नवीन लेखन...

गोजिर्‍या बाळासाठी साजिर्‍या नावाची निवड.

बाळाचं नाव, सुटसुटीत, अुच्चारायला, लिहायला सोपं, प्रचलीत काळाशी सुसंगत असावं आणि त्याचा अुच्चार कानाला नादमधूर वाटला पाहिजे. म्हणूनच स्वर आणि मृदू व्यंजनं असलेली दोन किंवा तीन अक्षरी, जोडाक्षर विरहित आणि मानवी मनाला आणि भावनांना हव्याहव्याशा वाटणार्‍या निसर्गातील घटकांशी आणि वस्तूंशी निगडीत असलेली नावं

सर्वांना आवडतात. बाळाचं नाव, बाळाप्रमाणेच सर्वांना हवंहवंसं वाटणारंच असावयास हवं, नाही का?

बाळाची चाहूल लागताच त्याच्यासाठी अेखादं छानसं साजिरं नाव निवडण्याच्या खटपटीला ते जोडपं लागतं. पूर्वी बाळाचं नाव वडीलधारी माणसं ठरवीत असत. आता मात्र बाळाच्या मातापित्याच्या आवडीलाच प्राधान्य दिलं जातं.

कुटुंबात नवा पाहुणा आला की, बारसं दणक्यात करण्याचे बेत आखले जातात. मुलगी असो की मुलगा, नवागत पाहुण्याचं नाव काय ठेवायचं याचीच चर्चा सर्व नातलगात होत असते. कुणी सुचविलेल्या नावाला प्राधान्य द्यायचं हे लवकर ठरता ठरत नाही. शेवटी असं अेखादं नाव समोर येतं की त्याला सर्वांची संमती मिळते आणि तेच नाव बाळाला पाळण्यात घालून ठेवलं जातं आणि ते त्याला आजन्म चिकटतं. पुढे ते बाळ मोठं झाल्यावर आणि त्याला समज आल्यावर ते नाव त्याला आवडतंच असं नसतं. खरं पाहिलं तर मूल सज्ञान झालं की त्याला आवडेल ते नाव धारण करण्याची मुभा असावी. नाव, आडनाव, मातृभाषा, धर्म आणि जात, म्हणजे जन्मताच बाळाला ज्या ज्या आनुवंशिक बाबी मिळतात त्या, अशा अेकूण पाच बाबी आहेत की त्या प्रत्येक व्यक्तीला मुकाट्याने स्वीकाराव्याच लागतात.

नावाची पसंती

सध्या प्रचलीत असलेली किंवा वर्तमान पिढीला आवडतील अशा नावांतूनच, कुटुंबातील सर्व व्यक्तींना आवडेल असं नाव निवडावयाचं असतं. जी नावे बोजड आणि कालबाह्य झाल्यासारखी वाटतात ती आपोआपच वगळली जातात. नादमधूर, सुटसुटीत, अुच्चारायला आणि लिहा वाचायला सोपी आणि सोयीस्कर अशी नावं सध्या पसंत केली

जातात. या नावांना चंागला अर्थ असलाच पाहिजे असाही आग्रह नसतो. त्यामुळे नादमाधुर्य असलेली निरर्थक नावंही प्रचारात आली आहेत. जी पौराणिक नावं या कसोट्यंाना अुतरतात त्या नावांचा विचार करण्यास हरकत नसावी. नावांच्या अंग्रजी स्पेलिंगलाही, सध्याच्या संगणक युगात, खूप महत्व प्राप्त झालं आहे.

बरीचशी मराठी आणि अतर भाषिक भारतीय प्रजा आता अमेरिका, युरोप, मध्यपूर्व देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया वगैरे देशात स्थायिक झाली आहे. त्यांच्या नवजात बालकांना भारतीय नावं ठेवावयाची असतात आणि त्या बालकांना त्या त्या देशातच वावरायचं असल्यामुळं, ही नावं तेथील संस्कृतीतही चलनी असावी लागतात. त्यामुळे नावाची निवड करताना दोन किंवा तीन अक्षरी, नादमधूर आणि अुच्चारायला सोप्या असणार्‍या नावंाना प्राधान्य दिलं जातं.

