नवीन लेखन...

क्रिकेटपटू के.जयंतीलाल

हिरजी केनिया जयंतीलाल यांचा जन्म १३ जानेवारी १९४८ साली हैदराबाद येथे झाला. त्यांचे मित्र त्यांना त्यावेळी ‘ मुन्ना ‘ या टोपण नावाने हाक मारत असत. जयंतीलाल सर ह्यांची कसोटी क्रिकेटची कारकीर्द म्हणाल तर अल्प आहे . परंतु ती तशी का झाली ह्याला आमच्या माधव आपटे सरांच्या शब्दात सांगायचे झाले तर , ‘ क्रिकेट हा अत्यंत क्रूर खेळ ‘ आहे असेच म्हणता येईल . कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येणार नाही , तसाच काहीसा प्रकार जयंतीभाई ह्यांच्या बाबतीत घडला होता.

जयंतीभाई यांच्या घरामध्ये क्रिकेटचे वातावरण होते त्यांचे बंधू प्रेमजीभाई हैदराबाद टीमकडून खेळत असत . जयंतीभाई म्हणतात मी चौथ्या वर्षी पोहायला शिकलो तो पहिल्याच दिवशी , सुरवातीला पाठीला डबा बांधला आणि ,त्याच दिवशी जरा वेळाने , डबा सोडला , मला पोहता येऊ लागले त्याचप्रमाणे वयाच्या ६ व्या वर्षी मला माझ्या भावाने क्रिकेटच्या मैदानावर नेले. पुढे जयंतीलाल यांना पी. के. मानसिग यांनी खूप आधार दिला होता त्यांच्या क्लब कडून ते अनेक वेळा खूप देशांमध्ये क्रिकेट खेळले. पुढे पी. के . मानसिग यांनी अत्यंत परिश्रमपूर्ण हैदराबाद क्रिकेटवर पुस्तक काढले त्यामध्ये जयंतीलाल सरांचाही सहभाग होता.

जयंतीभाई यांनी विविक वर्धिनी स्कुल मधून आणि निझाम कॉलेजमधून क्रिकेट खेळले. शाळेमध्ये शाळेच्या टीमचे ते कप्तान होते त्यावेळी त्यांनी १६९ धावा काढल्या होत्या. अंडर-१९ गुलाम अहमद ट्रॉफी ते खेळले. गुलाम अहमद ट्रॉफी जिंकल्यानंतर साऊथ झोनकडून कूच बिहार ट्रॉफी ते खेळले. जयंतीभाई उत्तम गोलंदाज तर होतेच परंतु फलंदाजही होते ते हुक , पूल, असे फटके सहजतेने मारण्यात तरबेज होते. १९६७ साल त्यांना खूप चांगले गेले त्या वर्षी ते उस्मानिया विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफी खेळले त्यानंतर साऊथ झोनकडून विझी ट्रॉफी टूर्नामेंट खेळले. रोहिंग्टन ट्रॉफी खेळताना त्यांनी सुनील गावस्कर यांचा २११ धावांचा रेकॉर्ड मोडला होता जयंतीभाई यांनी २१८ धावा केल्या होत्या.
जयंतीभाई यांनी हैदराबाद कडून खेळताना त्यांच्या पहिल्याच रणजी सामन्यामध्ये आंध्रच्या विरुद्ध गुंटूरमध्ये १९६८-६९ मध्ये ६९ धावा केल्या आणि त्यानंतर १५३ धावा केल्या. हैद्राबादकडून पहिल्याच सामन्यामध्ये १०० धावा करणारे दुसरे होते . १९७१ मध्ये साऊथ झोनकडून दुलीप ट्रॉफी खेळताना त्यांनी सगळ्यांना इंप्रेस केले होते.

मुंबईला सी.सी.आय. यामध्ये दुलीप ट्रॉफीचा सामना होता तो सामना वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन असा होता. त्यावेळी पण जयंतीभाई यांनी दणकून हुक , पूल, चे फटके मारले होते त्यावेळी कप्तान चंदू बोर्डे होते. सी.सी.आय. ला खेळ झाल्यावर विजय मर्चंट जयंतीभाई जवळ आले सांगितले आज तुझा वाढदिवस आहे तुला ‘ बर्थ डे ‘ गिफ्ट देत आहे ते म्हणजे वेस्ट इंडिजच्या टूरसाठी तुझी निवड केली आहे.

