नवीन लेखन...

ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर

ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांचा जन्म २० एप्रिल १९६० रोजी अलिबाग तालुक्यातील चौल गावी झाला. दिलीप ठाकूर यांचे बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन जीवन मुंबईत गिरगावातील खोताची वाडीतील अवघ्या दहा बाय दहाच्या खोलीत गेले. जीवन घडताना एकीकडे दक्षिण मुंबईतील अनेक चित्रपटगृहात स्टाॅलच्या तिकीटात सतत नवे जुने चित्रपट पाहणे आणि त्या काळातील अनेक साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक वाचणे यात घडले. शिवाय गल्ली क्रिकेट आणि गल्ली चित्रपट यातून जनसामान्यांशी नाळ जुळली होतीच. त्यांनी गिरगावातील हिंद विद्यालय हायस्कूलमध्ये शालेय तर चौपाटीच्या भवन्स कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. यातूनच विद्यार्थी दशेतच त्यांनी विविध नियतकालिकांमधून वृत्तपत्र लेखन सुरु केले. एकाद्या लेखावरचे मत अथवा एकाद्या ताज्या घडामोडीवरचे आपले मत ‘वाचकांच्या पत्रा’तून प्रसिद्ध होत आहेत या त्यांच्यासाठी खूपच मोठा उत्साहाचा भाग होता.

मार्मिक, रसरंग, चित्रानंद, सोबत, लोकप्रभा, क्रीडांगण अशा साप्ताहिकातून आपली पत्रे तर कधी लेखही प्रसिद्ध होत असल्याने त्यांचा लेखनातील कल वाढला. १९८२ साली त्यांनी नवशक्ती दैनिकात प्रूफ रिडर म्हणून रुजू झाले आणि त्याबरोबरच रविवार नवशक्तीत चित्रपटविषयक सदरही लिहायला मिळाले. १९८६ साली त्यांना संपादकीय विभागात बढती देण्यात आली. ऐशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर अनेक दैनिके आणि साप्ताहिकात विविध टोपणनावाने चित्रपटविषयक सदर लेखन केले. राजा दिलीप, स्पॉटबॉय, पिक्चरवाला, सिनेमावाला, राजा चौलकर, राजा फिल्मीस्तानी वगैरे वगैरे टोपणनावानी खूपच मोठ्या प्रमाणावर लेखन केले.

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्यक्षात शूटिंग रिपोर्टीगसाठी सेटवर जाणे, चौफेर निरीक्षण आणि लहान मोठ्या स्टार्ससह अनेक प्रकारचे तंत्रज्ञ आणि कामगार यांच्याशी संवाद साधणे यातून त्यांच्याकडे वेगळी माहिती, संदर्भ, तपशील, आठवणी यांची जमा होत गेली. याचीच पुढची पायरी म्हणून २००३ सालापासून त्यांचे चित्रपटविषयक लेख संग्रह प्रसिद्ध होत आहेत. आतापर्यंत त्यांची चाळीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात स्थित्यंतरातील सिनेमा, क्लॅप, पैसा वसूल, यादगार पल, फस्ट डे फर्स्ट शो, काॅर्नर सीट, सिनेमा घर, ओपन थिएटर, बारा ते तीन तीन ते सहा, गल्ला पेटी, सिनेमा मसाला मिक्स इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. २००९ सालापासून ते मुक्त पत्रकार आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. जनसामान्य रसिकांना समजतो आणि आवडतो अशाच पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटांवर आणि त्या विश्वावर त्यांनी कायमच फोकस ठेवला. आणि त्यातूनच त्यांच्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सर्व स्तरांवर खूप ओळखी झाल्या. इसाक मुजावर आणि शिरीष कणेकर हे त्यांचे विशेष आवडते लेखक आहेत. विशेष म्हणजे, चित्रपती व्ही शांताराम फाऊंडेशनच्या ‘शतक महोत्सवी मराठी चित्रपट ‘ या शंभर वर्षातील मराठी चित्रपटांची तपशीलवार माहिती दिलेल्या सूचीच्या संपादनाची संधी त्यांना मिळाली.

चित्रपटविषयक माहिती आणि अनुभवाचा त्यांना जवळपास सर्वच मराठी तसेच काही हिंदी वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देताना, एकाद्या चर्चेत सहभाग घेताना कायमच फायदा होत असल्याचे दिसतेय. टाईम्स ऑफ इंडिया सारख्या इंग्रजी वृत्तपत्रातही त्यांची चित्रपटसृष्टीतील एकाद्या घटनेवर सातत्याने प्रतिक्रिया येत असते. त्यांना या वाटचालीत अनेक पुरस्कार प्राप्त होत आहेत. विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात आलेला चित्रकर्मी पुरस्कार, मराठी पत्रकार संघाच्या वतीने जयहिंद पुरस्कार आणि प्रमोद नवलकर स्मृती पुरस्कार, संस्कृती कलादर्पणच्या वतीने उल्लेखनीय पत्रकार पुरस्कार, इंडिवूड मिडिया एक्सलन्स अॅवाॅर्ड, शिवसेना गिरगाव शाखा पुरस्कार, ‘मी गिरगावकर ‘ दक्षिण मुंबई शिवसेना शाखा पुरस्कार, थर्ड बेल एन्टरटेन्मेन्ट कलातीर्थ पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांचा समावेश होतो. त्यांचे ‘आऊट फोकस ‘ हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

जुन्या चित्रपटाच्या फोटोंचा त्यांच्याकडे उत्तम संग्रह आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2646 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..