नावाचा ध्वनी

नावाला भाषेचं बंधन नाही. विशिष्ट नादलहरी, ध्रानीलहरी किंवा आवाजलहरी त्या नावाशी संलग्न असतात, संबध्दित असतात. अर्थ मागाहून वेगवेगळ्या भाषात वेगवेगळा असतो. अेका भाषेत चांगला अर्थ असला तरी निराळ्या भाषेत वेगळा अर्थ असलेली किंवा निरर्थकही नावं असू शकतात. म्हणून नावाचा नाद, ध्वनी किंवा आवाज हाच विज्ञानीय दृष्ट्या महत्वाचा आहे. आपल्या गोजिर्‍या बाळाला साजेसं, नातेवाआीकांना आणि समाजालाही आवडेल असं, सर्वतोपरी साजिरं असलेलं नाव निवडणं तसं अवघडच काम आहे. बाळाचे नाव जर सर्वांना आवडणारे असेल तर बाळही सर्वांना आवडू लागेल, ते लोकप्रिय होआील अशी त्याच्या आआीवडीलांची आणि अतर वडीलधार्‍या व्यक्तींची अपेक्षा असते. नातलग, ओळखीच्या व्यक्ती, दैनंदिन व्यवहारात संबंध येणार्‍या व्यक्ती वगैरेंची चांगली चांगली नावं आपल्या लक्षात असतात. प्रसारमाध्यमातूनही चांगली नावं आढळतात. ती सर्व अेका डायरीत लिहून ठेवावी. कुणासाठी नाव निवडावयाचं असल्यास, पहिली फेरी म्हणून ही यादी अुपयोगी पडेल.

नावनिवडीचे कालपरत्वे संकेत

काळानुसार नावांचे संकेत आणि आवडीनिवडी बदलत असतात. पूर्वी पौराणिक आणि पारंपारिक नावांचाच विचार केला जात असे. पौराणिक देवदेवतांच्या नात्याचाही विचार केला जात असे. शंकर नावाच्या मुलाच्या लग्नाचे वेळी त्याच्या बायकोचं नाव पार्वती ठेवलं जाआी आणि त्यांना झालेल्या मुलाचं नाव कार्तिकेय, गजानन, गणेश, गणपती असं ठेवलं जाआी. मुलींच्या बाबतीत लक्ष्मी, सरस्वती अशासारखी नावे असत. राधाकृष्ण, रामकृष्ण, गोपालकृष्ण, शिवराम् अशी द्विस्तरीय तर शिवरामकृष्ण अशी त्रिस्तरीय नावेही असत.

