नवीन लेखन...

चेरी डेझर्टचा खास दिवस

चेरी न आवडणारी जमात विशेषच म्हणावी लागेल. त्या लालम् लाल चेरी कडे पाहिल्यावर तिला पटकन तोंडात टाकावीशीच वाटते आणि ती असतेही इतकी लहान की, ती पटकन चिमटीत पकडली जाऊन एखाद्या गोळीप्रमाणे तोंडात टाकली जाते. सणासुदीला जेवणंं आटोपल्यावर मसाला पान खायची इच्छा झाली की मग टपरीवर जाऊन पान खाण्याची मजा काही औरच असते.तिथेही ही असतेच जोडीला. लहानपणी या चेरी खाण्यासाठी आमचा दुकानदार ठरलेला होता.  त्यावेळी आमची घरापासून ते त्या दुकानापर्यंत शर्यत लागायची. शर्यत जो जिंकायचा त्याला सगळ्या हरलेल्या मुलांनी त्यांच्या वाटणीतल्या दोन चेरी द्यायच्या. सगळे न भांंडता हा नियम पाळायचे. आज या सगळ्या आठवणी येण्यामागे खास कारण आहे. आज दिनांक २४ सप्टेंबर आहे आणि आज परदेशात ” राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन ” साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच अर्थ आहेत , पण इथे त्याचा अर्थ ” सेलिब्रेशन ” असा आहे. या दिनाची सुरुवात कशी झाली हे थोडक्यात जाणून घेऊ.

या रेसिपीचं श्रेय ऑगस्टे एस्कोफियरला जातं. त्याला राणी विक्टोरीयाचं चेरीवर असलेल्या प्रेमाची जाणीव होती म्हणून त्याने राणीच्या वाढदिवसाच्या दिवशी मेन्यूमध्ये या रेसिपीचा समावेश केला होता. पण त्याने तोच तोच पारंपारिकपणा न ठेवता म्हणजेच आईस्क्रीमचा वापर न करता त्या चेरीला सिरपमध्ये टाकून पोकळ करुन घेतली. नंतर त्याच्या भोवती ऊबदार ब्रॅंडी ओतून त्या डिशला राणीसमोर नेण्यात आलं. पुढे नाट्यमयरित्या त्याला आग लावण्यात आली.

चला मग आजचा दिवस चेरीच्या वेगवेगळ्या पाककृती बनवून साजरा करुयात. पाककृती नेटवर शोधा नक्की सापडतील.

— आदित्य दि. संभूस.

#National Cherry Jubilee #24th September

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..