नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

ज्येष्ठ भरतनाट्य नृत्यकलावंत डॉ. स्वाती दैठणकर

‘पंचकन्या’ हा त्यांचा एक प्रयोग, ज्यामध्ये त्या स्वतःच्या कविता, सद्यस्थितीतील सामाजिक प्रश्न व नृत्य एकत्र गुंफून रंगमंचावर एकल सादरीकरण करतात. भरतनाट्यम शैलीशी कुठेही तडजोड न त्या पंचकन्या हा सादर करतात. तसेच कमलपुष्पाचे वाङ्मयीन सौंदर्य आणि वेगवेगळ्या छायाचित्रांचे संकलन करून डॉ. प्रकाश जोगळेकर यांनी ‘पद्मिनी’ हे पुस्तक लिहिले आहे. […]

संयुक्त राष्ट्र संघाचे माजी महासचिव कोफी अन्नान

१९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी जागतिक आरोग्य संघटनेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरू केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या आदीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले होते. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बनणारे आफ्रिकन वंशाचे ते पहिले नागरिक होते. १९९७ आणि २००६ मध्ये सलग दोन वेळा त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिवपद भूषवले होते. महासचिव असताना २०१५ पर्यंत जगातील गरिबी दूर करण्याचे उद्दिष्टही त्यांनी समोर ठेवले होते. युद्ध काळात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच युद्धात होरपळलेल्या जनतेचे पुनर्वसन करण्याचे काम त्यांनी केले होते. […]

बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय पंच गिरीश नातू

२०१९ मध्ये गिरीश नातू यांनी प्रतिष्ठीत अशा 10 बीडब्ल्यूएफ रेफरीच्या ऑगस्ट ग्रुप मध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम केले आहे. […]

वसुंधरा डांगे (पेशवे पार्कातली फुलराणी)

पेशवे उद्यानातल्या फुलराणीचे उद्घाटन ८ एप्रिल १९५६ ला पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील तेव्हाची विद्यार्थिनी वसुंधरा डांगे हिच्या हस्ते झाले. (पुढे त्या वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या पत्नी झाल्या.) इंजिन आणि दोन डबे अशी ‘फुलराणी’ची रचना होती. या रेल्वेसाठी दोन फलाट, तिकीट विक्रीची खिडकी, तिकीट तपासनीस, सिग्नल अशी सारी व्यवस्था उभारण्यात आली होती. लहानग्यांच्या करमणुकीसाठी उद्यानात चालविल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये पुण्यातली ‘फुलराणी’ देशातली सर्वात जुनी रेल्वे आहे, हे विशेष. […]

ब्रिटनच्या पहिला महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर

निवडणुकीच्या माध्यमातून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या युरोपातील पहिल्या महिला. इंदिरा गांधी, सिरिमाओ भंडारनायके आणि मार्गारेट थॅचर या एकाच वेळी आपापल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी होता. या तिघींचे मैत्रीसंबंध हाही त्यावेळी चर्चेचा विषय असे. एका रशियन पत्रकाराने त्यांना ‘पोलादी महिला’ म्हणून संबोधले आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखू जाऊ लागल्या. […]

अभिनेत्री राजेश्वरी खरात

मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या यांच्या गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात. […]

गीतकार नितीन आखवे

संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी त्यांचे विशेष सूर जुळले होते. या जोडीची ‘फुलले रे क्षण माझे फुलले’, ‘मी राधिका, मी प्रेमिका’, ‘कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला’ इत्यादी गाणी खूप लोकप्रिय झाली. […]

नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक

राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका, ‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका, ‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी, ‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व, ‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत, ‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या, पण ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका होत. […]

विनोदी अभिनेत्री सुप्रिया पाठारे

‘कुलवधू’ या गाजलेल्या मालिकेतून सुप्रिया पाठारे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत त्या खलनायिकेच्या रुपात दिसल्या होत्या त्यानंतर जागो मोहन प्यारे या मालिकेतही त्यांची मुख्य भूमिका होती. […]

व्यंगचित्रकार डेव्हीड लो

२० सप्टेंबर १९३९ रोजी इव्हीनिंग स्टँण्डर्ड मध्ये प्रसिद्ध झालेले हिटलर आणि स्टालिन परस्परांना झुकून अभिवादन करतानाचे व्यंगचित्र प्रचंड गाजले होते. दोघांनी एकत्र येऊन पोलंडवर आक्रमण केल्यानंतर डेव्हीड लो यांनी आपल्या खास शैलीतून या व्यंगचित्रातून हिटलर आणि स्टालिनवर टीका केली होती. जर्मनीने त्यावेळी लो यांच्या व्यंगचित्रांविरोधात इंग्लंडकडे रीतसर तक्रारी केल्याचीही नोंद आहे. […]

1 46 47 48 49 50 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..