बाळांना देवादिकांची नावं ठेवण्याचा मुख्य अुद्देश म्हणजे, मुलांना हाक मारताना किंवा संबोधताना देवदेवतांचं नाव अुच्चारलं जातं, नामस्मरण केलं जातं. तसंच आपल बाळ त्यांच्यासारखंच सदगुणी आणि पराक्रमी व्हावं अशी अीच्छा असते. बंगाली, गुजराथी, अुत्तर भारतीय आणि आता मराठीतही देवादिकांची नावं ठेवण्याची प्रथा मागे पडते आहे. दक्षिण भारतात मात्र ही प्रथा बरीच तग धरून आहे. पुढे या रूढीचं महत्व हळुहळू कमी होअून नावांना चांगला अर्थ असावा असा संकेत आला. परंतू आता अर्थ नसलेलीही पण नादमधूर, अुच्चारण्यास सोपी, जोडाक्षरे आणि कठोर व्यंजने कमी असलेली सुटसुटीत अशी नावं ठेवण्याचा प्रघात पडला आहे. सध्याची दाक्षिणात्य पिढीही नवीन नावं स्वीकारू लागली आहे. कालपरत्वे संकेत बदलतात, त्याला नावेही अपवाद नाहीत. प्रचलीत नावांना खूपच प्राधान्य मिळते आहे. सारांश म्हणजे आता काळ बदललेला आहे नादमधूर सुटसुटीत नावं ठेवण्याचा प्रघात पडला आहे. नावाला चांगला अर्थ असलाच पाहिजे असाही आग्रह राहिलेला नाही.आर्यन, आर्या, अदिती, आदित्य, शंतनू , पार्थ, भीष्म, अर्जुन, गीता, गौतम, सिध्दार्थ, अुमा, गीता, गौरी, गार्गी, वैदेही, वेदिका, कैलास, भरत, भारती, वरूण, राहूल वगैरे पौराणिक नावांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. याचं कारण म्हणजे ही नावं नादमधूर, अर्थपूर्ण आणि सुटसुटीत आहेत आणि प्रचलीत नामसंकेतात ही नावं चपखलपणे बसतात. मूल गोरेगोमटं आणि देखणं असलं तर हे पौराणिक नावही त्याला शोभ
न दिसतं.

बाळाचं नाव, पुढे बाळ मोठं झाल्यावर त्याच्या व्यक्तीमत्वास

साजेसं व्हावयास हवं हे खरं. परंतू भविष्यात बाळ कसं होणार याचा, ते पाळण्यात असताना कसा अंदाज करता येणार? म्हणून आपल्या पूर्वजांनी काही ठोकताळे बांधले. जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मतिथी, राशी, नक्षत्रं आणि नावाची आद्याक्षरं यांचे अन्योन्य संबंध जोडणं हा ही अेक ठोकताळाच आहे. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास त्यात काही तथ्य असेल असं वाटत नाही. ठोकताळे नेहमी सुमारे ५० टक्के बरोबर असतात. त्यांना सांख्यिकीय म्हणजे स्टॅटिस्टीकल नियम लागू पडतात.

नावनिवडीच्या कसोट्या. नाव सुटसुटीत, अुच्चारायला, लिहायला सोपं, प्रचलीत काळाशी सुसंगत असावं आणि त्याचा अुच्चार कानाला नादमधूर वाटला पाहिजे. म्हणूनच स्वर आणि मृदू व्यंजनं असलेली दोन किंवा तीन अक्षरी, जोडाक्षर विरहित आणि मानवी मनाला आणि भावनांना हव्याहव्याशा वाटणार्‍या निसर्गातील घटकांशी आणि वस्तूंशी निगडीत असलेली नावं सर्वांना आवडतात. बाळाचं नाव, बाळाप्रमाणेच सर्वांना हवंहवंसं वाटणारंच असावयास हवं, नाही का?

काही पौराणिक नावात पुरोगामी सुधारणा घडवून आधुनिक नावंही नव्याने तयार होत आहेत. अुदा. गीता या नावापासून गीताली, गीतानी, गीताश्री किंवा गीतेन, गीतेश, गीतश्री अशी नावे रूढ होत आहेत. पार्वतीचं पारू झालं आणि त्याचं पारूल, पारून, पारूण, पारुणा, पारुणी अशी रूपं रूढ झाली. वरूणपासून वरुणा, वरुणी, वारूण, वारुणा, वारुणी अशीही नावं घडली. चारुदत्तचं चारू झालं तर पारूचं पारुदत्त झालं. चारू आणि पारू सारखं, वारू हे देखील नाव होअू शकतं. निलीशा किंवा नीलिशा आणि निलीमा किंवा नीलिमा या नावांची घडण तर फारच मजेशीर आहे. शालिनी आणि मालिनी ही नावं अुलटी वाचलीत की नीलिशा आणि नीलिमा ही मुलींची नावं होतात. पुढे निलीश आणि निलीम ही मुलांची नावं घडतात. थोडं डोकं चालवा आणि अशा तर्‍हेच्या पध्दतींनी नवीन नावं घडवा.

