नवीन लेखन...

एडी चापमन – ब्रिटीशांचा विमानाचा कारखाना उध्वस्त करणारा ब्रिटीश गुप्तहेर

ब्रिटीशांचा विमानाचा कारखाना उध्वस्त करणारा ब्रिटीश गुप्तहेर

लेखाचे शीर्षक विचित्र वाटेल  पण, एडी चापमन विषयी जाणून घेण्याआधी आपण डबल एजंट म्हणजे काय हे जाणून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले.

चापमनचा जन्म १६ नोव्हेंबर १९१४ला इंग्लंडमध्ये बुर्नोफिल्ड गावी झाला. त्याचे वडील मरीन इंजिनीअर होते. वयाच्या १७व्या वर्षी त्याने कोल्डस्ट्रीम गार्ड बाटलिनमध्ये नोकरी सुरु केली. पण लवकरच नोकरीचा कंटाळा आला. थोड्याच दिवसात त्याचे लंडनमधील सोहो भागातील एका मुली बरोबर सुत जुळले  व तो तिच्याबरोबर पळून गेला. त्याला आर्मीने दोन महिन्याने पकडले आणि ८४ दिवसाचा तुरुंगवास दिला. आणि आर्मितून काढून टाकण्यात आले. नंतर चापमन सोहो भागात परतला. त्याच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. तो जुगारखेळणे, छोटेमोठे फ्रोड करणे यात गुंतला. तो लंडनच्या वेस्ट एंड टोळीचा एक प्रसिद्ध तीजोरीफोड्या बनला. अनेकदा तुरुंगाच्या वाऱ्या केल्या. तो व त्याचे सहकारी जेली गेंग म्हणून ओळखू जाऊ लागले. एक दिवस तो आपल्या मैत्रिणी बरोबर जेवत असताना त्याला पोलिसांनी पकडले. आणि आयर्लंडच्या जर्सी तुरुंगात पाठवले. त्याच दरम्यान जर्मनीने आयर्लंडवर कब्जा केला. नंतर त्याला paris मधील यातनातळावर पाठवण्यात आले. तेथे त्याने जर्मन कप्तान गोरीन्गच्या हाताखाली जर्मनीसाठी हेरगिरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला “ ब्रिटिशानी मला जी अपमानास्पद वागणूक दिली आहे त्याचा मला बदला घ्यायचा आहे. ” जर्मनांनी त्यांची कसून माहिती काढली आणि विश्वास बसल्यावर  त्याला स्फोटके तयार करणे,रेडिओ संदेशांची देवाणघेवाण करणे,parachute मधून उतरणे,यात तरबेज केले. आणि एका युद्ध विमानातून parachute मधून इंगलंडमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी पाठवण्यात आले. तो सगळ्या युद्ध साहित्याने सज्ज होता. त्याला सोबत 100 पौंड देण्यात आले होते. त्याला काम दिले होते hetfield येथील हेविलांड युद्ध विमानाचा कारखाना उध्वस्थ करणे.

दरम्यान ब्रिटीश गुप्तहेराना चापमन इंग्लंडमध्ये वावरत आहे याचा सुगावा लागला होता. कारण त्यांनी जर्मन संदेश डिकोड केले होते. त्यांनी चापमनला ताब्यात घेतले, आणि सरळ ब्रिटीश युद्धाच्या मुख्य कार्यालयात नेले. त्यांचा उद्देश होता. चापमनला ब्रिटीशांचा डबल एजंट बनवणे. त्यांनी योजना युद्ध प्रमुखांना सांगितली. ते म्हणाले “ तुमचं काय डोकं फिरले आहे का?,एक साधा तीजोरीफोड्या त्याला तुम्ही डबल एजंट बनवणार ?” पण चापमनची हेरगिरीची पार्श्वभूमी कळल्यावर ते तयार झाले. ब्रिटीश पुढील तयारीला लागले. चापमनला एम15 गुप्तहेर संघटनेत दाखल करण्यात आले. हेविलांड युद्ध विमानासारखाच हुबेहूब  एक बनावट कारखाना जाड पुठ्ठे,पत्रे यापासून बनवण्यात आला. ३० जानेवारी १९४३ला चापमन ने एम 15च्या मदतीने तो बनावट कारखाना उध्वस्त केला. आणि त्याचे फोटो जर्मनांना पाठवून दिले. जर्मनांनी त्यांची पडताळणी केली. आणि कारखाना उध्वस्त झाला असे जाहीर केले. खरे तर कप्तान गोरिंग सारख्या हिटलरच्या अगदी जवळच्या  नामवंत जर्मन अधिकाऱ्याला व गुप्तहेर संगठनेला  उध्वस्त केलेला कारखाना बनावट होता,हे कसे लक्षात आले नाही हे आजवर न उलगडलेले कोडे आहे. उलट क्रॉसआयर्न हा खिताब दिला. व ११०००० राइश्मार्क दिले.

यानंतर एम 15 संग्ठनाने चापमनला जर्मनला पाठवण्याची तयारी केली. तसे संदेश द्वारा चापमनने   जर्मनांना पाठवले . व एक बोट पाठवून देण्यास सांगितले. पण जर्मनांनी बोट न पाठवता त्याला व्हाया पोर्तीगाल जर्मनीत येण्यास सांगितले. ब्रिटिशानी त्याच्याकडून कसून प्रश्नोत्तरे तयार करून घेतले काय विचारले जाईल ,कोणती माहिती काढायची. याची रंगीत तालीम घेतली. व त्यांची रवानगी जर्मनीला केली. ब्रिटीश चापमनची वाटच पहात होते. तो परत आल्यावर जर्मनांसाठी हेरगिरीचे  काम करत होता. जर्मनीला खोटी माहिती पुरवत होता. पण प्रत्यक्षात तो ब्रिटीशांचा गुप्तहेर होता. ब्रिटिशानी त्याची शिक्षा माफ केली. तो पुन्हा जर्मनीला गेला आणि जर्मनीच्या ओस्लो येथे हेरगिरीच्या शाळेत हेरगिरीचे धडे देत असे. त्याबद्दल त्याला जर्मनीने बक्षीसही दिले. युद्ध संपल्यावरही तो गोरिंग चा मित्र होता. हे एक आश्चर्य होते. चापमन ११ डिसेंबर १९९७ला मृत्यू पावला.

— रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..