नवीन लेखन...

एक विलक्षण अहवाल

अमेरिकेतील वास्तव्यांत, एक वाचनालयांत वैद्यकीय शास्त्रातील दोन अहवाल वाचण्यांत आले. त्यांचा मतीतार्थ थोडक्यांत असा होता.

PhD. ही शैक्षणिक क्षेत्रातली सर्वोच्य पदवी. कोणत्यातरी विषयाचा अभ्यास, माहीती, संकलन करुन ते नाविन्य विद्यापिठापुढे सादर करुन मान्यता मिळवणे. व जगापुढे ठेवणे. कित्येक विषय नाविन्यपू्र्ण व चमत्कारी असतात. परंतु ज्ञानामध्ये हातभार लावणारे असतात.   वैद्यकीय क्षेत्रातल्या तीन विद्यार्थ्यानी एक विषयाचा अभ्यास व Statistics गोळा केले होते. तो अहवाल वाचण्यांत आला.

Sex अर्थात  लैंगिकता हा त्यांचा विषय.  Sex efficiency, Tolerance, Bodily stimulation, Ecstasy of Joy, Period of excitation, Post sexual exhaustion, Frequency of sexual acts, Duration of sexual act, इत्यादी अनेक प्रश्नांचा त्यांत उहापोह करण्यांत आला होता.

त्याच प्रमाणे अमेरिकेच्या एका वैद्यकीय मासिकांत अतिशय मनोरंजक परंतु माहीतीपर असा लेख वाचण्यांत आला. तेथील एका Statistic Survey Of human body in Sexual Performances ह्याला अनुसरुन तो विषय हाताळण्यांत आला होता. पौर्वात्य जगतांत सेक्स अर्थात लैंगिकता हा अत्यंत साधा व सामान्य विषय आहे. त्याला कोणत्याच अंगानी त्या विषयाच्या कार्याबद्दल तशी कुणालाही उत्सुकता वा मौज हा प्रकार नसतो. जसे कान, नाक, डोळे, इत्यादी अवयवांचे नैसर्गिक कार्ये, त्याच प्रमाणे लैंगिक इंद्रिये व त्यांचे कार्य. ह्या प्रणालीकडे लोक असे बघतात. आमच्याकडे मात्र लैंगिकता हा प्रचंड उत्सुकतेचा, सन्मानाचा, नैतिकतेचा, आणि अध्यात्मिक प्रांतातला विषय बनून राहिला आहे. जीवनात सखोल महत्व लैंगिकतेला ( Sexuality  )दिले गेले आहे. माणसाचे चारित्र्य व लैंगिकता ह्यांचे संबंध गुंफले गेले आहे. ह्यांतही स्त्री लैंगिकता व तिचे चारित्र्य ह्यांना खुपच एकत्र गुंफले आहे.

लेखाचा अहवाल सांगतो की   Sex  अर्थात् लैंगिकतेमध्ये स्त्रियांची लैंगिक क्षमता ही पुरुषांपेक्षा जास्त असते. लैंगिक उत्तेजना पुरुषामध्ये जलद होते, तशी शमूनपण त्वरीत जाते. उलट स्त्रीयांची लैंगिकता उत्तेजित होण्यास अवधि लागतो, परंतु ती बराच काळपर्यंत चेतनामय राहते.

स्त्री एका वेळी अनेक पुरुषाना देखील लैंगिक समाधान देण्यास सक्षम असते. ह्या उलट कोणताही पुरुष एका स्त्रिला देखील परिपूर्ण लैंगिक समाधान देण्यास असमर्थ राहतो. वैद्यकीय शास्त्राने लैंगिक कार्य प्रणालीची जी उकल शास्त्रीय माहीती व Statistic Information वरुन केली आहे, ती जरी ज्ञान प्रधान व मनोरंजक असली तरी कांही व्यवहार, संकल्पना, धार्मिक पकड, ह्या विषयावर प्रकाश टाकणारी आहे. विशेषकरुन स्त्रियावर होत असलेल्या लैंगिक अत्याचारामधील एक वेगळेच दालन त्याने उघडण्याचा प्रयत्न केला आहे.

