नवीन लेखन...

पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस

आज १ ऑगस्ट. आज पुणे शहरातील सर्वात जुन्या फिल्म क्लबपैकी एक, आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस

फिल्म सोसायटी मुमेंट सुरू झाली ती बंगालमध्ये. बंगालमध्ये सत्यजित रे असतील केरळमध्ये अदुर गोपालकृष्णन असतील त्याचप्रमाणे अनेक दिग्दर्शक निर्माते आणि कलाकार हे सगळे यामध्ये अग्रणी होते आणि केरळमध्येही चळवळ चालू होती. आणि पुण्यात आशय फिल्म क्लबची पुन्हा स्थापना झाली त्याच्या आधी मुंबई मध्ये ‘प्रभात चित्र मंडळ’ आणि नाशिकचे ‘दादा साहेब फाळके मंडळ’ कार्यरत होते.

सतीश जकातदार, वंदना भाले, दीपक देवधर, प्रभाकर वाडेकर, प्रसन्निकुमार अकलूजकर आणि मुकुंद संगोराम या चित्रपटप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट १९८५ रोजी आशय फिल्म क्लबची स्थापना केली. सध्या सतीश जकातदार व वीरेंद्र चित्राव आशय फिल्म क्लबची धुरा सांभाळत आहेत. आशय फिल्म क्लब स्थापन झाला त्या वेळी त्याला मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई हे आशय फिल्म क्लबचे लाईफ मेंबर झाले. तेव्हा पासून आशय फिल्म क्लब बहरत गेला. १९८९ साली आशय फिल्म क्लब तर्फे पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शना खाली ‘मराठी विनोदी चित्रपट महोत्सव’ पुण्याच्या टिळक स्मारक मध्ये पहिल्यांदा झाला. तिथे 35 MM प्रोजेक्टर हे लावले गेले. राजा गोसावी, शरद तळवलकर,पु ल देशपांडे असे नामवंत कलाकार हे त्या महोत्सवाला उपस्थित होते. १९८९ मध्येच आशय फिल्म क्लब तर्फे ‘राजा परांजपे चित्रपट महोत्सव’ झाला. त्या काळी गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मधील काळे हॉल, फर्ग्युसन कॉलेजमधील अॅयम्फीथिएटर, लेडी रमाबाई हॉल आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधील मुख्य थिएटर यासारख्या ठिकाणी आशय फिल्म क्लबने कार्यक्रम केले.त्या वेळी जगातले सगळ्यात दर्जेदार चित्रपट आशय फिल्म क्लब मुळे लोकांना बघायला मिळत होते. विशेषतः इंडियन पॅनोरमामध्ये अनेक फिल्म आशय मुळे पुणेकरांना बघण्यास मिळाल्या. अशी आशय फिल्म क्लब वाटचाल चालू असताना एका बाजूला पुस्तक प्रकाशन, प्रदर्शने,दृकश्राव्य कार्यक्रम हे कार्यक्रम चालू होते. दृकश्राव्य कार्यक्रम ही कल्पना पुण्यात आशय फिल्म क्लबने पहिल्यांदा आणली. आणि लोकसत्ता’चा जेव्हा सुवर्णमहोत्सव होता तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटाचा दृक-श्राव्य कार्यक्रम आशयने केले होते,ते आशयच्या बाबतीत गेम चेंजर ठरले. या कार्यकमाना हजारोंची गर्दी असे आणि मराठी सिनेमातील दृश्य फिती पहायला मिळायच्या आणि त्या वेळेस राजा गोसावी, सुधीर फडके, सूर्यकांत, राजदत्त हे सर्व मराठीतील दिग्गज कलाकार उपस्थित असायचे. ‘कोल्हापूर स्कूल’ हे वर्कशॉप मुंबईच्या व्ही शांताराम भीषण फाउंडेशन तर्फे राजकमल स्टुडिओ मध्ये आशय फिल्म क्लबने आयोजित केलं होते. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आशयने अनेक महोत्सव आयोजित केले. परंतु त्यानंतर एक महत्त्वाचा कालखंड आशय साठी आला. १९९१ ते १९९७ या काळात आशयला खूप मोठा सेटबॅक बसला. आशय फिल्म क्लब त्यावेळी बंद करण्याची वेळ आली होती. याला कारण होते त्या वेळी टीव्ही चॅनेल मध्ये वाढ झाली व चित्रपट रीळा मधून सीडी वर व कॅसेटमध्ये आला, पण १९९८ साली आशय फिल्म क्लब पुन्हा जोरात चालू झाला. १९९९ साली पु ल देशपांडे जेव्हा ऐंशी वर्षाचे झाले तेव्हा एक समिती स्थापन झाली आणि त्यामध्ये आशय हा या समितीतील एक भाग होता. त्या वर्षी ‘बहुरूपी पु.ल’ या नावाने वर्षभर कार्यक्रम आयोजित केले गेले. त्याचा समारोप म्हणून पहिला पुलोत्सव हा कार्यक्रम बालगंधर्व मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आर के लक्ष्मण, नाना पाटेकर जयश्री गडकर, कमल हसन,भीमसेन जोशी,स्मिता तळवलकर असे अनेक दिग्गज व पुल प्रेमी उपस्थित होते.

त्याच वेळी ‘आशय सांस्कृतिक’चा जन्म झाला. आणि पुढची दहा वर्ष आशयचे गोल्डन एज असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही त्या वेळी आशयच्या मेंबरची संख्या ४००० हून अधिक झाली होती. २००८ पर्यंत मराठी सिनेमा मृतप्राय होणार होता, त्यावेळी मराठी सिनेमे वर्षाला पाच ते सहा बनत होते. तर तेव्हा आशय मराठी सिनेमा टिकवला ‘बनगरवाडी’ हा पहिला चित्रपट याचे आशयने मोठ्या प्रमाणावर प्रमोशन केले.‘बनगरवाडी’ या चित्रपटामुळे हा एक ट्रेड बनला की कुठल्याही वेगळ्या धाटणीचा चित्रपट आशय स्क्रीन करणार व आशयच्या मेंबरची पावती मिळणार आणि तो पुण्यात सिनेमा चालणार याला रसिक मान्यता मिळाली. त्यामुळे त्यावेळचे नवीन दिग्दर्शक यांना प्रेरणा मिळत गेली. गजेंद्र अहिरे. सचिन कुंडलकर,उमेश कुलकर्णी ही त्यातील काही नावे होत. त्यानंतर आशय फिल्म क्लबने ‘एशियन फिल्म फेस्टिवल’ भरवण्यास सुरुवात केली. त्यावेळी नुकतेच सिटी प्राईड कोथरूड चालू झाले होते. पहिला एशियन फिल्म फेस्टिवल तिथे भरवला गेला, व त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.त्यामुळे सभासदांना अशीयातील दिग्गज दिग्दर्शक कलाकार भेटले. गेले बारा तेरा वर्ष हा फेस्टिवल भरवला जातो. तसेच आशय तर्फे दरवर्षी परदेशी चित्रपटांचा महोत्सव केला जातो. तसेच आशय तर्फे वेगवेगळ्या दहा देशांचा चित्रपट महोत्सव पण आयोजित केला जातो. आता काळ बदललाय आता तर आपल्या मोबाईलवर सिनेमा बघता येतो अशात आता करोनामुळे आशय फिल्म क्लब समोर नवीन आव्हाने आहेत. करोनामुळे आशयला आता पुन:श्च हरिओम करण्याची वेळ आली आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..