नवीन लेखन...

क्रिकेटपटू जॉर्ज गिफन

जॉर्ज गिफन यांचा जन्म 27 मार्च 1859 रोजी दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये नॉरवूड येथे झाला. त्यांचे वडील सुतार होते. जॉर्ज गिफन हे दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळले. ते ऑस्ट्रेलियाच्या संघात मधल्या फळीमधून क्रिकेट खेळत होते. त्यांनी त्यांचे फर्स्ट क्लास क्रिकेट 1877 ते 1904 पर्यंत खेळले. 1877 मध्ये ते पहिल्यांदा दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून ईस्ट मेलबोर्नच्या संघाविरुद्ध खेळले जो संघ तेथे पाहून म्हणून खेळण्यास आलेला होता. त्यावेळी त्यांनी 16 आणि 14 धावा केल्या. नोव्हेंबर 1977 मध्ये त्यांनी पहिल्यांदा फर्स्ट क्लास क्लास क्रिकेट सामना खेळला तो टास्मानियाच्या विरुद्ध. त्यावेळी जॉर्ज गिफन यांनी 47 धावा केल्या आणि 16 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या त्या पहिल्याच इनिंगमध्ये. त्यावेळी टास्मानियाला फॉलो – ऑन दिला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये गिफन यांनी पार्ट दोन विकेट्स भेटल्या. त्यानंतर त्यांच्या खेळण्यात खंड पडला परंतु नोव्हेंबर 1880 मध्ये त्याची मेलबॉर्न येथील व्हिक्टोरिया विरुद्ध खेळताना त्यांनी 3 आणि 63 धावा केल्या तर पहिल्या इनिंगमध्ये 47 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. तर त्याच सीझनमधील अँडलेटच्या सामन्यात त्यांनी 59 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. तो सामना व्हिक्टोरियाने 151 धावांनी जिंकला होता. त्यानंतर त्यांनी सातत्याने दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळ सुरु ठेवला. परंतु जेव्हा जेव्हा ते गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करत असत तेव्हा त्यांची फलंदाजी कमकुवत होत आहे असे त्यांना वाटत असे.

जॉर्ज गिफन यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध मेलबोर्न येथे 31 डिसेंबर 1882 रोजी खेळला. ह्या सामन्यात जिवन यानिओ मधल्या फळीत खेळताना 30 धावा केल्या परंतु पहिल्या इनिंगमध्ये त्यांना 3 षटके मिळाली तरीपण विकेट मिळाली नाही. हा सामना पुढे अनिर्णित राहिला. ते दुसरा कसोटी सामना खेळले नाहीत परंतु तिसऱ्या सामन्यात त्यांनी फक्त तीन धावा केल्या, ह्या सामन्यात त्यांना गोलंदाजी मिळाली नाही. पाढे पाच कसोटी सामना त्या सीरिजमधला ते खेळले. ह्या सामन्यात मात्र त्यांना पहिल्या दोन कसोटी विकेट्स मिळाल्या त्या विलीयम स्कॉटन आणि जॅक ब्लॅकहॅम यांच्या.

1882-83 च्या अँशेस सिरीजमध्ये पहिल्या मेलबॉर्न येथे झालेल्या सामन्यामध्ये त्यांनी 36 धावा केल्या तर त्यांनी इंग्लंडच्या 38 धावांमध्ये 4 विकेट्स घेळत्या आणि तो सामना ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सनी जिंकला. दुसऱ्या इनिंगमध्ये ते ‘ गोल्डन डक ‘ झाले म्हणजे पहिल्याच चेंडूवर बाद झाले परंतु त्यांनी इंग्लंडच्या त्या इनिंगमध्ये ८९ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या.

तर व्हिक्टोरियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी एक सामन्यात 17 विकेट्स घेतल्या त्यापैकी त्यांनी 91 धावा देऊन 9 विकेट्स एक इनिंगमध्ये त्यावेळी घेतल्या आणि 100 च्यावर धावा देखील केल्या. तर 1891 मध्ये त्यांनी परत 271 धावा दक्षिण ऑस्ट्रलियाकडून खेळताना केल्या आणि 96 धावा मध्ये 9 विकेट्स आणि 70 धावामध्ये 7 विकेट्स दोन्ही इनिंग्समध्ये घेतल्या.

जॉर्ज गिफन यांनी 31 कसोटी सामन्यात 1238 धावा 23.35 च्या सरासरीने केल्या त्यामध्ये त्यांनी एक शतक आणि सहा अर्धशतके केली. त्यांची कसोटी सामन्यामधील सर्वोच्च धावसंख्या होती 161 धावा तसेच त्यांनी 27.09 च्या सरासरीने 103 विकेट्स घेतल्या. त्यामध्ये त्यांनी 117 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या आणि 24 झेलही पकडले. त्यांनी 251 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 11,758 धावा केल्या त्या 29.54 च्या सरासरीने तसेच त्यामध्ये 18 शतके आणि 54 अर्धशतके होती. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती 271 धावा तसेच त्यांनी 21.29 च्या सरासरीने 1023 विकेट्स घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट्स 95 वेळा घेतल्या. तसेच त्यांनी एका इनिंगमध्य 66 धावा देऊन सर्वच्या सर्व म्हणजे 10 खेळाडू बाद केले तसेच 195 झेल घेतले. त्यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 10 ऑगस्ट 1996 रोजी ओव्हल वर इंग्लंडविरुद्ध खेळला.

जॉर्ज गिफन यांचे 29 नोव्हेंबर 1927 रोजी दक्षिण ऑस्ट्रेलिया मधील अँडलेट येथे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..