नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

याहू स्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर

शम्मी कपूर यांनी गंभीर भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशालचेंडू तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. पण प्रेक्षकांना जसे गंभीर भूमिका करणारे अभिनेते हवे असतात, तसेच जीवनावर ओसंडून प्रेम करणारे, आनंदी, मन प्रसन्न करणारे अभिनेतेही हवे असतात. जे आपल्याला आयुष्यात करणे शक्य नाही, […]

मराठी लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी

जयवंत दळवी हे वेंगुर्ल्यापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील आरवली गावचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले आणि घरच्या दडपणामुळे मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी अभ्यास करू लागले. पण डिप्लोमा अर्धवट टाकून मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात ते रुजू […]

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर

जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी ओळख असलेल्या कुलदीप नय्यर यांनी देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी लेखन केले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ रोजी पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला. लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण आणि नंतर तेथील लॉ कॉलेजमधून त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वकिलीचे शिक्षण घेऊन भारतात परतलेले नय्यर यांनी क्लार्क न होण्याचा निश्चय केल्यामुळे त्यांना […]

भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव

जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला. महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत […]

भारताचा खेळाडू प्रवीण अमरे

प्रवीण आम्रे हे १९९१ ते १९९४ भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीप्रमाणेच रमाकांत आचरेकरांचा शिष्य असलेल्या अमरेंची कारकीर्द फार मोठी ठरली नाही. ११ कसोटीत एका शतकासह ४२५ धावा त्यांनी केल्या. ३७ वनडे खेळताना मात्र प्रवीण अमरे यांना शतक ठोकता आले नाही. आय.पी.एल.मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून […]

बिस्मिलाह खासाहेब

त्यांचे वडील राजदरबारी सनईवादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी ते वाराणसीमध्ये आले. त्यानंतर तेथे वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यानी आपले काका ‘ अली बक्श ‘ यांच्याकडे सुरु केले. अत्यंत कठोर परिश्रम ते करत असत याचा आपण सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही. […]

लेखक ना.सी. फडके

ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. […]

बालकवी ठोंबरे

बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. […]

महान दिग्दर्शक सर आल्फ्रेड हिचकॉक

थ्रिलर चित्रपटांच्या दुनियेत हिचकॉकचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यानं नामवंत कलाकार चित्रपटात वापरले तसंच कित्येक अज्ञात कलाकारांना नामवंत केलं, अनेक वेचक आणि प्रसिद्ध स्थळं चित्रीकरणासाठी वापरली आणि कॅमेरा हवा तसा फिरवला. […]

1 134 135 136 137 138 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..