नवीन लेखन...

गजरा शेजारणीसाठी

तिला केसात गजरा घालायला खूप आवडायचे. तो देखील घरी येताना वाटेत कुठे गजरा दिसला की तिच्यासाठी आवर्जून घेऊन यायचा. त्याने प्रेमाने दिलेला गजरा तिच्या गालावरची कळी आवर्जून खुलवायचा. पण मागील काही महिन्यापासून त्याला ऑफीस मधून घरी येण्यास सारखा उशीर व्हायचा. गजरा विकणारा सुद्धा त्याच्या दृष्टीपथास पडला नव्हता. पण आज त्याने काम लवकर आटोपले होते. तिच्यासोबत तो बाहेर कॅण्डल लाईट डिनर साठी जाणार होता. नेमके त्याच्या नशिबाने आज त्याला गजरेवाला देखील सापडला. मागील काही महिन्यात बायकोसाठी गजरा आणू न शकल्याने आज त्याने घरी जाताना कसर भरून काढण्यासाठी एका ऐवजी दोन गजरे घेतले. घरी पोहोचल्यावर सर्वात आधी त्याने तिच्या हातावर गजरा टेकवला. सहाजिकच तिच्या गालावरची कळी खुलली. त्याने स्वतःच्या हाताने तिच्या केसात गजरा माळला. उरलेल्या गजऱ्यावर तिचे लक्ष गेले आणि साहजिकच तिने विचारले की दुसरा गजरा कोणासाठी? तेव्हा नवऱ्याने सरळमार्गी तुझ्यासाठी आणलाय म्हणून उत्तर देण्याऐवजी तूच ओळख कोणासाठी असे मार्मिक उत्तर दिले. पुढे बायको काही बोलणारच की त्या आधीच त्यांच्या २ वर्षाच्या लहान मुलाने हातातील दुसरा गजरा ओढला आणि शेजाऱ्याकडे धूम टाकली. दोघांचे संभाषण तिथेच अर्धवट सुटले. लहान मुलाने तो गजरा घेऊन शेजारणी पुढे धरला. शेजारीण त्याचे खूप लाड करायची. शेजारणीला वाटले आपल्या शेजारनीने आपल्यासाठीच गजरा दिलाय. तिने सहज विचारले की गजरा कोणी दिला? वडिलांना गजरा आणताना बघितले होते म्हणून तो निरागस मनाने बोलून गेला की पप्पाने दिला. शेजारणीच्या नवऱ्याने बायकोसाठी सोडून आपल्यासाठी गजरा आणला हे ऐकून मात्र शेजारीण पुरती बुचकळ्यात पडली. मोगऱ्याच्या दरवळणाऱ्या सुगंधात रममान झालेली शेजारीन काही क्षणातच भानावर आली. भानावर येताच संतापाने लालबुंद झालेली शेजारीण तडक निघाली शेजार्‍याला जाब विचारायला की तिच्यासाठी गजरा आणण्याचे नेमके कारण काय? हा प्रश्न विचारताना आपली शेजारीण समोरच उभा आहे याचे तिला भानच उरले नाही. शेजारणीचा प्रश्न ऐकून तो काही वेळ स्पीच लेस होऊन विचार करायला लागला की मी शेजारणीला गजरा दिला कधी? हे आपल्यावर आलेले संकट आहे की शेजारणीला इम्प्रेस करायची संधी? त्याच्या मनातल्या भोळ्या प्रश्नाचे उत्तर समोर दत्त बनून उभ्या असलेल्या बायकोने दिले की दुसरा गजरा आपल्या शेजारणी साठी आणला आहे तर?? कारण माझ्यासाठी आणला असता तर काही वेळा पुर्वी विचारलेल्या प्रश्नाला विनाकारण मार्मिक उत्तर भेटले नसते – ओळख पाहु कोणा साठी आणलाय म्हणून?? समोर बायको आणि शेजारणी असा दोघींचाही रुद्रावतार बघुन त्याला फ्लॅश बॅक मध्ये जायला भाग पाडले. प्रेमाने दोन गजरे घेऊन ते बायकोला(आणि शेजारणीला) देई पर्यंतची सिक्वेन्स तो आठवू लागला. आणि दुसऱ्या गजऱ्याच्या बाबतीत त्याच्या दोन वर्षाच्या छोट्या मुलाने केलेल्या निरागस पराक्रमाने त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पाडला. झालेला सगळा घोळ त्याच्या लक्षात आला. त्याने मुलाचा निरागस पराक्रम बायको आणि शेजारीण असा दोघींनाही समजावून सांगण्याचा परत परत प्रयत्न केला पण त्याची निरपराध मुक्तता होत न्हवती. छोट्या मुलाने शेजारणीला गजरा देऊन जो पराक्रम केला होता त्यानंतर बायकोच्या नजरेत तो गॅरी बनला होता तर शेजारीण शनाया. पक्षी झाडावर बसायच्या वेळेसच अचानक फांदी तुटली तर फांदी पक्षानेच तोडली असा आरोप लागल्या शिवाय राहतो का? भलेही मग त्या पक्षाचा काहीही दोष नसला तरी. त्याचे पण तसेच झाले होते. दोन्हीही गजरे बायकोसाठीच आणले असताना देखील झालेला गैरसमज निस्तरताना त्याच्या नाकी नऊ आले. बायको सोबत कँडेल लाईट डिनर ने सुरू झालेला प्लॅन करपलेल्या खिचडीवर येऊन संपला होता. साहजिकच त्याला फक्त खिचडीच बनवता येत होती आणि झालेल्या गोंधळात खिचडी करपणार देखील होती हे वेगळे सांगायलाच नको.

— लेखक : राहुल बोर्डे

ई-मेल : rahulgb009@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..