नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

सिने-अभिनेत्री किरण खेर

१९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या किरण खेर यांनी देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदा ना कहना, ओम शांती ओम इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १४ जून १९५५ रोजी झाला. १९८५ साली किरणने बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोबत विवाह केला. २००९ मध्ये किरण खेरने भारतीय […]

भारतीय बनावटीचे एकमेव ऑर्गन उत्पादक उमाशंकर दाते

उमाशंकर उर्फ बाळा सुरेश दाते यांचे शिक्षण १२ वी आर्टस पर्यंत. त्यांचा जन्म १४ जून १९७६ रोजी कोकणातील आडिवरे येथे झाला. बाळा दाते यांचा वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत संगीताशी तसा संबंध नव्हता. पण १९९४ साली उदय गोखले यांचे श्री. महाकाली मंदीरात भजन होते ते गाणं ऐकताना या सुरांशी आपले काहीतरी अनामिक नाते आहे याची त्यांना पहिली […]

अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल

१९२६ साला पासून या जोडीनी खरी धमाल सुरू केली. त्यांचा जन्म १६ जुन १८९० रोजी झाला. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता. जगातल्या सुमारे वीस भाषांमध्ये हे लघु-चित्रपट अनुवादित झाले आणि […]

मराठी लेखक श्रीपाद काळे

लौकिक अर्थाने म्हणाल, तर शालेय शिक्षण नाही, व्यवसाय भिक्षुकीचा. वास्तव अगदी आडखेड्यात. त्यांचा जन्म ८ जुलै १९२८ रोजी वाडा, सिंधुदुर्ग येथे झाला.पण पंचेचाळीस र्वष निष्ठेने साहित्यसेवा, चोपन्न कादंब-या, तेराशे कथा अशी थक्क करणारी कामगिरी करणारे लेखक म्हणजे  श्रीपाद काळे. वडिलांचा पारंपरिक भिक्षुकीचा व्यवसाय त्यांनी निष्ठेने सांभाळला. वडिलांनी घरीच भिक्षुकीचं प्राथमिक शिक्षण दिलं. मात्र, पुढील शिक्षण साता-याच्या […]

नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक चंद्रकांत गोखले

अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. “चित्ताकर्ष’ ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून […]

ख्यातनाम अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृणाल देव-कुलकर्णी

मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचा जन्म २१ जुन १९७१ रोजी पुणे येथे झाला.तसेच ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘राजवाडे अँड सन्स’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘रमा माधव’, ‘प्रेम […]

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे

अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला. अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर […]

मराठीतील रुबाबदार नायक अरुण सरनाईक

एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव अरुण सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. […]

गोड चेहऱ्याचा अभिनेता अरविंद स्वामी

कधीच प्रसिद्धीसाठी काम न करणारा अभिनेता म्हणून अरविंद स्वामी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जून १९७० रोजी झाला. कॉलेज करताना पॉकेटमनी म्हणून मॉडेलिंग करत असताना मणीरत्नम यांची नजर अरविंद स्वामी यांच्यावर पडली. मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद स्वामीने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. आणि एका रात्रीत अरविंद स्वामी स्टार बनले. १९९५ मध्ये त्यांनी […]

1 218 219 220 221 222 378
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..