नवीन लेखन...

हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक

प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला आणि शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.

शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शाहू मोडक अद्वितीय व्यक्तिमत्व होते शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत मा.शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत मा.शांता हुबळीकर होत्या. शाहू मोडक यांची नायकाच्या भूमिकेकरिता निवड झाली तेव्हा ते पीळदार शरीरयष्टीचे नव्हते. रोजचा व्यायाम आणि खुराकानं त्यांची तब्येत मजबूत झाली तेव्हाच चित्रीकरणाला सुरवात झाली. अतिशय सात्त्विक भूमिका साकारणाऱ्या शाहू मोडक यांची प्रत्यक्ष जीवनातील भूमिकाही तेवढीच तेजस्वी होती. रुपेरी पडद्यावर तर शाहूरावांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेच.

माणूस, औट घटकेचा राजा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी महेता, झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वरांची मानसिक अवस्था शाहू मोडकां यांच्या मध्ये सहजगत्या होती, म्हणून तितक्याच सहजतेने या दोन्ही भूमिका ते साकारू शकले. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत असत. शाहू मोडक यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता. निर्मात्यांना चित्रपटाच्या शुभारंभासाठी व चित्रिकरणाचे महुर्तही ते काढून द्यायचे. शाहू मोडक आणि प्रतिभाताई जैन यांची ही प्रेम कहाणी एक अदभूत कहाणी आहे. शाहू मोडक हे ख्रिच्शन तर प्रतिभाताई जैन. जैन साध्वीचे व्रत झुगारून प्रतिभाताईंनी शाहू मोडक यांच्याशी लग्न करून एक इतिहास घडविला. शाहू मोडक यांचे ११ मार्च १९९३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

शाहू मोडक यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी लिहिलेल्या आणि सुधीर गाडगीळ यांनी शब्दांकित केलेल्या शाहू मोडक यांच्या आठवणी म्हणजे हे पुस्तक आहे!

शाहू मोडक प्रवास … एका देवमाणसाचा
लेखिका: प्रतिभा शाहू मोडक
अनुवाद: सुधीर गाडगीळ

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4176 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..