नवीन लेखन...

‘डिस्को किंग’ संगीतकार व गायक बप्पी लहिरी

बॉलिवूडला ‘रॉक’ आणि ‘डिस्को डान्स’ची ओळख करून देणारे आणि आपल्या संगीताने संपूर्ण देशाला वेड लावणारे ‘डिस्को किंग’ अर्थात सुप्रसिंद्ध संगीतकार व गायक बप्पी लहरी यांची क्रेझ अद्यापही संपलेली नाही. ‘बंबई से आया मेरा दोस्त,’‘आय एम अ डिस्को डान्सर’ पासून ते ‘ऊ लाला ऊ लाला’पर्यंत बप्पींचे गीत आजही लोकांच्या ओठांवर आहेत.

बप्पी लाहिरींनी डिस्को नृत्यांसाठी दिलेल्या चालींमुळे ते डिस्को किंग म्हणूनही ओळखले जातात.

बप्पी लहिरी यांचे आई आणि वडील दोघेही शास्त्रीय गायक आणि कंपोझर होते. त्यांच्याकडूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला. तीन वर्षांचा असताना ते तबला वाजवायला शिकलो. वयाच्या चौथ्या वर्षीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच्या गाण्यासाठी तबला वाजवला होता. या मुळे त्यांना ‘मास्टर बप्पी’ ही ओळख मिळाली. व तेच त्यांचे व्यावसायिक नांव बनले. डिस्को संगीताला नुसते हिंदी चित्रपटात वापरलेच नाही तर त्यात प्रावीण्य मिळवून त्यांनी अशी गाणीही गायली आहेत.

मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे ते लता मंगेशकर अशा सगळ्या महान गायकांसोबत त्यांनी काम केले आहे. अमिताभ ते आमीर आणि जयाप्रदा ते विद्या बालन अशा कलाकार त्यांच्या गाण्यांवर थिरकले आहेत. आता बप्पी दा ‘मोआना’या अ‍ॅनिमेटेड हॉलिवूडपटाच्या माध्यमातून डिज्नी वर्ल्डपणे पाऊल ठेवत आहे.

‘मोआना’ एक अ‍ॅनिमेटेड हॉलिवूडपट आहे. यात त्यांनी ‘शोना’ हे गाणे गायले आहे. शिवाय यातील ‘टमाटोआ’ या कॅरेक्टरला आवाज (व्हाईस ओवर) दिला आहे. टमाटोआ एक महाकाय खेकडा आहे. त्यांनी प्रथमच एका अ‍ॅनिमेटेड हॉलिवूडपटासाठी काम केले आहे.

बप्पी लहरी हे अनेक वर्षांपासून हॉलिवूडमध्ये काम करत आहेत. समंथा फॉक्स, बॉय जॉर्ज, एमसी हॅमर अशा अनेक हॉलिवूड कलाकारांना त्यांनी भारतातही आणले. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका हॉलिवूड अल्बमसाठी गाणे गायले होते.

बप्पी लहिरींनी संधी मिळाली तेव्हा शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर गाणीही तयार केली आहेत. त्यांची डिस्कोवर आधारित गाणी बरीच लोकप्रिय झाली. बप्पी लहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय आहेत. १९८० च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी सारख्या चित्रपटांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले.  काळे चश्मे व दाग-दागिने यांची त्यांना खूप आवड आहे.

बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली.

बप्पी लाहिरी यांचे खरे नाव अलोकेश लहिरी होते. बप्पी लहिरी हे चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जात. सदैव अंगावर सोन्याचे दागिने असलेला संगीतकार म्हणून त्यांची लोकांमध्ये ओळख होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी गायली व अनेक रिॲ‍लिटी शोचे परीक्षक म्हणूनही काम केले आहे.पॉप संगीत भारतात आणण्याचे श्रेयही बप्पीदा यांना जाते. बप्पी लहिरी यांना जन्मापासूनच संगीताचे शिक्षण मिळाले. बप्पी लहिरी यांचे वडील अपरेश लाहिरी हे बंगाली गायक होते. त्यांची आई बन्सरी लहिरी या संगीतकार होत्या. त्यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. तीन वर्षांचा असताना ते तबला वाजवायला शिकले. वयाच्या चौथ्या वर्षीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच्या गाण्यासाठी तबला वाजवला होता. यामुळे त्यांना ‘मास्टर बप्पी’ ही ओळख मिळाली. व तेच त्यांचे व्यावसायिक नांव बनले.

वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत आल्यानंतर बप्पी लहिरी यांना पहिला ब्रेक १९७२ मध्ये आलेल्या बंगाली चित्रपट ‘दादू’ मध्ये मिळाला. नंतर त्यांनी १९७३ मध्ये आलेल्या शिकारी चित्रपटासाठी संगीत दिले. बप्पी लाहिरी यांनी ७० च्या दशकात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि ८० च्या दशकात त्यांनी वर्चस्व गाजवले. प्रत्येक चित्रपटात गाण्यासाठी तो निर्मात्यांची पहिली पसंती असायचा. १९७५ मध्ये आलेल्या ‘जख्मी’ चित्रपटातून बप्पीला ओळख मिळाली. १९८० आणि ९०च्या दशकात बप्पी लहिरी यांनी अनेक जबरदस्त साउंड ट्रॅक बनवले, ज्यामध्ये वारदत, डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स डान्स, कमांडो, गँग लीडर, शराबी यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता. बप्पी दा यांनी गायलेली ‘बंबई से आया मेरा दोस्त, आई एम ए डिस्को डांसर, जूबी-जूबी, याद आ रहा है तेरा प्यार, यार बिना चैन कहां रे, तम्मा तम्मा लोगे ही गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. बप्पी लाहिरींनी डिस्को नृत्यांसाठी दिलेल्या चालींमुळे ते डिस्को किंग म्हणूनही ओळखले जातात.

२०११ मध्ये त्यांनी विद्या बालन अभिनित ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटात ‘ऊ लाला ऊ लाला’हे गाणे गायले, जे सुपरहिट ठरले. या गाण्याने त्याने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा सनसनाटी निर्माण केली. बप्पी दा यांच्या संगीत शैलीचे देशानेच नव्हे तर जगाने कौतुक केले. एका दिवसात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचे श्रेयही बप्पी दा यांना जाते. बप्पी लहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय झाली होती. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन देखील बप्पी दा यांच्या संगीत शैलीने प्रभावित झाला होता. मायकल जॅक्सनने बप्पी दा यांना मुंबईत झालेल्या शोमध्ये आमंत्रित केले होते.

त्यांनी भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला आणि स्वतःच्याही काही रचना गायल्या. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ऐकायला मिळाले होते. ४५ वर्षांच्या आपल्या चित्रपट कारकिर्दीत, बप्पी यांनी ५०० हून अधिक चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत.संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.राजकारणाच्या दुनियेतही हात आजमावण्यात बप्पी दा मागे राहिले नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. बप्पी दा यांनी १९७७ मध्ये चित्रानीसोबत लग्न केले.त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे कुटुंब नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहते.

बप्पी लाहिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..