वेस्ट इंडिजमध्ये रोहन कन्हाय यांनी त्यांना खूप मदत केली. गयानामधील सामन्यामध्ये त्यांनी ६९ आणि १२० धावा काढल्या. त्याआधी सुनील गावस्कर यांच्या बोटाला जखम झाली होती , त्यावेळी संघ अमेरिकेमध्ये होता तेव्हा जयंतीभाई सुनील गावस्कर यांना म्हणाले आपले ओळखीचे डॉक्टर अमेरिकेमध्ये आहेत तू जखम ऑपरेट करून घे म्हणजे टूरवर पुढे तुला प्रॉब्लेम येणार नाही. सुनील गावस्कर यांनी हाताची जखम साफ करून घेतली ५-६ दिवस विश्रांती त्यांना घ्यावी लागली त्यामुळे त्यांचा पहिला सामना हुकला , सलामीची जोडी जयंतीलाल आणि सुनील गावस्कर होती त्यामुळे गावस्कर यांच्या जागी जयंतीलाल बरोबर दुसरा खेळाडू आला.

पहिल्या इनिंगमध्ये जयंतीलाल यांचा उत्तम पण कठीण झेल सर गॅरी सोबर्सने घेतला जेव्हा जयंतीलाल यांच्या ५ धावा होत्या. त्या सामन्याची दुसरी इनींग झाली नाही आणि सुनील गावस्कर यांची जखम बरी झाली आणि सलामीला सुनील गावस्कर खेळण्यास आले जयंतीभाई कायमचे संघाबाहेर गेले ते गेले त्यांच्या नशिबी प्रचंड गुणवत्ता असून एका ‘ कॅच ‘ ने त्यांची करिअर संपली तर दुसरीकडे सोबर्सकडून सुनील गावस्कर यांना दोनदा जीवदान मिळाले ते ५ आणि ७ धावा असताना तेव्हा सुनील गावस्कर यांनी शतक केले. त्या सिरीजमध्ये जयंतीलाल यांना खेळता आले नाही आणि १९७१ मध्ये इंग्लंडला गेले असतानाही त्यांना कसोटी क्रिकेटसाठी संधी मिळाली नाही. जर तसे घडले असते तर नेहमी ते सुनील गावस्कर यांच्याबरोबर सलामीला खेळावयास आले असते.

ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे क्रिकेटमध्ये ‘ लक ‘ हा फॅक्टर असतो आणि दुसरा म्हणजे पाठीमागे सपोर्ट , कदाचित हा सपोर्ट जयंतीभाई यांना कमी पडला. परंतु ते मात्र शांत आहेत , ते सांगत होते वेस्ट इंडिजला सुनील गावस्कर खेळायला जाण्याआधी जयंतीलाल यांना शेक हॅन्ड करून गेले आणि सुनील गावस्कर यांनी शतक केले असे आणखी दोनदा झाले . सुनील गावस्कर यांनी जयंतीलाल यांच्याशी शेक-शेक हॅन्ड केले आणि खेळण्यास गेले की गावस्कर शतक करीत असत , हे सुनील गावस्कर यांनाही जाणवले आणि तिसऱ्या का चौथ्या वेळी जयंतीलाल यांना शेक हॅन्ड करायला आले असताना जयंतीलाल ग्रीन रूम मध्ये बाथरूमला गेले होते आणि तो शेक हॅन्ड काही झाला नाही आणि गावस्कर यांचे शतकही झाले नाही. म्हणजे जयंतीलाल हे सुनील गावस्कर यांना सर्वार्थाने लकी ठरले , असे किस्से क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चिले जातात.

जयंतीलाल यांनी ९१ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये ४६८७ धावा केल्या त्यामध्ये त्यांनी सर्वात जास्त १९७ धावा केल्या त्यामध्ये त्यांनी ८ शतके आणि २२ अर्धशतके केली तसेच ६ विकेट्स घेतल्या. जयंतीलाल यांनी ४४ रणजी सामन्यामध्ये २३८४ धावा केल्या त्यामध्ये सर्वोच्च धावा होत्या १९७ तसेच त्यामध्ये त्यांची ५ शतके आणि ७ अर्धशतके होती.

जयंतीभाई याना आजही अनेक वेळा भेटत असून ते माझ्या डोबिवलीच्या घरी , स्वाक्षरी संग्रहालयात आले होते ,त्यांनी माझ्या स्वाक्षरीच्या घरात येऊन स्वाक्षरी केलेली आहे.

आज जयंतीलाल हे अनेक क्रिकेट संघाना कोचिंग देतअसून अनेक भावी खेळाडू घडवत आहेत .

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..