नावांच्या बाबतीत, मुलांची नावं आणि मुलींची नावं असा भेद आपल्या संस्कृतीत केला आहे. मुलांची नावं सहसा अकारांत असतात तर मुलींची नावं आकारांत किंवा आीकारांत असतात. परंतू आधुनिक काळात हा भेद लोप पावत आहे. विशेषतः बंगाली, अुत्तर भारतीय किंवा गुजराथी समाजात हा भेद बराच कमी झाला आहे. अुदा.- कांती, रश्मी, रजनी, कमल, किरण, कीर्ती, कुमुद, पवन, श्री, प्रभा वगैरे स्त्रीलिंगी नावं पुरुषांचीही असतात तर चतुर, बकुल, मुकुल, मधू, मधुर, पवन अशासारखी अकारांत आणि अुकारांत पुरुषांची नावं, मुलींचीही असतात.

* बाळाचे रंगरूप पाहून नाव निश्चित करणे.

* आआी वडिलांच्या नावाला साजेसं नाव निश्चित करणे.

* आआीकडील किंवा वडिलांकडील घराण्यातील कुणा नावाजलेल्या व्यक्तीचं नाव पसंत करणे.

* काही प्रतिष्ठित कुटुंबात अशी प्रथा असते की नवजात बाळाचं नाव अेखाद्या विशिष्ट आद्याक्षरावरूनच ठेवायचं. अुदा. अ किंवा क वगैरे. अेका भावाच्या मुलांची नावं अ वरून तर दुसर्‍या भावाच्या मुलांची नावं क वरून वगैरे.

* जन्मराशीवरून नाव निवडणे. हे नाव विशेष आवडणारं नसेल तर ते नेहमी न वापरता किंवा फक्त कागदोपत्रीच वापरणं आणि नेहमीच्या व्यवहारासाठी काळानुरूप प्रचलीत असं नाव निवडणे.

* नादमधूर, कानाला गोड लागेल असं सुटसुटीत, अुच्चारण्यास आणि लिहीण्या वाचण्यास योग्य आणि बाळाच्या रंगरूपास शोभेल असं नाव निवडणे.

* र आणि व जवळजवळ आले की वाचतांना घोटाळा होतो. अुदा. रवी हे नाव दीर्घ लिहीलं तर घोटाळा होतो पण तेच जर रवि असं लिहीलं तर चांगलं वाटतं.

* बाळाचं नाव बरेच वेळा अंग्रजीत लिहावं लागतं म्हणून किचकट स्पेलिंग असेल असं नाव निवडू नये. तसेच, नाव अंग्रजीत लिहीलं तर त्याचा अुच्चार जवळजवळ मूळ नावासारखा होआील याची दक्षता घ्यावी. अुदा. भरत आणि भारत ही दोन्ही नावे अंग्रजीत ँप्र्ीठ्ठर्ीद्भ अशीच लिहीली जातात. ँप्र्ीर्ीठ्ठर्ीद्भ असे सहसा कुणी लिहीत नाही. भद्र आणि भद्रा, नीलाक्ष आणि नीलाक्षा ही आणखी अशीच नावं समजावीत.

* समाजात वावरतांना, बाळाच्या नावाचा वापर बाळाची ‘ओळख‘ म्हणजे ‘आयडेंटिटी‘ साठी केला जातो. त्याच्या नावाला वडीलांचं नाव आणि आडनावही जोडतात. वडिलांचं नाव आणि आडनावही तर बदलता येत नाही म्हणून या दोन नावांना शोभेल असं बाळाचं नाव निवडावं. वडिलांचं नाव कालबाह्य स्वरूपाचं असल्यास बाळाचं अत्यानुधिक नाव शोभणार नाही म्हणून कागदोपत्री अेक नाव आणि व्यवहारात आधुनिक नावाची निवड करावी.

