नवीन लेखन...

हिमोग्लोबिन कसे वाढवायचे

How to Increase Hemoglobin

हिमोग्लोबिन कसे वाढवायचे हे येथे सांगितले आहे.

मुख्य आहार हा सर्व ६ चवीनी युक्त हा आनंदीमनाने, अगदी मनापासून प्रार्थना म्हणून जेवणाला सुरवात करा.

आहळीवाची खिरेचा वापर करणे.खजूरातील बि काढून त्यामध्ये घट्ट तुप भरून तो खाणे.बिट,गाजर खाण्यात ठेवणे.लाल रंगाची फळे जसे की कलिंगण,करंवद वगैरेसारखी फळे खाणे.लाल रंगाचे कपडे वापरल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदतच होते.

स्त्रियांच्या बाबतीत शतावरी कल्प/शतावरीधृताचा वापर वैद्दयांच्या सल्ल्यांने करणे.पान (विडा)खाणे.राजगिरा खाणे (लाडू,चिक्की.लाहया) रव्याची लापशी गुळ घालून खाणे. आपली गावातील उकडया तांदळाची पेज मस्तपैकी साजूक तूप घालून खाणे.

हिमोग्लोबिन वाढविणारे बहुतेक पदार्थांमुळे शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून साजुक तूपाचा हात सोडून वापर करणे.

तुम्ही जर ताजा नुकताच काढलेला पालक वापरू शकत असाल तर पालकाचे मीरी,लिंबू वगैरे घालून मस्तपैकी सुप बनवून पिऊ शकता.पण पालक अगदी फ्रेश हवा.तडक्याचा पण वापर करून वरून फोडणी देणे.

पाणी पिताना लोखंडी तडका मस्त गरम करून प्यावयाच्या भांडयात बुडविणे व असे पाणी पिणे.चपात्या/भाक-या नॉनस्टिक तव्यावर न भाजता लोखंडी तव्यावर भाजणे.

आंबट भाज्या सोडून इतर सर्व भाज्या लोखंडी कढईतच करण्याचा अट्टाहास धरणे.

गाजर+बिट ज्युस,काळया मनुका आदल्यारात्री पाण्यात भिजवुन दुस-या दिवशी खाणे आणि हे सर्व आपल्या पचनसंस्थेचा सारासार विचार करुन आणि कसलेच tension करायचे नाही.कारण आवडीने व मनापासून खाल्लेत तरच तुम्हांला चांगला result मिळणार. नाचणी सत्व /नाचणीची आंबिल खाऊ शकता. डाळिंबपण चांगले असते आणि जेवण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यत (7 च्या आत घरात) करा. झोपण्याच्या वेळा पाळा,कपालभांतिसारखे प्राणायाम,योग करा, आणि नेहमी tension free रहा.व तंदूरूस्त रहा.

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

3 Comments on हिमोग्लोबिन कसे वाढवायचे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..