मामासाहेबांच्या ठायी पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाढा व तुलनात्मक अभ्यास आणि अनुभव यांचा अपूर्व संगम झाला होता. त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपर्यंत कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. दिवसा ते काम; व ते संपल्यावर श्रीज्ञानेश्वरी संबंधीच्या कीर्तनाद्वारे समाजात नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याचे त्यांचे कार्य सुरू होई. ते आयुष्यभर अखंड चालू होते. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी असोत, अशिक्षित वारकरी असोत किंवा व्यसनी, वाममार्गाला लागलेला मनुष्य असो, त्यांनी समाजाची पातळी उंचावण्याचे महान कार्य सातत्याने केले. […]
आमदारकीच्या आधी पुणे महापालिकेत २००७ मध्ये महात्मा फुले मंडई या वॉर्डातून नगरसेविका म्हणून त्या प्रथम निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. २०१४ मध्ये त्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाल्या. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांनी विजयी मिळवला. […]
मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून सध्या त्यांची एकूण संपत्ती २२.७ अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.मुकेश अंबानींकडे तीन खासगी विमाने आहेत. त्यात ३३० कोटींचे एअरबस ३१९ कॉपरेरेट जेट, ४०१ कोटी रुपयांचे बोइंग बिजनेस जेट-२ आणि ९९ कोटी रुपयांचे मिनी जेट फॉल्कन ९०० ईएक्सचा समावेश आहे. […]
डिकी बर्ड उजव्या हाताने गोलंदाजी करत असत. ते राईट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाज होते. १९५६-५९ यॉर्कशायर कडून ते पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळले. १२ ऑगस्ट १९६४ रोजी अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळले. १९७० मध्ये अंपायर म्हणून त्यांनी आपले करिअर सुरु केले. डिकी बर्ड हे क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला एकमेव जिवंत माणूस असावेत. […]
एखादा वाघ किंवा बिबट्या नरभक्षक आहे, याची खात्री पटल्याशिवाय ते त्याला ठार करत नसत. ४३६ लोकांचा बळी घेणारा या भागातला पहिला नरभक्षक वाघ ‘चंपावत’ याला कॉर्बेट यांनी ठार केले. तिथून नरभक्षक वाघांना ठार करण्याची त्यांची मोहीम सुरू झाली. दोन नरभक्षी बिबट्यांचीही त्यांनी शिकार केली. या नरभक्षक वाघांच्या शिकारी ते एकटेच करत. फक्त रॉबिन हा त्यांचा कुत्रा त्यांच्या सोबत असे. […]
२००४ मध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर मारिया शारापोवाने २००८ मध्ये अमेरिकन ओपन आणि २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्या. मग २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकून तिने विविध कोर्टवरील बहुपैलुत्व सिद्ध केले. सेरेना किंवा व्हीनसच्या तुलनेत तिने फार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या नाहीत. मात्र, मारिया शारापोवा केवळ एक प्रसिद्ध टेनिसपटू नाही. ती आता जगातील एक अव्वल सेलेब्रिटीही बनलेली आहे. […]
१९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले.या संस्थेने पुढे पूर्व प्राथमिक अध्यापन मंदिर सुरु केले. यातून मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांच्या हजाराहून अधिक शिक्षक शिक्षकांचे प्रशिक्षण केले. मराठी शिक्षणपत्रिका त्यांनीच सुरु केली.ताराबाईनी १९३३ जूनचा शिक्षणपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित केला. […]
अहिल्याताई व रांगणेकर नोव्हेंबर १९६२ ते २९ एप्रिल १९६६ पर्यंत ‘भारत संरक्षण कायद्या’खाली अटकेत होते. या काळात कैदी स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्याताईंनी २१ दिवसांचा उपवास करून त्यांना सवलती मिळवून दिला. एकदा अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने करत असता तिथली पाटी त्यांच्या डोळ्यांना लागली. या घटनेमुळे त्यांचे डोळे कायमचे अधू झाले. तशाही स्थितीत पुढे सुमारे २०-२५ वर्षे त्या कुणाचीही सोबत अथवा हातात काठी न घेता मुंबईत फिरत असत. यानंतर अहिल्याताई व मृणाल गोरे या जोडगोळीने महागाई प्रतिकारसमितीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. महिलांच्या कर्तबगारीचा एक नवा इतिहास घडवला. […]
नाशिक येथील एका नाटकगृहामध्ये किर्लोंस्कर मंडळीच्या शारदा या नाटकाचा प्रयोग होता. त्याला कलेक्टर जॅक्सन यांना आमंत्रण होते व जॅक्सन यांनी ते स्वीकारले होते. ही बातमी सर्वत्र पसरली होती. लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. अनंत कान्हेरे यांनी ही संधी साधण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे जॅक्सन आले व त्यांच्या खास ठरविलेल्या राखीव खुर्चीवर बसले. अनंत कान्हेरे तेथे जवळच होते. क्षणार्धामध्ये त्यांनी आपले पिस्तूल काढले व जॅक्सन यांच्यावर सात आठ गोळयांच्या वर्षाव केला जॅक्सन जागेवरच ठार झाले. तो दिवस होता, २१ डिसेंबर १९०९. […]
कोल्हापूरातील प्रसिध्द बासरीवादक व ‘जीवनगाणे’ वाद्यवृंदाचे निर्माते प्रा.सचिन जगताप हे भारतातील पहिले कलाकार आहेत की ज्यांनी बासरी वादनामध्ये गांधर्व महाविद्यालयाची “संगीत अलंकार” ही पदवी थेट प्रवेश घेऊन संपूर्ण भारतात पहिला क्रमांक मिळण्याचा बहुमान त्यांना मिळाला. याचबरोबर शिवाजी विद्यापिठामध्ये हार्मोनियममध्ये एम.ए. संगीतमध्ये ते शिवाजी विद्यापिठात पहिले आले आहेत. […]