नवीन लेखन...

जीवन म्हणती याला

त्याची ऐकूनी करूण कहाणी,  डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी,  निराश झाले मन  ।।१।। आघात होता त्याच्या जीवनी,  तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी,  उमजेना काही ।।२।। दु:ख दुजाचे समोर आले,  मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले,  अदृष्य हे धागे ।।३।। मानव धर्म एक बिजाचा,  वाढत गेला गुंता त्याचा ओढत […]

समत्व बुद्धी

एका टोंकावरती जातां,  शांत न राही झोका तेथें, विलंब न करता क्षणाचा,  जाई दुजा टोका वरती ।।१।। जीवनांतील झोके देखील,  असेच सदैव फिरताती, बऱ्या वाईटातील अंतर,  नेहमी चालत असती ।।२।। समाधान ते मिळत नसे,  जेव्हां बघता तुम्हीं भोग, त्यांत देखील निराशा येते,  मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।। जवळपणाच्या नात्यामध्यें   दुरत्वाचे अंकूर फूटते, दूर असता कुणी तरी, […]

ज्ञान साठा

जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची ।।१।। प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।। एक किरण तो पूरे जाहला, अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फुलून येते ज्ञान वाहण्या…..||३|| डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

ईश्वरी इच्छेनेच

वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन  । घटना घडल्या जीवनामध्यें,  राही त्यांची आठवण  ।। चालत असतां पाऊल वाट,  जीवन रेषे वरची  । स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा,  भावी आयुष्याची  ।। परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें,  पुरता गुरफटलो  । फिरणाऱ्या त्या  वर्तुळातूनी,  बाहेर येवूं न शकलो  ।। कल्पिले होते नियतीनें,  तेच घडविले तिनें  । भंग पावले स्वप्नचि सारे,  तिच्याच लहरीनें  ।। […]

रिक्त प्रेमाचा घट

रिक्त प्रेमाचा घट रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  // भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट ईच्छा उरली नसे मनी […]

निरागस जीवन

प्रफुल्लित भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या  आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या  दिवसा विषयी,  अजाण होता […]

श्रीहनुमंतापाशी मागणे 

मारुतिराया या देहातच दर्शन देई रे श्वासोच्छ्वासी सहवासाचा अनुभव देई रे ।। ध्रु ।। प्रभातकाली रामनाम तू उच्चारून घेई पवनासंगे मनास अमुच्या जोडुन तू देई नीलगगनि तो राम सावळा दाखव दाखव रे ।।१।। उद्योगी उत्साह तूच रे प्रयत्नात शक्ती रघुनाथाची भक्ति तूच रे योजनेत युक्ती नित्याची ती कर्मे घडता रामा भेटव रे ।।२।। धरतीवरती पदे पडावी चलता ठेक्यात […]

सुखाचे मृगजळ

धांवत असे मन आमचे,  शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ,  फसवित राही सर्वाला…१ मृगजळाचे  धावूनी पाठी,  निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी,  सुखासाठी तडफडत असे…२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी,  सुख नसूनी दुःखची भासे…३, खरे सुख कशांत बघतां,  तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां  […]

सूड वलय

उत्साहाने आला होता,  मुंबई बघण्याकरिता, रम्य स्थळांना भेट देणे,  ही योजना मनी आखता ।।१।। मान्य नव्हती त्याची योजना,  नियतीच्या चाकोरीला, पाकीट पळवूनी त्याचे,  घाला कुणीतरी घातला ।।२।। धन जाता हाता मधले,  योजना ती बारगळली, अवचित त्या घटनेने,  निराशा तेथे पसरली ।।३।। जात असता सरळ मार्गी,  दुष्टपणाला बळी गेला, समाजाला धडा शिकवण्या,  सूडाने तो पेटून गेला ।।४।। […]

पूर्णेच्या परिसरांत !

जेंव्हा ठरले गावी जाणे,हूर हूर होती  मनी बराच काळ गेला होता,आयुष्यातील निघुनी काय तेथे असेल आता,सारे गेले बदलूनी काळाच्या प्रवाहामध्ये,राहिलं कसे टिकूनी चकित झालो बघुनी,सारे जेथल्या तेथे उणीवता न जाणली,क्षणभर देखील मानते बालपणातील सवंगडी,जमली अवती भवती गतकाळातील आनंदी क्षण,पुनरपि उजळती आंबे चिंचा पाडीत होतो,झाडावरती चढुनी आज मिळाला तोच आनंद,झाडा खालती बसूनी मळ्यामधली मजा लुटली,नाचूनी गाऊनी विहिरीमधल्या पाण्यात,मनसोक्त ते डुबूनी ऐकल्या होत्या कथा परींच्या,तन्मयतेने बसूनी आज सांगे त्याच कथा मी,काका मुलांचे बनुनी वाडा सांगे इतिहास सारा,पूर्वज जगले कसे भव्य खिंडारी उमटले होते,कर्तृत्वाचे ठसे बापू, आबा, मामा, काका,मामी वाहिनी जमती कमी न पडली तसूभरही,प्रेमामधली नाती मीही बदललो, गांवहीं बदलले,काळाच्या ओघांत आनंद मात्र तो तसाच होता पूर्णेच्या परिसरांत — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 316 317 318 319 320 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..