अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्री रामरक्षा

पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे. संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . […]

मारुति स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥ महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी (शोकहर्ता) (धूर्त) दूत वैष्णव गायका ॥२॥ दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥ ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥ […]

भिक्षापात्र

राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता. जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती. प्रसंगच तसा होता. त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला होता. राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला. काय हवं ते माग. मिळेल. भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे. पण, वचन […]

निसर्गाची ध्यान प्रक्रिया

खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही […]

समर्थ रामदास स्वामी – भाग १०

सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो […]

देवपूजेतील साधन – फुले

देवाच्या मुर्तीत प्राणप्रतिष्ठेच्या रुपाने मंत्रशक्तीचा वास असतो. यासाठी देवाच्या मस्तकावर वासाची फुले वाहिली जातात. मंत्रशक्तीचे उत्सर्जन त्या फुलांतून होत असते. देवांना फुले अतिशय प्रिय असतात. गणेशाला तांबडे फूल, शिवाला पांढरे फुल, विष्णूला पिवळे फूल आणि ब्रम्हाला कमळाचे फूल वाहण्याचा प्रघात आहे. फुलांचे हार करुन ते देवांच्या तसेच संत, महंत व विद्वानांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या गळ्यात घातले […]

देवपूजेतील साधन – अक्षता

सर्व धान्यामध्ये तांदुळाला महत्त्वाचे स्थान असून तांदुळापासून केलेला भात हे उदर भरणाचे साधन आहे. क्षत म्हणजे भोक पडणे. ज्या धान्याला भोक पडत नाही ते धान्य म्हणजे तांदूळ असून त्याला अक्षता म्हटले जाते. पूजेच्यावेळी देवांवर आणि लग्नप्रसंगी वधूवरांवर कुंकूमिश्रित अक्षता टाकल्या जातात. याचे कारण असे की देवाने आपल्यावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा त्यामागील […]

देवपूजेतील साधन – पानसुपारी

देवपूजेचे वेळी देवापुढे नागवेलीची पाने व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न, मुंज आदी मंगलकार्यप्रसंगी देखील अतिथींना पान सुपारी देण्याची प्रथा आहे. नागवेलीच्या पानांना विड्याची पाने व पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात. देठासहित असलेले विड्याचे पान आपल्या हृदयाचे प्रतीक म्हणून समजले जाते. हे पान हिरवेगार असून मनाला अल्हाद देणारे असते. विड्याच्या पानाला त्यात सुपारी व कात […]

देवपूजेतील साधन – ताम्हण

देवपूजा करण्यापूर्वी देवांना स्नान घालण्यासाठी तांबे किंवा पितळेचे जे पसरट भांडे वापरले जाते त्याला ताम्हण असे म्हणतात. ताम्हणाचा आकार गोल असल्यामुळे ते पृथ्वीचे प्रतीक समजले जाते. संध्येसाठी देखील ताम्हणाचा उपयोग केला जातो. कारण संध्या ही सुर्याची उपासना असून जी आचमने केली जातात त्याध्ये दैवी शक्ती निर्माण झालेली असते. ताम्हणात पडलेले शक्तिशाली जल पायदळी तुडवले जाऊ नये […]

देवपूजेतील साधन – तीर्थ प्रसाद

देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर साखरफुटाणे, पेढे, खोबरे, फळे आदी पदार्थ भाविकांना वाटले जातात. त्याला देवाचा प्रसाद अशी संज्ञा आहे. प्र म्हणजे पुढे, साद म्हणजे हाक मारणे. प्रसाद ग्रहणामागे देवाला `आमचे जीवन पुढे ने’ अशी सुप्तपणे मारलेली हाक असते. या प्रसादामध्ये देवाची कृपादृष्टी असल्यामुळे तो श्रध्देने खाल्ला असता समाधान प्राप्त होते. देवाला पंचामृताचे स्नान घातल्यानंतर ताम्हणात जे पंचामृताचे […]

1 42 43 44 45 46 57