नवीन लेखन...

युरोपायण – पहिला दिवस

मलेशिया, गेंटींग, थायलंड, पटाया, सींगापूर ही आम्हा मध्यमवार्गीयांच्या स्वप्नातील वारी २००७ मधे उरकली आणि अंतरराष्ट्रीय प्रवासाला चटावलो. शारजा-दुबई तर द्वीवार्षिक वहीवाटीनी आमचीच वाटायला लागलीत. मधेमधे भारतातले बरेचसे भाग पहात पहात जवळपासचे भूतान वगैरेही पादाक्रांत केल. नवीन एखाद्या डेस्टीनेशनचा विचार करता करता, अजुन खूप जग बघायच राह्यल असल तरी अचानक सिकंदर सारखा उगाचच जग जिंकण्याच्या ईर्षेनी पेटुन उठलो आणि पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आता युरोपवर स्वारी करायची असा मनसुबा जाहीर केला. तिनेही तात्काळ होकार देउन मला रीटर्न सरप्राइज दिल आणि फेरविचाराला थारा न देता आम्ही #वीणा वल्ड# कडे ” युरोप हायलाईट्सच बुकिंग करुनच टाकल.

वीझा बीझा सर्व सोपस्कार #वीणा# मार्फत उरकुन रेनकोट आणि गरम कपड्यांसह सामानाची बांधाबांध सुध्दा झाली आणि 6 अॉगस्टच्या पहाटे अडीच तीनला टी2 च्या राष्ट्रध्वजापाशी आम्ही हजर झालो. लगोलग वीणाच्या सहप्रवाशांचीही जमवाजमव सुरु झाली. रात्रभराच्या जाग्रणानंतर नउ तासांचा मुंबई-लंडन प्रवास घडणार होता. विमान प्रवेशाची वाट पहात अंदाजे ४० सहप्रवाशात कोण, कुठले वगैरे चाचपणी चालु झाली तर काही जण “पहिले आपच्या” पवित्-यात दुस-यानी पहेल करायच्या प्रतिक्षेत होते.

मुंबई एअरपोर्टच्या बोर्डींग पास, सिक्युरीटी चेक, इमिग्रेशन वगैरे आवश्यक परंतू कंटाळवाण्या दिव्यातुन सहीसलामत पार पडल्यानंतर सुमारे तासभराच्या लेट टेकअॉफनी एअर इंडियाच्या बोइंग 777 विमानात आमच्या आदरातिथ्याला सुरुवात झाली. दोनएक तासानी एअर इंडियाचा बहूचर्चित ब्रेकफास्ट आला आणि समोरच्याच्या सीटच्यामागे लटकवलेल्या तिरक्या फोल्डींग ट्रे टेबलवर स्थिरावला. कंटेनरमधे फोर्कनी एकदीड इंच खणल्यावर त्या उत्खननात घट्ट सांबारमधे जीवाच्या आकांतानी गुदमरणा-या एका ईडलीचा शोध लागला.

कधी काळी जनरल नॉलेजच्या पुस्तकात दर मिनीटाला एक विमान उतरणारा एअरपोर्ट असा उल्लेख वाचल्याच अंधुकस लक्षात असल्यामुळे हिथरो एअरपोर्टवरील लँडिंगची मला जाम उत्सुकता होती. नउ तासानी हीथ्रो विमानतळावर लँड झालो. हॉटेल चेकइनला अजून 2 ते 3 तास अवकाश असल्याने आम्हाला तडक लंडन आय बघायला नेले आणि आमच्या स्वप्नवत युरोपायणाला लंडन आयपासुन विधीव्रत प्रारंभ झाला !

Eye तो होता आणि आम्ही बघायला निघालो होतो त्या ‘आयला’! असो. सकाळचे साडेबारा एक वाजले असतील. दूतर्फा टिपिकल इंग्लिश पध्दतीचे माझ्या अत्यंत आवडीच आर्किटेक्चर, नेटनेटक्या आकृतीबध्द ब्रीटिश कॉलनीज, मधेच बैठी किंवा दुमजली घर, मोठमोठ्या कार कंपन्याच्या शो रुम्स, हॉटेल्स, थेम्स नदी त्यावरील पूल वगैरे पहात पहात एखाद तासात पोहोचलो. पाचेक मिनीटाची 4D फिल्म बघुन महाकाय जायंटव्हीलच्या कूप्यांमधे बसून आम्ही गटागटाने लंडनचा रमणीय आणि लोभस आस्वाद डोळ्यानी टिपायला सज्ज झालो. सगळे अक्षरशः आवाक् झाले होते. 360° त सर्वांची फोटोग्राफी चालू होती. वीणाच्या शिस्तबध्द आणि प्रशिक्षित टूर मँनेजर योगेशच्या मार्गदर्शनानुसार, खेळीमेळीत टूर पुढे सरकायला सुरुवात झाली.

संध्याकाळी हॉटेलवर पोहोचलो. दुस-यादिवशीचा ८ ते ८ कार्यक्रम योगेशने घोषित केला. सकाळी ब्रेकफास्ट आवरुन लंडनभर हुंदडण्यासाठी कपडे चढवताना एक विचार मनात आला की प्रिन्स चार्लस किंवा राणी एलीझाबेथशी आपली आमनेसामने नजारानजर झालीच तर आपल्या अंगावर फॉर्मल कपडे असलेलेच बरे! त्यातल्या त्यात राणी दिसलीच तर, (राखी पौर्णिमा जवळच असल्यामुळे) दोन्ही हात मागे ठेउनच तिला वुइश करायच मनात योजल होत.

— प्रकाश तांबे 

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..