नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणारी महिला भानू अथय्या

मूळच्या महाराष्ट्रीय व मराठी असलेल्या भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये आणि सध्या भानू अथय्या या नावाने ओळखल्या जाणार्यार प्रसिद्ध महिला वेशभूषाकार. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुर येथे झाला.कोल्हापूर येथे जन्मलेल्या लहानपणापासूनच रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्या मुळे त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ़ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व गोल्ड मेडल घेऊन पदवी प्राप्त केली. हिन्दी चित्रपटाचे गीतकार […]

मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक मधु मंगेश कर्णिक

आपल्या आगळ्यावेगळ्या व विपुल साहित्यनिर्मितीचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या लेखकांत मधू मंगेश कर्णिक यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे. मधु मंगेश कर्णिक यांचे प्राथमिक शिक्षण करुळ येथील शाळेत १९३८ ते १९४२ पर्यंत झाले. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९३१ रोजी करुळ, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे झाला.तर कणकवली येथे १९४२ ते १९५१ पर्यंत माध्यमिक शिक्षण झाले. इच्छा असूनही त्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढे […]

जेष्ठ बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान

जेष्ठ बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान  हे अफगाण वंशाचे होते. त्यांचे वडील अफगाणिस्तानच्या गजनी भागातील तर आई ईराणी होती. फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला […]

मराठी नाटककार, कादंबरीकार, लेखक मामा वरेरकर

भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म २७ एप्रिल १८८३ रोजी झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिले. कोकणात येणार्या नाटक मंडळींशी मामा वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला. वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते […]

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू

शाळेत असल्यापासून आरती प्रभू या नावानेच कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळ येथे झाला. आरती प्रभू यांच्या आईंचे कुडाळला ‘विणा गेस्ट हाऊस ’होतं, आणि खानावळ होती. कोकणातील गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसुन मा.आरती प्रभू कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्या […]

प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी

मौसमी चॅटर्जी यांचे खरे नाव इंदिरा. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९४८ रोजी झाला. १९६७ मध्ये बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या बालिका वधू या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर १९७२ मध्ये रिलीज झालेल्या ‘अनुराग’ या सिनेमाद्वारे मौसमी यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. ‘कच्चे धागे’, ‘जहरीला इंसान’, ‘स्वर्ग नरक’, ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’, ‘मांग भरो सजना’, ‘दासी’, […]

शंकर जयकिशन या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीतील शंकर

शंकर यांचे पूर्ण नाव शंकरसिंग रघुवंशी. शंकर हे पृथ्वीराज कपुर यांच्या पृथ्वी थिएटर या नाटक कंपनीत तबला वाजविण्याचे काम करायचे. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. ते एका गुजराती चित्रपट निर्मात्याकडे संगीत देण्याची संधी मिळते का हे पाहण्यासाठी चकरा मारत होते. तेंव्हा त्यांना जयकिशन नावाच्या तरूण मुलाची गाठ पडली. तोही याच कामासाठी चकरा मारत होता. तो हार्मोनिअम अप्रतिम […]

मास्टर दीनानाथ

वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. “स्वरमंगेश” ह्या गौरवग्रंथामध्ये “मालक” ह्या शीर्षकाने, २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं ! आज चोवीस एप्रिल २०१७ रोजी वंदनीय मास्टर दीनानाथांची पंचाहत्तरावी पुण्यतिथी आहे, || मालक || “माझ्या घरांत मी तुला […]

हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक

प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला आणि शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. […]

शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन निंजा यांचा आवाज – मेघना एरंडे

शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन निंजा अशा कार्टून मागे असलेला आवाज मेघना एरंडे. तिचा जन्म २४ एप्रिल १९८१ रोजी झाला. मेघना एरंडेला आत्तापर्यंत प्रेक्षकांनी अनेक मालिका आणि सिनेमांतून बघितलंय. तिने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर गंमत म्हणून डबिंग करायला लागली. पण नंतर ती तिची पॅशनच बनली. शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन अनेक कार्टून्सना मेघना एरंडे ने आवाज दिला आहे, निंजा तिच्यासाठी टर्निंग पाँइंट […]

1 321 322 323 324 325 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..