नवीन लेखन...

ब्रह्मचारिणी – दुसरी माळ

काल आपण माता दुर्गेच्या नवरात्रींपैकी पहिल्या दिवसाच्या पर्वकालातील माहिती पाहिली.आज या कुलोत्पन्न ऊत्सवाचा दुसरा दिवस.दुसरी माळ.आज गुरुवार.गुरु म्हणजे पिवळ्या रंगाचा प्रभाव.आज मातेने पिवळी वस्र परिधान केलेली आहेत अशी श्रध्ददा आहे.दुसर्या माळेला देवी भागवतात अनंत,मोगरा,चमेली,तमर अशा पांढर्या फुलांची माळ घटापर्यंत अर्पण करायची आहे.

जपः-दधाना करपद्माभ्याम् क्षमालाकमण्डलू।
देवी प्सीदतु मणि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ।।

या जपाने ब्रह्मचारिणी मातेची आळवणी करुन जी पूजा मांडली आहे त्या पुजास्थानी स्थीर होण्याचं आवाहन करायचं.यशा मिलीतोपचार द्रव्यांसह पुष्पांनी मातेची मनोभावे पुजा करावी.आजच्या दुसर्या दिवशी.

साक्षात महादेव आपणांस पती लाभावेत अशी इच्छा तिने निश्चित केली होती.त्यासाठी म्हणजे महादेवाला प्राप्त करण्याच्या इराद्याने तीने घोर तपश्चर्या केली.म्हणून तीला “तपश्चारिणी”किंवा ब्रह्मचारिणी ” या नामाभिदानाने ओळखले जाते.

अत्यंत कठीण प्रसंगी ब्रह्मचारिणी मातेची आराधना केली तर ती तिच्या भक्तांना ती पावते अशो श्भाविकांची श्रध्दा आहे.तिचे रुप अत्यंत भव्य असून पूर्ण ज्योतिर्मय आहे.डाव्या हातात जपमाला असुन ऊजव्या हातात कमंडलु धारण केले आहे.ज्ञान आणि वैराग्य यांची प्राप्ती ब्रह्मचारिणी च्या पूजेने होते.शरद ऋतुमध्ये हा ऊत्सव सुरु होतो.वसंताच्या सृजना प्रमाणे जसे वृक्षराजी नवीनतम पालवी फुटून नव्याने सृष्टीला सुशोभित करु लागतात त्याच प्रमाणे या ऊत्सवात नेहमीपेक्षा एक हजार पट अधिक प्रमाणात देवी तत्व पृथ्वीवर कार्यरत असते.म्हणून या कालावधीत “श्री दूर्गादेव्यै नमः”हा जप जितका जास्त करता येईल तितका तो सिध्द होत जातो.

पहिल्या माळेला माता स्वरुप हे “कुमारीके”प्रमाणे आसतं.दोन वर्षाच्या कन्येचं आणि मातेचं निरागस रुप…त्याची आराधना ऐश्वर्यप्राप्ती देते तर दुसर्या माळेची मातेची छबी ही तिन वर्षाच्या कन्ये प्रमाणे असते.त्रिमूर्तिनी हे नाव धारण केलेले आहे.तिच्या पूजनाने भोग आणि मोक्ष प्राप्ती होते.

आज पिवळ्या रंगांचे पदार्थ आहारामध्ये असावेत.पिवळ्या रंगांसह पिवळ्याच्या जवळच्या रंगमालेतील सहरंग देखिल याच प्रकारात येतात.

— गजानन सिताराम शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 22 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..