नवीन लेखन...

हमने तुमको देखा

स्थळ=सोलापुर भागवत थिएटर! चित्रपट= “खेल खेल में “! वेळ= संध्याकाळी सहा!

मित्र झळकीकर बरोबर कॉलेजच्या पायवाटेवर ऋषीचा पाहिलेला पहिला पिक्चर !(अंहं – “बॉबी” खूप नंतर पाहिला आणि “जोकर” ही )

तेव्हापासून याला आम्ही पाहिलं अगदी शेवटच्या “मुल्क ” पर्यंत ! सुमारे ४०-५० चित्रपट या कलावंताचे मी आजवर पाहीले असतील आणि एकच केलं – आमच्या देव्हाऱ्यात दाटिवाटीत त्याला बसविले, शेजारच्या अमिताभ नामक कुलदैवताला धक्का न पोहोचविता !

संपूर्ण “खेल खेल में ” महाविद्यालयीन जोशाने भरलेला ! हा, नीतू आणि राकेश रोशन – रॅगिंग , स्टेजवरील धमाका , थोडीशी रहस्य फोडणी , ” आजा मेरी बाहो में आ ” वाली अरुणा . बाहेर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने तरुण झाल्यासारखं वाटलं.

तो आवडावा असाच होता. बापाच्या /आज्याच्या आसपास न पोहोचू शकणारा, पण उरलेल्या दोघां भावंडांपेक्षा सुपीरिअर. माझ्या पिढीच्या समवयस्क असलेल्या या गृहस्थाचे ” कर्ज “, ” हम किसीसे कम नहीं ” कितीवेळा पाहीले असतील गणती नाही. त्याचा गोड /गुबगुबीत स्क्रीन प्रेझेन्स, हास्य , नृत्य , वादन सगळंच अफलातून ! फक्त ” सागर ” मध्ये कमल त्याच्यापेक्षा सुंदर नाचतो हे मानलं.

देव आनंद च्या चॉकलेटी घराण्याला याने पुढे नेलं आणि अमीर पर्यंत आणून सोडलं.

प्रेम करावं ते याच्या डोळ्यातून आणि आवाजातून !

समवयस्क डिम्पल बरोबर प्रवास सुरु केलेल्या ऋषीला पुढे पुढे पद्मिनी , पूनम ढिल्लन आणि दिव्या भारती बरोबर बघणे डोळ्यांना त्रासदायक होऊ लागले- कारण त्याचा बेढब अवतार रुचेना. पण पायात नृत्य तेच आणि “जोकर ” मधला निरागस भावही तोच !

त्याची सद्दी (नायक म्हणून) खऱ्या अर्थाने संपली – “दिवाना ” पासून ! जेंव्हा सेटवर शाहरुख साठी गर्दी होऊ लागली तेंव्हा कोपऱ्यातल्या ऋषीला बाडबिस्तरा आवरता घ्यावा लागला.

मग त्याने इतर दोन्ही भावांसारखा RK चा एक चित्रपट दिग्दर्शित केला (प्रत्येक भावाने एकेक) -आपल्या दुष्मनाला, “खन्नाला ” भूमिका दिली आणि झालं -गेलं विसरला.

मग टीव्ही वर दिसायचा , समाज माध्यमांवर काहीतरी controversy करायचा.

त्याला ऑल टाइम ग्रेट होण्यापासून अडवलं फक्त दोन गोष्टींनी – उंचीने आणि अमिताभने ! अन्यथा हा बापाच्या आसपास पोहोचला असता.

देव्हाऱ्यातून त्याला विसर्जित करताना त्याच्याच ओळी आठवताहेत –
” ए सनम , हम तो (सिर्फ- ओळीतील या एवढ्याच शब्दाला माझं OBJECTION आहे ) तुमसे प्यार करते हैं I ”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..