आशाताईंच्या सहा दशकांच्या महान कारकिर्दीकडे नुसती नजर टाकायची म्हटलं तरी थक्क व्हायला होतं. एक हजारांपेक्षाही जास्त हिंदी चित्रपटांतून त्यांनी बारा हजारांपेक्षाही जास्त गाणी गायलेली आहेत. शिवाय इतर अनेक भाषांतली गाणी वेगळीच. मग चित्रपटेतर गायन गजला, पॉप म्युझिक, मराठी नाट्य संगीत, भावगीते, बालगीते, भक्तिगीतं, अभंग वगैरे वगेरे वगैरे… चतुरस्र हा शब्दही कमी पडावा अशी कामगिरी त्यांनी केली आहे. […]
आज आपल्या देशात भ्रष्टाचार माजलेला आहे. राज्यकर्ते पैश्यामागे धावताना दिसत आहे. प्रजेला न्याय मिळत नाही. त्या मुळे देशात अराजकता माजते आहे. प्रजा संभ्रमात आहे की कुणास वोट द्यावे, प्रत्येक झाडावर कावळाच बसलेला आहे. पण आजही न्याय पथावर चालणारे लोक आहेत. न्यायाचा बाजूनी लढनार्यास समर्थन देण ही काळाची गरज आहे. लहानपणी ऐकलेली विक्रमादित्याची कहाणी आठवली. आज आपल्याला विक्रमादित्या सारखा राजा पाहिजे…….. […]
सदोबांच प्रामाणिक मत होते – रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले. एके दिवशी सदोबांच्या छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित चित्रगुप्तालाही रिश्वत जुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. ???? […]
स्व.पं.पन्नालाल घोष यांचा जन्म बंगाल मधील बारिसाल गावात ३१ जुलै १९११ साली झाला. त्यांचे व वडिलउत्तम सितार वादक होते. स्व.पं.पन्नालाल घोषजींनी त्यांच्या वडिलांकडून सतार वादनाचे शिक्षण घेतले. […]
स्व.पं.विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६०रोजी कृष्ण जन्माष्टमी मुंबईच्या वाळकेश्र्वर येथे झाला. त्यांना लहानपणा पासूनच गायनाचे अंग होते. १० १२ वर्षाचे असताना त्यांना बासरी बाजवीण्याचा छंद जडला. मराठी शाळेतील शिक्षण संपवून मुंबईच्या एल्फिंन्स्टन स्कूल मध्ये इंग्रजीचे शिक्षण घेण्यास सुरवात केली. कॉलेज जिवनात पंडितजींना सतार वाजविण्याचे वेड जडले. […]
रामरावजी एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र सैनिक आपल्याच विचारात गढलेले चालत जात होतें. त्याच वेळी त्यांचे मित्र माधवराव पण सकाळच्या जॉगिंग साठी निघाले. त्यानां रामरावजी आपल्याच तंद्रीत उदग्विन्न मनस्थितीत कोणा कडे लक्ष न देतां चालताना दिसले. माधवरावनी त्यानां बऱ्याच हाका मारल्या पण त्यांचे लक्षच नव्हते . […]
कुठलाही सोहळा मग तो लग्न असो की आणि काही, साजरा करतांना सगळ्याच गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. माझ्याकडे चिक्कार पैसा आहे म्हणजे मी तो कसाही खर्च करीन असे शक्यतो होऊ नये. शेवटी ज्याची त्याची विचारसरणी आहे. कोणावर कुठलीही गोष्ट लादू नयेत या विचारसरणीचा मी आहे. परंतू जी व्यक्ती कष्टाने पैसा कमावते, पैश्याची किंमत काय आहे ते जाणते, ती असा अमर्याद खर्च करणार नाही असे वाटते. पैसा कुठे, कधी, केव्हा व कोणावर खर्च करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तीक प्रश्न आहे. […]