समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो. ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे. ती खालीलप्रमाणे आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥ रत्नखचित […]
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा […]
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, […]
भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस जेष्ठागौरी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती जेष्ठागौरीविषयी उपलब्ध आहे. जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठागौरी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी […]
संत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्या आहेत. रविदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. […]
सुखी माणसाचा सदरा मिळणे म्हणजे परीस मिळण्यासारखंच असतं..सुखी माणसाचा सदरा ही एक सुंदर कल्पना असल्याचे सर्वांनीच मान्य केले असले तरी त्या सदऱ्याचा शोध सुरूच असतो, निरंतर सुरुच राहाणार.. या सदऱ्याची कल्पना बहुतकरून मराठी जनांमधेच आहे की अन्य समाजातही आहे याची मला माहिती नाही परंतू तशी ती नसल्यास सुखासाठी अन्य काहीतरी परिधान करावं असं वाटण्यासारखं त्यांच्यातही असणारच.. […]
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द पंचमीस स्त्रिया हे व्रत करतात . आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सत्विकतेला , त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे . त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी हे व्रत अंगीकारून वैदिक , तत्वज्ञान , वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृती ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञान निष्ठांना , […]
खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन मंत्रपुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती पुढीलप्रमाणे : (या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ […]
“रेझोनांस” म्हणजे काय ….? आणि त्याची शक्ती काय आहे मित्रानो सोशल मिडीयावर एप्रील मे मध्ये एक मेसेज खुप व्हायरल झाला होता सर्वानी एक प्रार्थना करा किंवा आशी चर्चा करा यांदा खुप पाऊस पडनार आहे व त्या पद्धतीचे मेसेज फाँरवर्ड करा त्या मागचा वैदिक विचार एव्हढाच होता की पोझिटिव्ह एनर्जी तयार होऊन पावसासाठी पोझिटिव्ह वातावरण तयार होईल […]
जीवनात मन:स्वास्थ्य मिळणे फारच आवश्यक आहे. मन:स्वास्थ्य बिघडले तर जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. मन:स्वास्थ्य बिघडले की जीवनात असंख्य समस्या निर्माण होतात. याच्या उलट मन:स्वास्थ्य असेल तर माणसांना समाधानी जीवन प्राप्त होते. मन:स्वास्थ्य आपोआप निर्माण होत नाही किंवा मिळत नाही. भरपूर पैसा मिळविला किंवा मिळाला म्हणजे मन:स्वास्थ्य मिळेल असा बहूसंख्य लोकांचा भ्रम असतो. उलट पैसा अधिक […]