नवीन लेखन...

क्रिकेटपटू जॉन ग्लिसन

 

जॉन विलियम्स ग्लिसन याचा जन्म १४ मार्च १९३८ रोजी न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रलिया येथे झाला. त्याचे वडील डेअरी फार्मर होते. तो अत्यंत युनिक गोलंदाज होता असे म्हटले जाते, तसेच तो बेस्ट फलंदाज होता जो शेवटच्या फळीमध्ये फलंदाजी करत असे. तो लेगस्पिन गुगली टाकत असे. ती त्याच्या हाताच्या बोटांची करामत होती जी सामान्य माणसाप्रमाणे नव्हती. वयाच्या १५ वर्षाचा असताना तो पोस्टमास्तर जनरलच्या ऑफिसमध्ये काम करत असे. त्याने त्याच्या त्या दोनबोटांचा योग्य पद्धतीने वापर करून गोलंदाजी करण्यास सुरवात केली. दोन सरळ बोटे आणि अंगठा याच्या मदतीने त्याने नवीन गोलंदाजीची टेक्निक आत्मसात केले. तो जॅक लँव्हर्सन प्रमाणे गोलंदाजी टाकू लागला. त्याचा त्याला फायदा होऊ लागला.

जॉन ग्लिसनला विकेटच्या हिरव्या सरफेसवर गोलंदाजी करण्यास आवडत असे. तो गोलंदाजी अचूक करत असे आणि त्याच्या गोलंदाजीचे विशेष हा डिफेन्सिव्ह होता कारण जास्त धावाही जाऊ नयेत म्हणून तो जागरूक असे परंतु पडूही मात्र त्याच्या हातून धावा जास्त जाऊ लागल्या. फलंदाजाला टग्लिसनचे चेंडू खेळताना अत्यंत सावधपणे त्याच्या पॅड्सची हालचाल करावी लागे म्हणजे पायांची हालचाल सावधपणे करावी लागे. कारण त्याचा गुगली चेंडू पायावर आदळून तो एल.बी. डब्लू. होण्याची शक्यता जास्त असे. १९६६-६७ मध्ये शेफील्ड शिल्डसाठी तो पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन सीझनमध्ये खेळला तेव्हा त्याने ६ सामन्यात २३ विकेट्स घेतल्या. तर १९६६ च्या सीझनमध्ये त्याने पाच चेंडूंमध्ये ४ विकेट्स घेतल्या त्यामध्ये एक हॅट – ट्रिक होती त्याने सिडने ग्रेड गेममध्ये ५ बाद २८ अशा त्याने व्हिक्टोरियाच्या विरुद्ध घेतल्या होत्या पण त्यापूर्वी त्याचे ऑस्ट्रेलियाच्या सेकंड टीमसाठी त्याची न्यूझीलंडविरुद्ध वर्षाअखेर होणाऱ्या सामन्यामध्ये त्याची निवड झाली होती.

तो त्याचा पहिला कसोटी सामना २३ डिसेंबर १९६७ रोजी अँडलेटला भारतीय संघाविरुद्ध खेळाला. त्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या इनिंगमध्ये २८ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये ३८ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. परंतु बाकी तीन सामन्यामध्ये त्याला कमी यश आले. त्यावेळी त्याला त्या सिरीजमध्ये २८.५५ या सरासरीने एकूण ९ विकेट्स मिळल्या.

१९६८ मध्ये परत तो अँशेस साठी परत सिलेक्ट झाला तो इंग्लंडच्या संघाविरुद्ध त्यावेळी ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या टूरवर गेली होते तेथे त्याने ३४.६६ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या. १९६९-७०मध्ये त्याच्या हाताची किंमत इतकी वाढली की त्याचा हाताचा १०, ००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा विमा काढण्यात आला.

त्याने त्यानंतर २ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये १८ विकेट्स घेतल्या. तसेच केप टाऊनच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये त्याने पाच विकेट्स घेतल्या. तर तिसऱ्या जोहान्सबर्गच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये ५ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फक्त त्याच्याकडे गोलंदाजी करताना बघत होते आणि त्याच्या गोलंदाजीच्या अँक्शन समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. विशेषतः दक्षिण आफ्रिकेचा बॅरी रिचर्ड्स, त्यावेळी तो वयाने लहान होता कारण त्याने त्याला बाद केले होते, त्यावेळी त्याने ३८.९४ या सरासरीने ग्लिसनने १९ विकेट्स घेतल्या. १९७०-७१ मध्ये ग्लिसन ऑस्ट्रेलियाचा सर्वात टॉप विकेट टेकर होता. परंतु कधी कधी त्याचे काही चेंडू अत्यंत ‘ लूज ‘ पडत आणि इंग्लंडचे खेळाडू त्याचा खरपूस समाचार घेत असत असत असे १९६८ मध्ये घडले होते. परंतु १९७१-७२ मध्ये डोमेस्टिक क्रिकेट सीझनमध्ये त्याने १६.३१ च्या सरासरीने ४५ विकेट्स आठ सामन्यामध्ये घेतल्या होत्या. तर त्यामध्ये १९ विकेट्स लागोपाठ २ सामन्यामध्ये घेतल्या होत्या. ग्लिसनला १९७२ च्या टूरसाठी परत बोलवण्यात आले परंतु ३ कसोटी सामन्यानंतर त्याला ड्रॉप करण्यात आले कारण त्याने ५२.३३ च्या सरासरीने फक्त ३ विकेट्स घेतल्या होत्या.

जॉन ग्लिसन यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना १३ जुलै १९७२ रोजी खेळला तर ते फर्स्ट क्लास क्रिकेट १९७५ पर्यंत खेळत होते. निवृत्तीनंतर ते वर्ल्ड सिरीज कमिटीवर होते तसेच त्यांनी ४० वर्षे टेलिकॉम कंपनीत, ऑस्ट्रेलिया टेलीकम्युनिकेशन कंपनीत नोकरी केली.

त्यांचे ७ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..