नवीन लेखन...

क्रिकेटपटू रसी मोदी

रुस्तमजी शेरीयार ‘ रुसी ‘ मोदी यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२४ रोजी मुंबईत झाला.
क्रिकेटमध्ये तर त्यांनी बालपणीच आपले कसब दाखवायला सुरवात केली. सुरत येथील शाळेचे नेतृत्व त्यांनी केले होते. वयाच्या १४ व्या वर्षीच सुरतच्या स्थानिक पंचरंगी सामन्यात त्यांनी पारशी संघातर्फे भाग घेतला. शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यावर ते सेंट झेव्हियर्सतर्फे खेळू लागले. केवळ क्रिकेटचं नव्हे तर टेनिस , बॅडमिंटन आणि टेबलटेनिसमध्येही ते कॉलेजकडून खेळले. वयाचे १७ वे वर्ष लागते न लागते तोच त्यांनी रोहिंग्टन बारिया स्पर्धेत मुबई विद्यापीठाकडून २५३ धावा केल्या आणि त्याच वर्षी प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये प्रवेश करून पारशी संघाकडून खेळताना १४४ धावा केल्या होत्या ती स्पर्धा होती पंचरंगी सामन्याची आणि प्रतिपक्ष होता युरोपिअन संघ , साल होते १९४१-४२. मात्र त्यांची रणजी सामन्यातील सुरवात मात्र थोडी खराबच झाली. १९४३-४४ च्या हंगामात ते मुबई संघाकडून खेळत होते बडोद्याविरुद्ध, त्या सामन्यात ते पहिल्या डावांमध्ये केवळ एक धावेवरच बाद झाले. परंतु पुढल्या दोन सामन्यात मात्र त्यांनी दणकून धावा काढल्या. महाराष्ट्राविरुद्ध त्यांनी १६८ धावा केल्या आणि वेस्ट इंडिज विरुद्ध १२८. १९४६ साली इंग्लडमध्ये लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रुसी मोदी यांनी ५० मिनिटात ५७ धावा केल्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या कारण त्या सामन्यात अलेक बेडसरने ४९ धावत ७ विकेट्स घेतल्या होता म्ह्णून त्या महत्वाच्या धावा होत्या.
१९४८-४९ चा हंगाम म्हणजे रुसी मोदी यांच्या कारकिर्दीचे शिखरच म्हणावे लागेल. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदाच भारतात आला होता. दोघांमधली पहिली कसोटी मालिका इथेच झाली. दहा डावात ऐकूण ५६० धावा , प्रत्येक टेस्टमध्ये एकतरी अर्धशतक काढायचा मान त्यांना मिळाला. याशिवाय मुंबईच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ११२ धावांचे शतक त्यांनी काढले. मुंबईच्या टेस्ट मध्ये त्यांच्या अंगात ताप होता . त्यांनी भारताला यशाच्या जवळ आणून ठेवले पण ६ धावा कमी पडल्या. या सामन्यात त्यांनी ८६ धावा केल्या आणि विजय हजारे यांच्याबरोबर ४ थ्या जोडीत १३९ धावांची भागीदारी केली. प्रायर जोन्स , जॉन गोडार्ड आणि जेरी गोमेझ यांच्या कौशल्यपूर्ण गोलंदाजीच्या दडपणाखाली ते कामगिरी असल्यामुळे ती मोलाची ठरते.
रुसी मोदी यांनी प्रथम दर्जाच्या कारकिर्दीत ऐकून ७५२९ धावा काढलेल्या आहेत त्या ५३.०२ अशा सरासरीने . ते ऐकूनण १० कसोटी सामने खेळले त्यात धावा निघाल्या ७३६ म्हणजे सरासरी ४६. रणजी स्पर्धेत भरघोस अशा ८१.६९ सरासरीने त्यांनी ऐकून २६९६ धावा काढल्या आहेत. रुसी मोदींची ही सरासरी विजय मर्चन्ट यांच्या ९८.३५ या सर्वात अधिक धावांच्या सरासरीनंतर दुसऱ्या क्रमांकाची ठरते. रुसी मोदी यांनी कसोटी सामन्यात १ शतक तर ६ अर्धशतके केली आहेत. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी २० शतके आणि १९ अर्धशतके केली आहेत.
भारतात रुसी मोदी यांनी १९४५ साली वयाला २१ वर्ष पूर्ण झाले. त्यापूर्वी ते डाव खेळले त्याची सरासरी ब्रॅडमनपेक्षा जास्त म्हणजे १०१.२७ धावा. तेव्हा दोन ब्रॅडमॅनची सरासरी होती. ७८.०० . त्यात रुसी मोदींची १० शतके तर डॉन बर्डमॅन यांची नऊ शतके. त्यावेळी रुसी मोदी खेळले होते २६ डाव तर डॉन ब्रँडमन ३४ डाव. खेळाडूंना हल्ली जशी कसोटी सामना खेळण्याची वारंवार संधी मिळते तशी संधी २५ वर्षांपूर्वी मिळत असती तर रुसी मोदी यांच्यासारख्या गुणी खेळाडूने किती आणि कोणते विश्वविक्रम केले असते याची कल्पनाच केलेली बरी.
रुसी मोदींनी अनेक विक्रम केले आहेत १९४४-४५ च्या हंगामात १००८ धावा केल्या . सर डॉन ब्रॅडमनच्या तोडीची २१०.६ अशी बिनतोड सरासरी गाठली होती . त्यांनी रणजी ट्रॉफीच्या पाच डावात पाच शतके केली होती. १९४३-४४ आणि १९४४-४५ या दोन हंगामात झालेल्या सात रणजी सामन्यात त्यांनी लागोपाठ ७ शतके केली आहेत.
रुसी मोदी यांनी पहिला कसोटी सामना २२ जून १९४६ रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लडविरुद्ध खेळला तर शेवटचा सामना पाकिस्तान विरुद्ध मुबईच्या विरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर १३ नोव्हेंबर १९५२ रोजी खेळाला. रुसी मोदी यांनी ‘ सम इंडियन क्रिकेटर्स ‘ हे पुस्तक लिहिले असून त्यात भारताच्या २३ महत्वाच्या क्रिकेटपटूंवर लिहिले आहे त्याला सर डॉन बर्डमन यांनी ‘ प्रस्तावना ‘ लिहिली असून त्याचा मराठीत अनुवाद बाळ. ज. पंडित यांनी केला असून हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
अशा भारताच्या विक्रमवीर खेळाडूचे १७ मे १९९६ रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमच्या पॅव्हेलियनमध्ये हृदयविकाराच्या झाले.
— सतीश चाफेकर.
Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..