdfc Capital Builder 23.18 20.55%

अाज मी स्वत:ला सिद्ध केलंय..

इतके स्वच्छ, इतक्या पारदर्शकपणे तुम्ही रियल इस्टेटचे रिटर्न्स पाहु शकतो का ? केवळ एक चेक देवुन गुंतवणुक करु शकतो का? दर महिन्याला गुंतवणुक करु शकतो का? दररोज त्याचे बदलते मुल्य पाहु शकतो का? जितके असतील तितके पैसे गुंतवू शकतो का? अंशत: रक्कम परत घेवू शकतो का ?विकुन 3 ते 5 दिवसात पैसे परत मिळवु शकतो का?

याचं उत्तर जर “नाही” असं असेल, तर यानंतर अापण अापली जास्तीत जास्त गुंतवणुक माझ्या इक्विटी फंडात केली पाहिजे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..