नवीन लेखन...

क्रिकेटपटू डेव्हिड शेपर्ड

डेव्हिड शेपर्ड यांचा जन्म 6 मार्च 1929 रोजी इंग्लंडमधील सरे येथे झाला. हे अंपायर डेव्हिड शेफर्ड म्हणून होते ते हे नव्हे , त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटचे 282 सामने खेळले होते परंतु एकही कसोटी सामना खेळलेला नव्हता. परंतु हे डेव्हिड शेफर्ड इंग्लंडमधील मोठ्या चर्चमध्ये बिशप म्हणून होते तसेच ते तरुणपणी एनाल्ड आणि ससेक्स साठी क्रिकेट खेळले. ते त्यावेळी कसोटी क्रिकेट खेळणारे पहिले मिनिस्टर होते. तसे त्यानंतर 1953 मध्ये जन्माला आलेले टॉम किल्लिक हे देखील मिनिस्टर होते ते 2 कसोटी सामने आणि 92 फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळलेले होते. डेव्हिड शेफर्ड यांचे वडील सॉलिसिटर होते. 1930 नंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांचे कुटूंब ससेक्स येथे रहावयास गेले. शाळेमध्ये अस्तानापासूनच त्यांना क्रिकेटची आवड लागली. ते केंब्रिज विद्यापीठासाठी 1950, 1951, 1952 मध्ये क्रिकेट खेळत होते. 1952 मध्ये ते त्यांच्या कॉलेजच्या टीमचे कप्तान झाले. 1953 मध्ये ते ससेक्सचे आणि इंग्लडचे कप्तान झाले. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट 1947 ते 1962 पर्यंत खेळले.

डेव्हिड शेपर्ड यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध ओव्हल वर 12 ऑगस्ट 1950 रोजी खेळला. तेव्हा त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 11 धावा काढल्या तेव्हा ते वेस्ट इंडिजच्या रामाधीन कडून 11 धावांवर बाद झाले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 29 धावा काढल्या. दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांनी ज्या 29 धावा काढल्या होत्या त्या त्या इनिंगच्या सर्वात जास्त धावा काढल्या होत्या कारण इंग्लडने दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वबाद 103 धावा काढल्या होत्या. हा सामना वेस्ट इंडिजने एक डाव आणि 54 धावांनी जिंकला होता. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1952 मध्ये ते टॉप ला होते , त्यांनी 64.62 च्या सरासरीने 2,262 धावा केल्या होत्या त्यामध्ये त्यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटी कडून खेळताना 1,281 धावा सात शतकांच्या सहाय्याने काढल्या होत्या. त्यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटी साठी एकूण 3,545 धावा काढल्या होत्या हा एक रेकॉर्डच होता. एका सीझनमध्ये 1000 धावा अशा त्यांनी 6 सीझनमध्ये काढल्या होत्या . तर 2000 धावा एका सीझनमध्ये असे त्यांनी तीन वेळा केले होते. त्यामध्ये त्यांनी 45.40 च्या सरासरीने सर्वात जास्त 2,270 धावा काढल्या होत्या.

डेव्हिड शेपर्ड यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध ख्राइस्टचर्च येथे 15 मार्च 1963 साली खेळला . त्या सामन्यात ते पहिल्या इनिंगमध्ये सलामीला खेळण्यास आले तेव्हा त्यांनी 42 धावा केल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 45 धावा केल्या होत्या आणि हा सामना इंग्लडने 7 विकेट्सने जिंकला होता.

डेव्हिड शेपर्ड यांनी 22 कसोटी सामन्यात 1172 धावा 37.80 च्या सरासरीने केल्या होत्या त्यामध्ये त्यांनी 3 शतके आणि 6 अर्धशतके केली होती. त्यांची कसोटी सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती 119 धावा तसेच त्यांनी 12 झेलही पकडले. त्यांनी 230 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 43.51 च्या सरासरीने 15,836 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 45 सशतके आणि 75 अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 239 धावा. तसेच त्यांनी 194 झेलही पकडले.

डेव्हिड शेपर्ड यांना 1960 साली इमोनन अँड्रूज अवॉर्ड मिळाले तर 2001 मध्ये ते ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब चे प्रेसीडेंट होते. तसेच त्यांनी विविध विषयांवर स्थंभलेखन केले आणि पुस्तकेही लिहिली. त्यांनी बरेच समाजकार्यही केले.

डेव्हिड शेपर्ड यांचे 5 मार्च 2005 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी इंग्लंडमध्ये निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..