नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर

आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव. त्यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम […]

दादासाहेब तोरणे

दादासाहेब तोरणे यांनी ‘श्री पुंडलिक’ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे. त्यांचा जन्म १३ एप्रिल १८९० रोजी झाला.  तोरणे कुटुंबिय मूळचे मालवणनजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात दादासाहेवांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे […]

संगीतकार वसंत प्रभू

मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९२४ रोजी झाला. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. त्यातील एक संगीतकार वसंत […]

लेखक,कवी वि.स. खांडेकर

वि.स.खांडेकर यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८९ रोजी झाला. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. कुमार वयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि […]

हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व

सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी झाला.  ‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व सर्वांना असलेली गाण्याची आवड […]

विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार चिंतामण विनायक जोशी उर्फ चि.वि.जोशी

विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार ज्यांचे विनोदी साहित्य आजही ताजेतवाने वाटते असे विनोदी साहित्याचे जनक म्हणजे चि.वि.जोशी. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला.  पुण्याच्या नूतन मराठी शाळेतून ते मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर फर्ग्यूसन कॉलेजमधून १९११ मध्ये बी. ए. आणि १९१६ मध्ये त्यांनी एम.ए. ची पदवी मिळविली. तसेच चि.वि.जोशी हे पाली भाषेचे पंडित होते, पाली […]

मराठी सामाजिक बोलपटांचे आद्य प्रवर्तक मास्टर विनायक

मास्टर विनायकांचे पूर्ण विनायक दामोदर कर्नाटकी ब्रह्मचारी, घर की राणी आणि निगाहे ए नफरत या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९०६ रोजी झाला.  मास्टर विनायक मराठी बोलपटांना नवं सामर्थ्य मिळवून दिलं. ‘मराठी सामाजिक बोलपटांचे आद्य प्रवर्तक’ असं त्यांना गौरवानं म्हटलं जातं. केवळ धार्मिक कथा, करमणूक, साहस वगैरे कल्पनारम्य विश्वातून मराठी बोलपटांना अर्थपूर्ण करण्याचं मोठंच […]

‘नाट्यछटाकार दिवाकर’ या नावाने ओळख असलेले शंकर काशिनाथ गर्गे

शंकर काशिनाथ गर्गे हे ‘नाट्यछटाकार दिवाकर’ म्हणून अवघ्या मराठी जनमानसांत लोकप्रिय असणारे लेखक होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८८९ रोजी पुणे येथे झाला. वर्डस्वर्थ, ब्राउनिंग, शेक्सपीअर हे त्यांचे आवडते साहित्यिक होते. लॉर्ड टेनिसन यांनी १८४२ मध्ये पहिला ड्रामॅटिक मोनोलॉग लिहिला होता, जो पुढे मॅथ्यू अरनॉल्डने आणि रॉबर्ट ब्राउनिंगने लोकप्रिय केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन शंकर गर्गे यांनी दिवाकर टोपण […]

डॉ. विजया विजय वाड

डॉ. विजया वाड या लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९४५ रोजी झाला.  त्यांनी मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा आणि प्रमुख संपादिका म्हणून काम पाहिलं आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्या लेखन करत असतात. ‘आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान’ या विषयात त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांनी मराठी भाषा प्रकल्पांतर्गत भाषा शुद्धी प्रकल्प, […]

अमेरिकन विनोदी अभिनेता ऑलिव्हर हार्डी

आपल्या लहानपणीच्या या जाड्या-रड्याच्या जोडीनं १९२६ पासून खरी धमाल सुरू केली. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८९२ रोजी झाला. या जाड्या-रड्याच्या एका जोडीनं आपल्या ‘द म्युझिक बॉक्स’ या लघुपटासाठी त्या विभागातलं पहिलं वहिलं ऑस्कर पटकावलं होतं. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक […]

1 226 227 228 229 230 378
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..