नवीन लेखन...

व्याकुळल्या भावनांना काव्याचा

व्याकुळल्या भावनांना काव्याचा मोहर हलकेच अंतरी फुलला तो बहर अवचित गंधित तुझा अन जीव माझा धुंद झाला.. ती सांज ओढ कातर क्षणाची जीव तुझ्यात नकळत धुंदावला आरक्त लोचनात थेंब अश्रूचा अलगद दुःख मिटवून गेला.. का बहरल्या दग्ध चेतना प्राजक्त हलकेच होरपळला न फुलल्या कळ्या काही वेदना मनात अबोल उरल्या.. काव्यांचे प्रेम शब्दांवर सजले काव्यांत जीव आल्हाद […]

तो बिनधास होता

तो बिनधास होता त्याला ती आवडायची का प्रश्न त्या वयात विचारू नये असे म्हणतात तो तिच्यावरून आम्हा मित्रांना जाम पकवयाचा एक दिवशी त्याला आम्ही हरभर्याच्या झाडवर चढवला तो तिला विचारायला गेला I m interested in you.. तिने उत्तर दिले No thanks.. तो thank you म्हणत माघारी आला… पुढे त्याने सांधा बदलला तिने पण….. पण आम्ही नाही […]

शारीरिक जखम बरी होते

शारीरिक जखम बरी होते पण मनाचं दुखणं गहिर असतं भावना खेळणं सहज होतं पण मनाचं तुटण जिव्हारी घडतं.. मनातल सगळंच बोलता आलं असत तर मोकळं आभाळ भरलं नसतं सगळंच जर हृदयातलं कळलं असतं तर मनालाही रडावं वाटलं नसतं.. भावनेत ओलं हळवं होणं सहज अलवार होत असतं मनाच्या तारा छेडल्या हलकेच तर दुःख सहज मोकळं होतं.. कुणी […]

कधीतरी , कुठेतरी , केव्हाही

कधीतरी , कुठेतरी , केव्हाही दिसतात प्रेमाचे रंग.. म्हणून नाक मुरडणारे खुप दिसतात , म्हणे काही काल-वेळ आहे का, ही आपली संस्कृती आहे का, पण त्याला आणि तिला काहीच सोयर सुतक नसते… तो आणि ती मस्तपणे आपल्या विश्वात असतात, आणि संस्कृती आणि इतर काटे त्यांना कधीच बोचत नसतात परंतु इतर मात्र तडफडत असतात संस्कृती आणि वगैरे […]

माणसांची अलोट गर्दी

माणसांची अलोट गर्दी अनोळख्या ओळखी, आयुष्याच्या पटावरी भेटतील माणसं वेगवेगळी.. कोण कुठे कसा राहतो दूर दूर असतील घरटी, बंध जुळतात जेव्हा ओळख होईल तेव्हा थोडी.. कुठे जास्त कुठे कमी माणसं आयुष्यात येती, नियतीचे सूत्र सारे अनामिक कुणी जवळ कुणी दूर जाती.. आयुष्याच्या पटावरी जमा खर्च आलेख होई, प्रारब्ध न चुके कुणाला कोण कधी जीवनात येई.. जीवन […]

आधी त्याचे जग

आधी त्याचे जग आणि तिचे जग एकच होते, नंतर मात्र संसारात हे जग कधी विभागले हे दोघांनाही कळले नाही थोडा दुरावा झाला परंतु चांगलेच झाले एकमेकांचे ‘ प्रेम ‘ मार्गी लागले खऱ्या प्रेमांत असेच असते…आधी ते अव्यक्त असते.. मग ते व्यक्त होते आणि मग परत अव्यक्ततेकडे प्रवास सुरु होतो काही समजले का लेको…. — सतीश चाफेकर.

होते पहाट आल्हाद गारवा

होते पहाट आल्हाद गारवा झेडीतो हलकेच शिरशिरी मारवा, प्राजक्त उमलतो हलकेच असा अंगणी बहरुन गंधित सडा.. उगवतो रवी केशरी प्रभा रंग बावरे किरमिजी आभा, उगवत्या रवीस उषेची साथ जरा दवबिंदूची दाटी पानोपानी थेंब सजता.. किलबिल पक्षी थवा आकाशी जसा माळ एका लयीत फिरफिरती पाखरे पुन्हा, सजले आकाश सजली नटून धरा थबकले मन परतुनी वळणावर पुन्हा या.. […]

कधी कधी दूरवरून चांगले दिसते

कधी कधी दूरवरून चांगले दिसते असे म्हणतात …पण प्रेमात मात्र कधीकधी तसे नसते, दूरचे जेव्हा जवळ येते तेव्हा खूपच चागले भासते.. आत्ता भासणे आणि असणे यातील फरक ज्याचा त्यानेच शोधायचा असतो…. पण शक्यतो शोध घेण्याच्या फंदात पडू नये कारण… हा शोध पुढे अपघात ठरू शकतो… — सतीश चाफेकर.

तुला जमलं नाही सहज

तुला जमलं नाही सहज नाजूक भावनांना फुलवणे जमलं फक्त तुला सहज रागाने अवचित मला बोलणे.. मिठीतल्या गोड भावना तुला कळल्या नाही रागाच्या बोलण्यावर तुला दुसरं काही दिसलं नाही.. तुला सोडवता आला नाही मधुर नाजूक मनाचा गुंता मला मात्र मिळाला अलगद वेदनेचा काटेरी ओला कोपरा.. हवे तेव्हा मी समीप हवे तेव्हा लांब तुला सगळं सहज सार हे […]

तुझ्या मिठीत सख्या

तुझ्या मिठीत सख्या मी बेधुंद जराशी व्हावी स्पंदने हलकेच अधरी अंतरात उलघाल व्हावी घेशील मज तू कवेत जेव्हा चांदण सडा अंगणी बरसला लाजेल मी अलगद गाली तेव्हा तू ही सख्या हलकेच मोहरला स्पर्शीले तन आल्हाद तू बहरल्या रोमांचित खुणा ओठ ओठांनी टिपले तू साखर चुंबनाचा गुलाबी गोडवा अलवार मिठीत तुझ्या वेढून घे अलगद तू मजला स्पर्श […]

1 76 77 78 79 80 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..