नवीन लेखन...

क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर

 
भाऊसाहेब निबाळकर म्हणजेच बी. बी. निबाळकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या मॉडेल स्कुलमध्ये झाले. विजय हजारे , विजय मर्चन्ट हे देखील कोल्हापूरच्या मॉडेल स्कुलमध्येच शिकले. ते शाळेच्या क्रिकेटच्या संघाचे वयाच्या १५ व्या वर्षीच कॅप्टन झाले. भाऊसाहेबांनी त्यांचा पहिला रणजी सामना बडोद्याविरुद्ध १९३९ साली खेळला . त्यांचे बंधू रावसाहेब निबाळकर हे देखील रणजी सामने खेळलेले होते. भाऊसाहेब हे राइट आर्म ने ,मध्यम गोलंदाजी टाकत असत. ते कधी कधी यष्टिरक्षणही करत असत. १९४८-४९ मध्ये महाराष्ट्राविरुद्ध काठियावाड यांच्यात रणजी सामना पुणे येथे झाला होता. भाऊसाहेब पाटणकर यांनी तडाखेबाज फलंदाजी करून ४४३ धावा काढल्या होत्या त्यावेळी त्यांची धावसंख्या होती ८२६ ला ४ विकेट , भाऊसाहेब निबाळकर सर डॉन ब्रॅडमन यांच्या ४५२ नाबाद च्या विक्रम तोडण्यासाठी त्यांना फक्त ९ धावांची गरज होती परंतु त्यावेळी काठियावाडचा संघ समान सोडून पळून गेला असे मला एकदा भाऊसाहेब पाटणकर यांनी सांगितले होते.
रणजी क्रिकेटमध्ये विक्रमवीर ठरलेला हा खेळाडू दोन तपांहून अधिक काळ मैदान गाजवत राहिला. कर्नल सी. के. नायडू कर्णधार असलेल्या संघात एकाच वेळी भाऊसाहेब निंबाळकर, सयाजी धनवडे, दादासाहेब जगदाळे अशा तिघा कोल्हापूरकरांचा समावेश होता. यापैकी निंबाळकरांची कारकीर्द उत्तरोत्तर वाढत राहिली. १९४८-४९ सालच्या हंगामात काठियावाड संघाविरुद्ध खेळताना त्यांनी नाबाद ४४३ धावांची खेळी केली. तेव्हा प्रतिस्पर्धी संघाने खेळण्यास नकार दिला नसता तर भाऊसाहेबांनी डॉन ब्रॅडमनचा नाबाद ४५२ धावांचा विक्रम मोडला असता. मात्र त्यानंतर दस्तुरखुद्द ब्रॅडमन यांनी पत्र पाठवून भाऊसाहेबांच्या जिगरबाज खेळीचे कौतुक केले होते. उजव्या हाताने फलंदाजी करताना भाऊसाहेबांनी ८० सामन्यांत ४,८४१ धावा जमवतानाच १२ शतके, २२ अर्धशतके ठोकली. भाऊसाहेब घराण्यात क्रिकेटची प्रदीर्घ परंपरा आहे. त्यांच्या चार पिढय़ा क्रिकेटमध्ये रमल्या. भाऊसाहेबांचे वडील बाबासाहेब निंबाळकर हे कोल्हापूर संस्थान संघाचे कर्णधार होते. छत्रपती शहाजी महाराज यांचे एडीसी म्हणून काही काळ भाऊसाहेबांनी काम पाहिले. होळकर संस्थानाने त्यांना कॅप्टन हे मानाचे पद दिले. रेल्वे पोलीसमधून पोलीस उपाधीक्षकपदावरून निवृत्त झाले तरी भाऊसाहेब क्रिकेटशी अखेरच्या क्षणापर्यंत जोडले गेले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावांच्या पंक्तीमध्ये सध्या निंबाळकर चौथ्या स्थानावर आहेत. खरे तर भाऊसाहेबांची विक्रमांचा बादशाह अशी त्या काळी ओळख होती. भाऊसाहेब पाटणकर हे बडोदा , होळकर महाराष्ट्र , राजस्थान आणि रेल्वे याच्या संघाकडून क्रिकेट खेळले होते. ते १९३९ ते १९६४-६५ या कालखंडामध्ये क्रिकेट खेळले. भाऊसाहेब पाटणकर होळकरांच्या टीम कडून खेळताना त्यांच्या टीमचे कॅप्टन होते सी. के. नायडू . त्यावेळी भाऊसाहेब यांनी बंगाल विरुद्ध १७८ धावा केल्या होत्या. भाऊसाहेब निबाळकर हे रेल्वेमध्ये कामा असल्यामुळे ते रेल्वेकडूनही रणजी ट्रॉफी खेळले.
भाऊसाहेब निबाळकर यांनी ८० फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ४८४१ धावा ४७.९३ या सरासरीने केल्या होत्या त्यामध्ये त्यांची १२ शतके आणि २२ अर्ध शतके होती . त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ४४३ धाव. भाउसाएब उत्तम गोलंदाजी करत असत ४०.२२ या बासरीने ५८ विकेट्स घेतल्या होत्या. एक इनिंगमध्ये ५६ धावांमध्ये ४ विकेट्स घेतल्या होत्या. भाऊसाहेब पाटणकर यांनी ३७ झेल पकडले असून ते यष्टीरक्षक असताना त्यांनी १० जणांना यष्टिचितही केले. भाऊसाहेब तसे म्हटले तर क्रिकेटच्या बाबतीत दूर्देवीच म्हणावे लागतील कारण इतक्या धावा करून देखील त्यांना एकही कसोटी सामना खेळता आला नाही
त्यांची आर्थिक स्थिती पुढे पुढे बिकट होत गेली काही वर्षांपूर्वी मुंबईला द्वारकानाथ संझगिरी यांनी एक संस्थेमार्फत त्यांच्यासाठी निधी उभा करून त्यांना आर्थिक मदतही केली होती.
भाऊसाहेब पाटणकर यांना मी दोन तीनदा भेटलो असेन . ते अत्यंत साधेपणाने रहात असत.
भाऊसाहेब पाटणकर यांचा वाढदिवस १२-१२-१२ रोजी त्यांचा ९३वा वाढदिवस होता. परंतु ही खेळी पूर्ण करण्यापूर्वीच त्यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले
— सतीश चाफेकर.
Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..