नवीन लेखन...

डोक्यावर वडीलांचा हात असेल तर..

एका पित्याने अापल्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं.

खूप चांगल्या प्रकारे त्याचं शिक्षण केलं जेणेकरून मुलाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत झाली .

काही काळानंतर तो मुलगा एक यशस्वी व्यक्ती बनला आणि एका मल्टी नैशनल कंपनीचा सी.ई.ओ. बनला.

उच्च पद , भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा त्याला कंपनीकडून प्रदान झाल्यात.

काही दिवसांनी त्याचा विवाह एका सुलक्षणी कन्येशी झाला त्याला मुलंही झाली. त्याचा आपला सुखी परिवार बनला.

वडील अाता म्हातारे होत चालले होते. एक दिवस वडीलांना आपल्या मुलाला भेटायची इच्छा झाली आणि ते मुलाला भेटायला त्याच्या ऑफिस मध्ये गेले.

त्यांनी बघितलं की y मुलगा एका मोठ्या व शानदार ऑफिसचा अधिकारी बनलाय. त्याच्या ऑफिसात हजारो कर्मचारी त्याच्या अधीन राहून काम करता आहेत.

हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !

ते म्हातारे वडील मुलाच्या कॅबिन मध्ये गेले व त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले. आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलाला विचारलं की,

“या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे “?

मुलगा स्मित हास्य करत प्रेमानं म्हणाला ,

“माझ्याशिवाय कोण असू शकत बापूजी?”

वडीलांना त्याच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की त्यांचा मुलगा गर्वाने म्हणेल की, “बापूजी, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात ज्यांनी मला एवढ्या योग्यतेच बनवलं!”

त्यांचे डोळे भरून आलेत. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले.

त्यांनी परत एकदा वळून मुलाला विचारलं की, परत सांग “या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे “?

मुलगा ह्या वेळेस म्हणाला की,

“बापूजी, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती ! ”

वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले,

“अरे आताच तर तू स्वतःला जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतास आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगतो आहेस ” ?

मुलागा हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलला ,

“बापूजी त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. ज्या मुलाच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर तो मुलगा जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना? हो की नाही बापूजी ” !

वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलाला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली.”

खरंच आहे की, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल तर ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतो.

सदैव थोरांचा सन्मान करा, आपल्या यशामागे तेच आहेत.

आपल्या प्रगती व उन्नतिने जेव्हा सगळे जळत असतात तेव्हा फक्त आई वडीलच आपल्या प्रगतीवर खुश असतात.

— सुनील बावधनकर 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..