नवीन लेखन...

फिल्मी कानोसा – टाइमपास

बालक-पालक नंतर रवि जाधव प्रेषकांना कोणता नवीन आणि वेगळ्या विषयाचा चित्रपट देणार ? आणि टी.पी.म्हणजे ‘टाइमपास’च्या घोषणेनंतर ती उत्सुकता संपली. पुन्हा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेषकांच्या पुरेपूर टाइमपास होईल (म्हणजे उत्तम कलाकृतीच्या माध्यमातून मनोरंजन होत राहील) याची काळजी घेतली आहे.

टाइमपास या चित्रपटाची कथा आहे दगडू (प्रथमेश परब) आणि प्राजक्ता (केतकी माटेगावकर)ची ; तारुण्यात नुकतच पदार्पण केलेल्या दोन मुलांच्या भावविश्वाभोवती फिरणारी ही कथा; त्यावयात नुकतच कुठे जगाशी परिचय होत असतो, ओळख होत असते आणि अश्यातच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागते तेव्हाची मानसिकता त्यापाठोपाठ कुटुंबीय किंवा समाजातून झालेला विरोध तसंच अजाणत्या वयात नक्की आपण प्रेम करतोय की निव्वळ आकर्षणापायी एकमेकांच्या जवळ येतोय आणि मग हे प्रेम की नुसताच टाइमपास याचं चित्रण इथे करण्यात आले आहे. ही कथा प्रेमकथा घडते १९९० च्या सुरुवातीच्या वर्षामध्ये, त्यामुळे या चित्रपटातील कथेची त्या अनुषंगाने काही प्रमाणात मांडणी झालेली दिसून येते. ठाणे-डोंबिवलीतील चाळींमधील उच्चवर्णीय कुटुंबीय व त्याच भागातील कष्टकरी वर्गातील वेगळया संस्कारात वावरलेली दोन तरूण मुले-मुली एकत्र येतात तेव्हा काय धमाल आणि ट्विस्ट येतात हे टाइमपास मधून दिग्दर्शकाने नेमकेपणाने मांडलेलं दिसून येते.

या चित्रपटात प्राजक्ता लेलेच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले वैभव मांगले आणि आई (अर्थातच मेघना एरंडे) आपल्या परीने अभिनयात उत्तम ठरलेले आहे.तसंच भाऊ वल्लभ लेले (भूषण प्रधान) आणि प्राजक्ताची संगीत शिक्षिका (उर्मीला कानेटकर) यांनी सुध्दा आपल्या भूमिका चोख साकारल्या असून दगडूच्या वडिलांची भूमिका साकारणारे भाऊ कदम यांचं देखील विशेष कौतुक करायला हवं.काही मोजके सीन्स असले तरी सुध्दा काहीशी त्यांच्या गंभीर व्यक्तीरेखेची नोंद घेण्यासारखी आहे.

चित्रपटात मध्यांतर नंतर दगडू आणि प्राजक्ता यांच्यात चांगलीच गट्टी जमते. अर्थात त्यावयात प्रेम समजणार्‍या आणि नुकतचं कुठे बालपणाच्या पांघरुणातनं बाहेर आलेल्या मुलांची काल्पनिक भविष्याची स्वप्न रंगवण्याची तर्‍हा याचं चित्रण टिपीकल असलं चित्रण टिपीकल असलं तरीसुध्दा पटकथा, संवादशैली, गीत आणि संगीत यामुळे वेगळं वाटत राहतं; सर्वात महतत्वाचं म्हणजे कलाकरांची निवड योग्य असल्यामुळे अभिनयात उजवा ठरतो.

चित्रपटाची लांबी विस्तारली आहे, पण दगडूचे विनोदी संवाद आणि टपोरी मित्रांसोबत असलेल्या एकंदरीत वावरा मुळे चित्रपट ” बोअर ” होत नाही. गाण्यांचा बाज देखील आणखीन एक जमेची बाजू ! तरीसुध्दा “मला वेड लागले” या गाण्यातील ‘ स्वप्नील बांदोडकर ‘ चा गायक दगडूच्या भुमिकेसाठी म्हणून दिलेला आवाज कुठेही त्याच्या भुमिकेशी आणि भाषाशैलीशी निगडीत नाही. तांत्रिक बाजू चांगली झाली आहे. पण प्रकाश योजना आणि छायाचित्रणावर थोडी मेहनत घेणं गरजेचं होतं ; ‘ लोकेशन्स ‘, ‘ कलादिग्दर्शन ‘, या बाबी देखील कथेनुसार येत गेल्यामुळे सत्यता वाटत रहाते. नायक म्हणून प्रतमेश परब आणि नायिका म्हणून केतकी माटेगावकरने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतल्याचं पावलोपावली जाणवत राहतं; आणि सिनेमाचा शेवट देखील सस्पेनशियल ठरेल असाच आहे.

एकूणच या वर्षातील सुरुवात अगदी मनोरंजक पध्दतीने झाली असून मराठीत एका वेगळ्या संकल्पनेमुळे प्रेमाचा विषय मांडल्यामुळे टाइमपासची कथा दर्जेदार झाली असून, हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला देखील स्वत:च्या नवतरुण वयातील दिवस आठवल्यावाचून रहाणार नाही, हे मात्र नक्की !

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..