नवीन लेखन...

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

कार्यकाळ: १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४

जन्म: १४ नोव्हेंबर १८८९ मृत्यू: २७ मे १९६४

इंग्रजांच्या जोखडातून भारताची मुक्तता झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अशी त्यांची प्रमुख ओळख आहे. अनेक चळवळीतील त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख आहे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे ते लोकप्रिय नेते होत. ७ फेब्रुवारी १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. सन १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे शालेय शिक्षण घरीच खासगी शिकवणीद्वारे घेण्यात येत असे. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे हॅरो येथे ते शिक्षणानिमित्त गेले. केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान या विषयाची पदवी घेतली. १९१२ | साली भारतात परतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांना स्वातंत्र्यसंग्रामाबाबत विशेष रुची होती. त्यामुळे ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आपसूकच खेचले गेले. सन १९१२ साली बंकीपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात त्यांची प्रमुख उपस्थिती होती. १९१९ साली होमरुल चळवळीचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले. सन १९१६ साली त्यांची महात्मा गांधी यांच्याशी पहिल्यांदाच भेट | झाली. या भेटीने प्रभावित झालेल्या जवाहरलाल नेहरू यांनी त्यानंतर १९२० साली उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. याच दरम्यान त्यांना असहकार आंदोलनामुळे दोन वर्षे कारावास भोगावा लागला. अल्मोरा कारागृहात त्यांनी आपले आत्मचरित्र पूर्ण केले. त्यांनी एकूण नऊ वेळा कारावास भोगला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..