* आता, मुलगा होणार की मुलगी होणार हे जन्माआधीच कळतं. म्हणून बाळाचं नाव आधीच ठरवून, त्यानुसार जन्मदाखला घेतल्यास, पुढे परदेशी विद्यापीठात प्रवेश घेणं, पासपोर्ट व्हिसा वगैरे महत्वाची कागदपत्रं मिळविणं सोपं जातं.

अितर देशांतील बाळांची नावं.बाळाची चाहूल लागली की भारतीय जोडप्यांना आणि कुटुंबांना जो प्रश्न भेडसावतो तोच प्रश्न पाश्चिमात्य आणि अितर देशांतील जोडप्यांना आणि कुटुंबानाही सोडवावयाचा असतो. पुस्तकातील नावांचे संदर्भ तर घेतले जातातच परंतू नातेवाआीक आणि मित्रमंडळी यांच्याकडूनही बाळाच्या नावासंबंधी सूचना मागविल्या जातात आणि नावाची योग्य निवड केली जाते. तिकडे बाराव्या दिवशीच्या बारशापर्यंत वाट पहावी लागतच नाही. बाळाचा जन्म झाल्याबरोबरच त्याचं नाव नोंदवावं लागतं. स्थानिक वृत्तपत्राच्या ठराविक दिवशीच्या आवृत्तीत त्या गावातील सर्व अिस्पितळात जन्मलेल्या बाळांची नावं आणि जन्मदात्या मातापित्यांची नावं प्रसिध्द केली जातात.

अमेरिकेत तर ‘Names’ या नावाचं, मुलामुलींच्या नावांचं मासिकच निघतं. १९९८ साली ‘ The Baby Names Survey Book’ प्रसिध्द झालं. सान्फ्रासिस्कोला तर ‘ NameLab’ ही नावं ‘घडविण्याची‘ अेक कंपनीच आहे. पैसे पाठविले की ही कंपनी, नवीन आणि प्रचलीत नावांची यादीच पाठविते. गेल्या आठदहा वर्षातील, प्रत्येक वर्षीच्या मुलीच्या आणि मुलांच्या, सर्वात लोकप्रिय असलेल्या दहा नावांची यादीही म्हणजे ‘टॉप टेन‘ नावं मासिकांत प्रसिध्द केली जातात. संगणकाच्या वेबसाआीटवरही मुलामुलींची नावं मिळू शकतात.

नावं आणि अंधश्रध्दा.बाळाच्या नावाबाबत जगातील सर्वच देशात, संस्कृतीत आणि समाजातील सर्वच स्तरात, पूर्वापार चालत आलेल्या काही श्रध्दा, समजुती आणि बर्‍याचशा अंधश्रध्दा रूढ आहेत. सर्वात महत्वाची श्रध्दा म्हणजे ओळखीच्या किंवा माहितीतल्या अेखाद्या विद्वान गुरूजीकडून बाळाच्या जन्मतिथी आणि जन्मवेळेनुसार त्याची जन्मपत्रिका करून घेणं आणि बाळाच्या राशी, नक्षत्र आणि चरणानुसार निघालेल्या आद्याक्षरानुसार नाव निवडणं. हे नाव बाळाला लाभदायक होआील असा विश्वास बाळगतात. घरात बाळ आलं की त्याचं नाव कोणतं ठेवावयाचं हा फार कुतुहलाचा विषय असतो. नावं ठेवण्याच्या पध्दती या वाकप्रचाराला वेगळाच अर्थ असल्यामुळे, बाळ पाळण्यात घालून नाव ठेवण्याच्या प्रथेला नामकरण विधी, नामकरण संस्कार, किंवा नामकरण असंही म्हणता येआील.

गजानन वामनाचार्य.सोमवार, ११ अेप्रिल २०११

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..