नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मराठी नट, लेखक, दिग्दर्शक सुरेश विनायक खरे

१९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झालं आणि कलाकारांसाठी एक दालन उघडलं गेलं. चित्रपट दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी दूरदर्शन निर्माते विनायक चासकर यांच्याशी खरेंचा परिचय करुन दिला. “जानकी” या चित्रपटाचं ‘चित्रावलोकन’ हा चर्चात्मक समीक्षेचा कार्यक्रम हा खरेंचा दूरदर्शनवरील पहिला कार्यक्रम. ‘गजरा’ आणि ‘नाट्यावलोकन’ हे खरे यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम अतिशय गाजले आणि लोकप्रिय झाले. सूत्रसंचालक म्हणून खरे यांनी आपल्या खास शैलीचा ठसा या कार्यक्रमांवर उमटवला. […]

माजगांवची म्हातारपाखाडी; मुंबईचा एक ऐतिहासिक ठेवा..

आपल्या ऐतिहासिक वारशाचं परदेशींना कौतुक, अप्रूप आहे, पण आपल्या देशी राज्यकर्त्याना आणि नागरीकांनाही नाही, याचं दु:ख बाप्टीस्टांप्रमाणे मलाही आहे.. खरंतर मुंबईतली ही अशाप्रकारची एकमेंव वस्ती नाही. उपनगरातील वांद्रे पश्चिम, अंधेरीतल्या आंबोली परिसरात अशाच प्रकारच्या वस्ती आहेत, पण पुनर्विकासाच्या नांवाखाली त्याही उध्वस्त होत चालल्या आहे. म्हातारपाखाडी अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे. […]

रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर

चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला.  सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात […]

पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मे पुं रेगे

मे.पुं रेगे हे व्यवसायाने ‘तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. त्यांची महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्टय़े होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्वविाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो. भारतीय आणि पाश्चात्त्य या […]

महान गायक भीमसेन जोशी

भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला.  भीमसेना यांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. व १९३३ साली वयाच्या […]

राज कपूर नंतरचे एकमेव ‘शोमॅन’ निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई

घई यांचा जन्म नागपूरचा, सुभाष घई यांनी हिरो’, ‘कर्ज’, ‘राम-लखन’, ‘खलनायक’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीवर दशकाभराहून जास्त काळ अधिराज्य गाजविले. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी झाला.  हिंदी प्रेक्षकांची नाळ ओळखणारा निर्माता-दिग्दर्शक म्हणून सुभाष घईंची ओळख आहे. कालीचरण, कर्ज, मेरी जंग, हीरो, कर्मा, राम लखन, खलनायक, सौदागर, परदेस आणि ताल असे एकाहून एक मनोरंजक चित्रपट देणार्या […]

आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी

वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला.  उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय […]

संगीतकार शंकरराव व्यास

कोल्हापूरला पुरोहित कुटुंबात जन्मलेल्या शंकरराव व्यास यांच्या वडीलांना संगीताची आवड होती. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. शंकरराव व्यास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. नंतर आपले काका श्रीकृष्ण सरस्वती यांच्या कडे शिक्षणासाठी गेले. त्याच काळात पण्डित विष्णु दिगम्बर पलुसकर हे संगीत प्रचारासाठी भारतभर फिरत होते. शंकरराव व्यास यांची संगीताची आवड बघून पलुसकर यांनी त्यांना आपल्या बरोबर […]

लेखक, कवी, नाटककार, राम गणेश गडकरी

‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।। असे अप्रतिम काव्य लिहिणारे गोविंदाग्रज. मुलासकट माणुसकीला, सिंधुसकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला या सुधाकराच्या निर्वाणीच्या निराशेतला अखेरचा प्रणाम, अशी नादमधुर भाषा लिहिणारे नाटककार राम गणेश गडकरी! बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे गडकरी! राम गणेश गडकरी म्हणजे मराठी नाटय़- साहित्य क्षेत्रातला […]

दिग्दर्शक-निर्माते रमेश सिप्पी

दिग्दर्शक-निर्माते रमेश सिप्पी यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले, मात्र शोले सिनेमाने त्यांनी जी प्रसिद्ध मिळवून दिली,ती इतर सिनेमांमुळे त्यांना मिळाली नाही. एकच सिनेमा त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.या सिनेमाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करत त्यांचे नाव इतिहासातील महान दिग्दर्शकांमध्ये नोंदवले गेले. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये झाला. रमेश सिप्पी यांचे वडील जी.पी.सिप्पी प्रख्यात निर्माते होते. […]

1 224 225 226 227 228 377
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..