नवीन लेखन...

ड्रॅगन फ्रूट फळाविषयी

वाढ व आकारासाठी बांधणी – 
ड्रॅगन फ्रूटची योग्य वाढ आणि विकास करण्यासाटी ठोस किंवा लाकडी स्तंभाची उभारणी करणे आवश्‍यक असते. मजबूत व पक्‍क्‍या स्तंभासाठी “आरसीसी सिमेंट क्रॉंक्रीट पोल’ उभारले जातात. अपरिपक्व खोड स्तंभाना बांधावे व बाजूंची (लॅटरल) खोडे ही मर्यादित ठेवून मुख्य 2 ते 3 खोडांची वाढ करावी.

खत व्यवस्थापन 
फळाच्या वाढीसाठी शेणखत किंवा सेंद्रीय खत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. प्रत्येक वनस्पतीला किंवा वेलीला 10 ते 15 किलो शेणखत किंवा सेंद्रिय खत द्यावे. त्यानंतर दरवर्षी सेंद्रिय खतांमध्ये 2 किलोने वाढ करावी. ड्रॅगन फ्रूट फळाला सेंद्रीय खतांप्रमाणेच रासायनिक खतांची सुद्धा आवश्‍यकता असते. बाह्यवृद्धीसाठी व रोपाच्या वाढीसाठी पोटॅश, फॉस्फेट व युरिया यांची गरज भासते.

पाणीव्यवस्थापन – 
ड्रॅगन फ्रूटला इतर फळांच्या तुलनेत कमी पाणी आवश्‍यक आहे. मात्र, लागवडीच्या काळात, फुलोरा व विकास टप्प्यात तसेच कोरड्या, उष्ण हवामानाच्या वेळी पाण्याच्या वारंवार पाळ्या देणे आवश्‍यक आहेत. पाण्याच्या योग्य वापरासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो.

पीक संरक्षण 
या पिकात प्रमुख असे कीड-रोग अद्याप आढळलेले नाहीत. मात्र काही देशांमध्ये बुरशीजन्य रोग आढळले आहेत. अतिवृष्टीत फळगळ होऊ शकते किंवा फळकूज होऊ शकते. अति पाणीदिले गेल्याने फळ लवकर पक्‍वतेत येऊन ते वेलीवरून गळूही शकते. पक्षांचाही या फळांना त्रास होऊ शकतो. खोडांवर जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळांवर तपकिरी डाग येऊ शकतात.

फळ काढणी – 
लागवडीच्या 7 ते 8 महिन्यानंतर फळधारणा सुरू होते. यात मे ते जूनमध्ये फुलधारणेला सुरवात होते व ऑगस्ट ते डिसेंबर या काळात फळधारणा होते. साधारणतः फुलधारणेच्या एका महिन्यानंतर फळ तोडणीसाठी किंवा काढणीसाठी तयार होते. अपरिपक्व फळाचा रंग हिरवा असतो व जेव्हा फळ काढणीला येते तेव्हा त्याचा रंग लाल होतो.

उत्पादन – 
फळाचे उत्पादन हेक्‍टरी 10 टन अपेक्षित आहे. प्रत्येक फळ 300 ते 600 ग्रॅम वजनापर्यंत जाऊ शकते. योग्य व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन व त्याची गुणवत्ता वाढवल्यास व दर चांगले मिळाल्यास ड्रॅगनफ्रूट हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे फळपीक ठरेल यात शंका नाही.

मलेशिया, श्रीलंकेतील लागवड 

मलेशिया, थायलंड, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांत स्वतंत्र व मिश्रशेती पद्धतीतही याची लागवड केली जाते.

हवामान व जमीन-
जमीन योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम असावी. जमिनीचा सामू 6.1 ते 7.5 दरम्यान असावा. वार्षिक पर्जन्यमान 500 ते 1500 मिलिमीटर व याचबरोबर एकाडएक कोरडे व आर्द्रयुक्त हवामान आवश्‍यक असते. या पिकाला चांगला सूर्यप्रकाश मानवतो. मात्र दीर्घकाळ सूर्यप्रकाश या पिकासाठी अनुकूल नसतो. अशावेळी त्याला संरक्षित आच्छादन देण्याची गरज असते. ड्रॅगनफ्रूट हे पीक कमी प्रतिच्या जमिनीला व तापमानातील चढउताराला सहन करू शकते. मात्र कोरडे पाण्याचा निचरा होणारी जमीन अनुकूल असते. सेंद्रीय घटकांचा समावेश असलेली 10 ते 30 टक्के वालुकामय जमीन पिकाच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. वालुकामय जमिनीतही हे पीक येऊ शकते.

लागवड पद्धत – 
मलेशियातील “सेलांगर’ या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचे एकात्मिक शेती या पद्धतीत उत्पादन घेण्यात येते. यासाठी लागवडीकरिता मांडव पद्धतीचा वापर करण्यात येतो. एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंतचे अंतर 1 फूट व दोन ओळींतील अंतर सहा फूट म्हणजेच 1 x 6 फूट ठेवले जाते. या पद्धतीचा वापर करण्यामागचा हेतू की यामुळे वेलीला वर्षभर आधाराची गरज असते.

खते – 
पिकाला दोन्ही पद्धतीने म्हणजेच जमिनीतून खते तसेच पानांवर फवारणी (फोलीअर स्प्रे) या पद्धतीने खते दिली जातात. नत्र, स्फुरद, पालाश आदी खते प्रत्येकी दोन आठवड्यांत वाढीच्या अवस्थेनुसार 10 ते 20 ग्रॅम प्रतिवेल याप्रमाणे दिली जातात. त्याचबरोबर प्रत्येकी दोन आठवड्यांनंतर “फोलीअर स्प्रे’सुद्धा घेतला जातो.

मिश्रपीक
ड्रॅगन फ्रूट सोबत अननसासारखी पिकेही घेतली जातात.
खाञीशीर रोप व आधीक माहिती.
Niyti Agro Narsary , Mangalvedha 
9765528277 , 9561712277

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

13 Comments on ड्रॅगन फ्रूट फळाविषयी

  1. मला ड्रॅगन फ्रूट च्या तापमान बद्दल माहिती हवी आहे..
    उन्हाळ्यात विदर्भातील तापमान सुट होईल काय..

  2. मी पण इच्छुक आहे
    मो.9325922783
    वाटसप नं.7391955086

  3. 1 रोप लावल्या नंतर 1 वर्षांनी फळ येते
    2 1करी 3.5ते 4 लाख रुपये
    3 बटन स्टेज पासून साधारण 90 दिवस फुल उमल्लेके 40 ते 45 दिवस
    आणखी माहिती साठी कॉल करा whatasapp9403180397/
    कॉल 9834850481

  4. मला खालील प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील का?
    १) रोप लावल्यानंतर किती महिन्यांनी फळ लागते?
    २) सरासरी मासिक खर्च किती असतो एक एकेरी साठी ?
    ३) फळ पिकण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..