नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा

१९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. […]

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे

त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात म्युझिक ॲ‍रेंजर म्हणून काम करणाऱ्या भिडे यांनी कालांतराने चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीत देण्यास सुरुवात केली. […]

मराठी कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे ऊर्फ नाथमाधव

नाथमाधवांची पहिली कादंबरी, प्रेमवेडा, ही १९०८ साली प्रकाशित झाली. नाथमाधवांची शेवटची कादंबरी ‘स्वराज्यातील दुही’ ही अपुरी राहिली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट निघाला. उषा किरण, सूर्यकांत यांच्या भूमिका असलेल्या वसंत प्रभू यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. […]

सरपोतदार केटरर्सचे किशोर सरपोतदार

किशोर सरपोतदार यांनी ‘पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच’ हे स्टेज कलाकारांना कायमच उपलब्ध करून दिले असून या मंचावरून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले आहेत. सध्या कोरोना मुळे सर्व ऍक्टिव्हिटीज बंद आहेत. नाहीतर दर सोमवारी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतोच. […]

भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कंजुष गोलंदाज अशी बापूंची ओळख होती. कसोटीत सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी १४ जानेवारी १९६४ रोजी इग्लंडविरुद्ध रचला होता. चेन्नईच्या मैदानावर हा सामना झाला होता. बापू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी ३२ षटके टाकली. त्यातील तब्बल २७ षटके निर्धाव होती. ३२ षटकांत त्यांनी १.६७च्या सरासरीने केवळ ५ धावा दिल्या होत्या. बापूंचा हा विश्वविक्रम अबाधित राहिला. […]

गायक आर एन. पराडकर

पायाची दासी व बाईलवेडा या चित्रपटात प्लेबँक दिले होते. भावगीते गाण्याइतकाच शास्रोक्त गाणे व ठुमरी, या गाण्यांतही त्यांना आनंद वाटत असे. राजा बढे कृत ‘वसंतोत्सव’ व ‘सीताविरह’ या रेडिओवर झालेल्या ऑपेरांचे संगीत दिग्दर्शन यांनी केले होते. आर. एन. पराडकर यांनी यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. […]

अभिनेत्री पल्लवी जोशी

१९८० आणि १९९० च्या काळात त्यांनी काही आर्ट फिल्म मध्ये काम केली ज्या मध्ये रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी, वंचित आणि रिहाई प्रमुख होता. त्यांनी व्यावसायिक मोठ्या बजेटची चित्रपटात बहिण किवा हिरोईनची मैत्रीण सारखे सहकारी भूमिकेत देखील अभिनय केली होती ज्यात सौदागर, पनाह, तहलका आणि मुजरीम हे चित्रपट प्रमुख होता. […]

मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी

मच्छिंद्र कांबळी यांना वस्त्रहरण हे नाटक लंडनला न्यायचे होते. पण पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर, नाना पाटेकर, अशोक सराफ, सचिन अशा बडया कलाकारांना घेऊन षण्मुखानंद मध्ये वस्त्रहरणचा विशेष प्रयोग केला. त्यानंतर वस्त्रहरणचा लंडनला प्रयोग केला. मच्छीँद्र कांबळी यांचे आणि मालवणी भाषेचा झेँडा सातासमुद्रापार पोहोचविणारे वस्त्रहरण हे पहिले मालवणी नाटक. […]

संघाचा खंदा कार्यकर्ता विनय चित्राव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भारतीय जनता पार्टी यांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. भाजपाचे खूप मोठे नेते विनयला व्यक्तिशः ओळखत होते पण विनयनं एका पैश्याचाही स्वार्थ कधी साधला नाही. गाणं शिकवणं आणि प्रिटींगची कामं या दोन व्यवसायातूनच त्यानं चरितार्थ चालवला. […]

कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी

१९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती. त्यांना २००७ मध्ये कर्नाटक रत्न पुरस्काराने तर २०१५ मध्ये पदमभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सिद्धगंगा मठाची सिद्धगंगा एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था कर्नाटकात सुमारे १२५ शैक्षणिक संस्था चालविते. कर्नाटकातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती शिवकुमार स्वामींचे भक्त आहेत. […]

1 50 51 52 53 54 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..