नवीन लेखन...

दाढावळ

माझ्या मित्राच्या घराण्यात कोणालाच अक्कलदाढ आली नव्हती. बातमी घराबाहेर लीक झाली आणि गावभर पसरत पसरत गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमधे पोहोचली. घराण्याचं पितळ उघड पडून होणारी नाचक्की टाळण्यासाठी मित्राच्या वडिलांनी मला मध्यस्थीची गळ घातली आणि मी गिनीज बुक वाल्यांना बातमी प्रसिध्द करण्यापासून थोपवायच ठरवल. त्यांना पटवुन दिल की चालू पिढीत आणि ते ही शक्यतो माझ्या मित्रालाच अक्कलदाढ यायचा योग दिसतोय. थोड थांबा. त्यासाठी काही ऐतिहासिक आणि शास्त्रीय दाखलेही दिले. गेले बिचारे परत.

मित्र माझ्याच म्हणजे अंदाजे १६ वर्षांचा होता तेंव्हा. दंताळे डॉक्टरांकडून मित्राच्या सध्या उपस्थित असलेल्या दातांचा रितसर सर्व्हे करुन अक्कलदाढ चुकुन दुसरीकडे न आल्याची खात्री केली. उपचारांना वेग आला. मित्राची आई अक्कलकोटला जाऊन हस्तीदंत चढवण्याचा नवसही बोलली. अक्कलदाढेचा अंकूर फुटण्यासाठी, कडधान्य ओल्या फडक्यात बांधतात तसे दोन्ही गाल कव्हर होतील अशारितीने मित्राचा चेहरा रात्री ओल्या फडक्यात गुंडाळायला सुरुवात केली. दर आठवड्याला दंताळे डॉक्टर दातांची जातीनी तपासणी करु लागले.

चार आठवड्यातच भल्या पहाटे फोन खणखणला आणि आनंदाने कातरलेल्या आवाजात मित्राच्या वडीलांनी मला ताबडतोब बोलवून घेतलं आणि माझी तर्जनी थेट मित्राच्या जबड्याच्या उजव्या कोप-यात उगवलेल्या अंकूराशी भिडवली. मी दंताळे डॉक्टरांनाही होम व्हिजीटसाठी बोलावून घेतलं. जबड्याची उघडझाप करुन मित्र अस्वस्थ झाला होता. दंताळ्यानी पेन्सिलचा छोटा तुकडा तात्पुरता डोअर क्लोझर म्हणून फिट केला आणि पहाणीकरुन मला सांगितलं की होय तुमच्या मित्राच्या तोंडात वाढतोय तो घराण्याच्या पहिल्यावहिल्या अक्कलदाढेचाच अंकुर आहे.

मित्राच्या आईनी नवस फेडण्यासाठी केरळहुन फ्रेश आणि खात्रीशीर हस्तीदंत मागवलाय. गिनीज बुक अॉफ वल्ड रेकॉर्डनी मित्राचा पूर्ण वाढलेल्या अक्कलदाढेसकट “आ” केलेला फोटो कव्हरपेजला प्रसिध्द करायच अश्वासन दिलय.

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..