पूर्व कालीन गणिका अथवा आजकालच्या वेश्या ह्या व्यवसायाला समाजाने मान्याता दिलेली  आहे. ह्याचे एक महत्वाचे कारण, लैंगिकतेच्या संखेच्या मोजमापात स्त्रीयांची क्षमता. ह्या उलट चित्र आहे ते पुरुषी लैंगिकतेचे. तो लैंगिकतेमध्ये प्रचंड उत्साही वाटला तरी फार अल्प काळांत क्षमताहीन होऊन जातो. सर्व उत्साहाचा शक्तीपात होऊन जातो. बंदूकीचे महत्व त्याच्यामध्ये असलेल्या गोळीवरच ठरत असते. गोळी एकदा का सुटली वा गेली, की त्याचे हत्यार एकदम निकामी ठरते. ती व्यक्ती लगेच हातबल होताना दिसते. बंदूकीची गोळी कदाचित् त्वरीत उपलब्ध होऊ शकेलही. परंतु  खऱ्या जीवननांमध्ये पुरुषाना लागणारी लैंगिकतेसाठीची गोळी ( अर्थात विर्य रस ) निसर्गालाच निर्माण करावी लागते. आणि ही आवधी घेणारी प्रक्रिया असते. कांहीना अनेक  दिवस तर कांहीना बराच काळ. पुरुषाची प्रकृति, स्वास्थ, वय, वातावरण, परिस्थीती,  आहार इत्यादी अनेक घटक त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. म्हणून तेवढा काळ तो खऱ्या अर्थाने लैंगिक क्षमताहीन झालेला असतो. त्याची लैंगीकता ही ह्याच कारणाने फार अल्पजीवी ठरते. त्याला वेळेचे गणित अर्थात उपलब्धता आणि क्रिया ह्यांचा ताळमेळ जाणून घ्यावाच लागतो. फक्त चालबाजी, दादागीरी, शारीरिक हातपायातले बळ, शाब्दीक वायफळ बडबड आणि  घृणास्पद हालचाली ह्यातच तो आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुरुष प्रधानकी त्यांत भर घालते. हे सारे तो वैद्यकीय अहवाल वाचल्यावरच जाणवते. व पटू लागते.

एक पुरुष, तसे म्हटले तर एका स्त्रिला देखील लैंगिक सुख समाधान देण्यात कमी पडतो. काय गम्मत आहे बघा. बहू पत्नीची प्रथा. ह्याच पुरुषानी आपल्या शारीरिक ताक्तीने, धर्मबंधनाने, वा इतर कोणत्या कारणास्तव, निर्माण केली. कोणते संपूर्ण लैंगिक सुख समाघान त्या परिस्थीतीत स्त्रियांना मिळाले असेल. बहूपत्नी ही प्रथा आजही कांही समाजात आहे.

नुकताच आपल्याकडील एक शासकिय समाज शास्त्राचा अहवाल वाचण्यांत आला. विचीत्र  व विलक्षण असा. अभ्यासक म्हणतात की आजच्या घडीला भारतात दोन कोटी तरुण पुरुष असे आहेत की जे शरीराने सशक्त , सुद्दढ, व नॉर्मल आहेत. परंतु ते नपुसक आहेत. ते लैंगिकतेमध्ये लैंगिक क्रियासाठी सक्षम  नाहीत. About two cores of young healthy men are sexually incompetent  in performing intercourse. हे प्रमाण प्रचंड आहे. कारणे देखील बरीच असू शकतील. परंतु परिस्थीती चिंताजनक, निराशमय आहे. वैवाहीक जीवनाचा आत्माच  मुळी लैंगिकता हा असतो. भले तो समयबद्ध असेल. परंतु प्रेरणा देणारा व जगण्याचे आमिश दाखवणारा निश्चीतच असतो. वाढत जाणाऱ्या व होऊ घातलेल्या विवाह बंधनातील वितूष्ट अर्थात घटस्फोट  (Divorce ) ह्याच्या कारणामधील “लैंगिक क्षमता ” हेही एक कारण असल्याचा अहवाल सांगतो. आजपर्यंत पुरुष प्रधान सकल्पनेने अशा अनेक व्यंगावर, वागणूकीवर, जबरदस्तीने पांघरुण घातले होते. स्त्रिला ते सहन करावे लागले. व्यसन, दारुबाजी, बाहेरख्यालीपणा, ह्या गोष्टी लैंगिकतेमध्ये प्रचंड बाधा आणतात.

आता विचार मालिका बदलत आहे. मात्र दोघानीही ह्या विषयी समजदारी व संयमाने मार्ग आक्रमण करावा. भावनिक विचारांचा त्यांत गुंता नसावा. लैंगिक शिक्षण अशाना मार्ग दर्शन करेल. हाच त्या अमेरीकन उच्य शिक्षीत विद्यार्थ्यानी आपल्या विषयामधून काढलेला निशकर्ष मला समजला.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..