नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

साखरशाळांचे भवितव्य टांगणीला

विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्‍या साखरशाळा बंद करुन त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय चांगला असला तरी अंमलबजावणीतील गोंधळामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
[…]

भ्रष्टाचार मुळां पासून काढायचा ?……खरें तर “गुप्त स्वहित” प्रथम ओळखलें पाहिजे.

भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल.
[…]

हे सत्तांतर काय सांगते ?

एक चव्हाण गेले आणि दुसरे चव्हाण आले. राज्याच्या राजकारणात किंवा समाजकारणात त्यामुळे काय स्थित्यंतर येईल? पृथ्वीराज चव्हाण राज्याची धुरा व्यवस्थित सांभाळू शकतील का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी उफाळून आली असून छगनराव भुजबळ यांचा काटा पक्षातील मराठा लॉबीने काढल्याने अंतर्गत धुसफूस वाढेल का ? ही स्थित्यंतरे काय दर्शवतात?
[…]

‘आदर्श’ हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुजबूज संपली आणि अशोक चव्हाण पायउतार झाले. त्यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसने काही संकेत दिले असले तरी प्रश्न कायम आहेत. एखाद्याने गैरव्यवहार केला की हकालपट्टी होते पण भ्रष्टाचारही पचवला जातो असे चित्र उभे रहात आहे. कलमाडींबाबतही नेमके हेच घडले आहे. ताज्या बदलामुळे जनतेला क्षणभर बरे वाटेलही पण समाजाभिमुख राजकारणापासून आपण आजही कोसो दूर आहोत.
[…]

ओबामांची मुत्सद्दी भारतभेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीदरम्यान काय भूमिका घेतील याबद्दल सर्वांनाच कुतुहल होते. या दौर्‍यात ओबामा यांनी भारताभिमुख भूमिका घेतली तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा देऊन त्यांनी खूष केले; परंतु जाता-जाता भारताने इराणच्या अणुकार्यक्रमाला तसेच म्यानमारमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीला विरोध करावा असे सुचवून स्वत:चे हित साधले.
[…]

चव्हाणांचे भवितव्य अधांतरीच

मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले. त्यामळे पुढे काय होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. पण एकूण राजकीय घडामोडी लक्षात घेता चव्हाणांची गच्छंती लांबणीवर पडल्याचे दिसते. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशीसाठी लागणारा वेळ आणि ओबामांचा मुंबई दौरा लक्षात घेऊन चव्हाणांना तूर्तास मुदतवाढ मिळाली आहे. […]

अतिरेका बाबत गोंधळाची स्थिती

आपल्या भारत देशाला सर्वात जास्त जर, कुणी डिवचले असेल तर ते फक्त अतिरेकी कारवायांनी ! मग ह्या कारवाया दहशतवाद्यांचा असोत की नक्षलवाद्यांच्या भारताचे यामुळे फार मोठे नुकसानच झालेले आहे. भारताचे नुकसान अंतर्गत कलहाने जेवढे झाले नाही. तेवढे या कारवायांमुळे झालेले आहे.
[…]

गॉडफादरच्या शोधात…

सध्या राज्याच्या राजकारणात गॉडफादरची चर्चा रंगली आहे. चित्रसृष्टीत गॉडफादर असल्याशिवाय काम होत नाही हे माहीत होते पण, राजकारणात ही त्रुटी तीव’तेने जाणवत असेल असे वाटले नव्हते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ही गरज नुकतीच बोलून दाखवली आणि राज्याची राजकीय पृष्ठभूमी चांगलीच थरथरली.
[…]

राजकारणाचे मोदीकरण !

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पाच महापालिकांमध्ये भाजपला दोन तृतियांश मिळाले तर एका महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात 80 टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना 20 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. भाजपच्या या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जात असून गुजरातमध्ये राजकारणाचेच मोदीकरण झाल्याचे पहायला मिळत आहे.
[…]

निर्णयात भक्ती-भावनेचा विचार

बहुचर्चित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाचा निकाल अखेर लागला आणि अख्ख्या देशातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने या निर्णयाचे सर्व स्तरांमध्ये शांततेने स्वागत झाले. या निर्णयात न्यायालयाने भक्ती आणि भावनांचा अधिक विचार केल्यासारखे वाटते. तसेच वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होते असे सांगण्यापेक्षा रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला असे सांगणे संयुक्तिक वाटत नाही.
[…]

1 36 37 38 39 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..