नवीन लेखन...

मगरी – दोन पायांवर चालणाऱ्या!

मगर ही चार पायांवर चालते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, दोन पायांवर चालणाऱ्या मगरी तुम्हाला माहीत आहेत का? अशा मगरी अस्तित्वात होत्या. परंतु अलीकडच्या काळात नव्हे, तर अकरा ते बारा कोटी वर्षांपूर्वी – ज्या काळात डायनोसॉरचं राज्य होतं त्याकाळात. या मगरी मागच्या दोन पायांवर चालत असत. या मगरींचे पुढचे दोन पाय मागच्या दोन पायांपेक्षा लहान होते. दोन पायांवर चालणाऱ्या या मगरींचा शोध दक्षिण कोरियातील सॅचिऑन जाह्ये-री येथील उत्खननात लागला. हा प्रदेश त्या काळी तलावांनी भरला होता. इथल्या, त्या काळी चिखलानं भरलेल्या जमिनीवर, सापडलेल्या पावलांच्या खुणांवरून हा शोध लागला. हे संशोधन दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांतील संशोधकांनी मिळून केलं आहे.

डायनोसॉरच्या या युगात, अनेक डायनोसॉर हे दोन पायांवर चालत होते. तरीही या खुणा मात्र डायनोसॉरच्या नक्कीच नव्हत्या. संशोधकांना प्रथम या पाऊलखुणा एखाद्या टेरॉसॉर, या उडणाऱ्या सरीसृपाच्या असण्याची शक्यता वाटली. टेरॉसॉर हा चिखलानं भरलेल्या जमिनीवरून चालताना त्या निर्माण झाल्या असाव्यात. परंतु डायनोसॉर किंवा त्यापासून उत्क्रांत झालेले पक्षी हे त्यांच्या चवड्यावर चालतात. याउलट मगरी चालताना आपले पूर्ण पाऊल जमिनीवर टेकतात. संशोधकांना सापडलेल्या या पाऊलखुणा पूर्ण पावलाच्या होत्या व या पाऊलखुणांचे मगरींच्या पाऊलखुणांशी साम्य होते. या सर्व पुराव्यावरून या पाऊलखुणा क्रोकोडायलोमॉर्फ या आजच्या मगरीच्या पूर्वजाच्या असल्याचं शास्त्रज्ञांना वाटतं. या मगरींनी आपलं शेपूट जमिनीवर टेकल्याचा कोणताही पुरावा या संशोधकांना आढळला नाही. त्यामुळे संशोधकांनी मगरींचे हे पूर्वज दोन पायांवर चालत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पाऊलखुणा सुमारे एकवीस सेंटिमीटर लांबीच्या आहेत. संशोधकांच्या तर्कानुसार दोन पायांवर चालणाऱ्या या मगरींची लांबी सुमारे तीन मीटर असावी.

— डॉ. राजीव चिटणीस.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..