नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रेमन मॅगसेसे

१९५३ पर्यंत मॅगसेसे यांनी राबवलेली ‘अँटी गोरीला’ मोहीम ही आधुनिक इतिहासातल्या सर्वांत यशस्वी मोहिमांपैकी एक मानली जाते. सर्वसामान्यांचा पाठिंबा नसेल तर हुक चळवळ टिकणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर लष्कराने सामान्यांना सन्मानाने वागवावं असं सांगतं तसंच गरीब शेतकऱ्यांना जमीन आणि अवजारं देऊ करत, त्यांना सरकारच्या बाजूला वळवून घेतलं. […]

दिग्दर्शक मृणाल सेन

मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आंतरराष्ट्रीय जगतात त्यांच्या चित्रपटांची दखल घेण्यात आली. […]

शाहीर पिराजी रामजी सरनाईक

पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले. […]

लिनक्स संगणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स

आपल्या या ऑपरेटिंग सिस्टमला तोरवाल्ड्स यांनी फ्रीक्स असे नाव द्यायचे ठरविले होते. हा शब्द इंग्रजी शब्द फ्री (विनामूल्य), फ्रिक (विचित्र) आणि उनिक्स या दुसऱया ऑपरेटिंग सिस्टममधला एक्स हे अक्षर वापरून करण्यात आला होता. […]

महान क्रांतिकारक सरदार उधमसिंग

पंजाबातील अमृतसर येथे १३ एप्रिल १९१९ ला झालेल्या जालियानवाला हत्याकांडाचे ते साक्षीदार होते. त्यामध्ये गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. या घटनेत हजारो भारतीयांच्या हत्येस कारणीभूत कमांडर डायर व जनरल ओडवायर आहेत ही माहिती मिळाल्यानंतर या दोहोंचा प्रतिशोध घ्यायची खूणगाठ उधमसिंग यांनी मनात बांधली. […]

ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ परशुराम यशवंत वैद्य खडीवाले

परशुराम वैद्य यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर पुण्यात येऊन ‘हरी परशुराम औषधालय’ सुरू केले. याचबरोबर त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित अनेक पुस्तकेही लिहिली. […]

ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड

डेव्हिड यांनी एकूण एकशे दहा चित्रपटांत भूमिका केल्या. बूटपॉलिश (१९५४), चुपके चुपके (१९७५), सत्यम् शिवम् सुंदरम् (१९७८), गोलमाल (१९७९), बातों बातों में (१९७९), खूबसूरत (१९८०) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. […]

व्यंग चित्रकार विकास सबनीस

विकास सबनीस हे गेली अठ्ठेचाळीस वर्षे अर्कचित्रं, व्यंगचित्रं काढत होते. तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. एखादी घटना घडली, एखादी व्यक्ती भेटली की, त्यांच्या मनात यातून कसं चित्र निर्माण होईल याचा विचार करून ते टिपणं काढून ठेवत असत. […]

बीबीसी मराठीचा पहिला आवाज वेणूताई चितळे

९४० साली वेणूताई बीबीसीमध्ये दाखल झाल्या. आवाज, बोलण्याची आणि लिहिण्याची शैली पाहून वेणूताईंना लगेचच प्रसारणाचं काम देण्यात आलं. १९४२-४३ दरम्यान बीबीसीच्या ईस्टर्न सर्व्हिसनं अनेक भारतीय भाषांत प्रसारण सुरू केलं. त्यात मराठीचाही समावेश होता. वेणूताई प्रामुख्यानं याच विभागासाठी काम करत असत. […]

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा

ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. […]

1 88 89 90 91 92 381
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..