गणेशाची लोकप्रियता चराचर व्यापली असून त्याच्या मूर्तीत अनेक लोभस रूपं दिसतात. लंबोदर, सुपासारखे कान असलेला, भक्तांवर दया करणारा, प्रकृतीपुरूषांच्या पलीकडचा असा हा गणेश सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे. पृथ्वीतलावरील त्याचे आगमन जल्लोषात पण जबाबदारीने साजरे करायला हवे. आजच्या असुरक्षित सामाजिक वातावरणात तर जल्लोषाला जबाबदारीचे भान असण्याची नितांत गरज आहे. […]
बुद्धीची देवता असलेल्या गणपतीला पूजेमध्ये अग्रक्रम दिला जातो. तो सुखकर्ता, दु:खहर्ता आणि विघ्नविनाशक आहे. सुखकर्ता म्हणजे रचनाकार, दु:खहर्ता म्हणजे सुव्यवस्थाकार आणि विघ्नविनाशक म्हणजे प्रणाली निर्माण करणारा. गणपतीचा हा मूळ अर्थच आज विस्मृतीत गेला आहे. त्यामुळे कुठेही आराखडा, सुव्यवस्था आणि प्रणाली दिसत नाही आणि आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते. […]
सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे. […]
सध्याच्या खासगीकरणाच्या जमान्यात सरकारचे कोणत्या क्षेत्रावर नियंत्रण असावे अथवा नाही असा प्रश्न उद्भवत असतो. खासगी शिक्षण संस्थांबाबत असा प्रश्न वारंवार निर्माण होत होता. या संदर्भात सरकारला खासगी शिक्षण संस्थांकडून आकारल्या जाणार्या शुल्कावर तसेच देणग्यांवर नियंत्रण ठेवता येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यामुळे आता खासगी शिक्षणक्षेत्र खर्या अर्थाने मुक्त होणार आहे. […]
श्री गणेशाचा जन्म म्हणजे दुराचारांचा अंत, ह्याचा जन्म म्हणजे नवयुगाची प्रभात, याचा जन्म म्हणजे अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाचे किरण. तो जन्म ज्या तिथीला झाला ती ही आजची तिथी. मग ती उत्साहात न्हाऊन निघाली तर काय आश्चर्य ? […]
प्रतिजैविकांना दाद न देणारा सुपरबग प्रकटल्याने अवघे वैद्यकीय विश्व चिताक्रांत बनले आहे. पाश्चात्यांनी सुपरबगच्या निर्मितीसाठी सोयीस्करपणे भारताला जबाबदार धरले असले तरी त्यात तथ्य नाही. सुपरबगची निर्मिती पाश्चात्य राष्ट्रांमध्येच झाली असावी. असे असले तरी वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून सुपरबगवर परिणामकरक प्रतिजैविक शोधण्याची जबाबदारी भारतावरही आहे. […]
अथर्वशीर्ष हा उपनिषद् मंत्र असल्याने त्याच्या सुरवातीला व शेवटी शांती मंत्र आहे. अथर्वण ऋषी प्रारंभी मंगलाचरण करण्याच्या हेतूने ॐ हा मंगलमय शब्द उच्चारतात. त्यानंतर त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. तत्वमसि हा शब्द खूप महत्वाचा आहे. अखिल चराचर व्यापून टाकणारे ब्रह्मस्वरूप तत्व. तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहे असे ते म्हणतात. तूच सृष्टीचा निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि संहारकर्ता तसेच सकलव्यापक ब्रह्म आहेस. […]