नवीन लेखन...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ न्यूयॉर्क मध्ये झाला. २० जानेवारी २०१७ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. डोनाल्ड ट्रम्प हे लोकप्रिय पण तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व. एक उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प यांचा प्रवास आहे. एका जमान्यात डोनाल्ड ट्रम्प एक उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिअल इस्टेटच्या दुनियेतलं सर्वात मोठं नाव मानले जायचे. न्यूयॉर्कच्या क्षितिजावर दिसणाऱ्या गगनचुंबी इमारतीं पैकी ट्रम्प टॉवर, ट्रम्प प्लेस, ट्रम्प पार्क, ट्रम्प प्लाझा… अशा इमारती डोनाल्ड ट्रम्प यांनी उभारल्यात. स्वतः ट्रम्प फ्लोरिडात पाम बीच इथं अलिशान ट्रम्प पॅलेसमध्ये राहतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यावसायिक यशाचंच या इमारती प्रतीक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे वडील फ्रेडरिक ट्रम्पही बांधकाम व्यवसायात होते. ट्रम्प यांनी तो वारसा पुढं नेलाय. गेल्या चाळीस वर्षांत ट्रम्प यांच्या उद्योग साम्राज्याचा पसारा एवढा वाढला, की ते जवळपास १०० कंपन्यांचे मालक बनले. ट्रम्प यांनी विज्ञानशाखेतून शिक्षण घेतलं. कॉलेजच्या दिवसांत एक विद्यार्थी नेता म्हणून आपली ओळख बनवली. खेळाकडेही त्यांचा ओढा होता. पैजा लावणं आणि त्या जिंकणं हा ट्रम्प यांचा छंदच आहे.

एक कुशल वक्ता अशी ट्रम्प यांची ओळख आहे. भाषणं ठोकण्याची आणि गर्दी जमवण्याची कला त्यांना अवगत आहे. अर्थात निवडणुकीआधी हिलरी यांच्यासोबत झालेल्या वादचर्चेत ते काहीसे मागे पडल्यासारखेही वाटले.

टीकाकारांच्या मते ट्रम्प केवळ मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणाबाजी करतात, मी सगळं सुधारेन असं म्हणतात, पण त्यांच्याकडे तशी कोणतीही ठोस योजना दिसत नाही. अनेकदा बोलण्याच्या ओघात ते वादग्रस्त विधानं करतात. बेछूट वक्तव्यं आणि महिलांविषयी अश्लील टिप्पणीमुळं ट्रम्प यांची प्रतिमा काळवंडली होती. ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म अमेरिकेत नाही तर स्लोवेनिया येथे झाला होता. तिथे त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून मॉडेलिंग सुरु केलं. त्यांनी मिलान आणि पॅरिसमध्ये फॅशन मॉडेल म्हणून काम केलं. त्यानंतर त्या 1996 साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांना अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं आणि त्या तिथल्या नागरिक बनल्या.

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प मेलानिया यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा देखील त्या मॉडेलिंग करत होत्या.

डोनाल्ड ट्रम्प यांची लव्ह स्टोरी १९९८ मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प ५२ वर्षाचे होते तर मेलेनिया २८वर्षांच्या होत्या. त्यावेळी ट्रप्प राजकारणात नसून रिअल-इस्टेटमध्ये सक्रिय होते.

संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..