नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग १९

” काय? तू -तू तो खून केलास?” राघव अविश्वासाने समोर बसलेल्या रुद्राकडे पहात म्हणाला. “हो! माझ्याच हातून तो खून झालाय!” “कसा?” त्या नन्तर रुद्रा तासभर बोलत होता. त्या रात्री कसे घरामागच्या झाडाच्या आधारे कंपाउंड वॉल पार केली, कसे घरात घुसलो, कसे डाव्याहाताच्या चिमटीत नाक आणि तोंडावर पंकजा आवळून संतुकरावचा जीव घेतला, आणि मग कसे पसार झालो. सगळे […]

रुद्रा – कादंबरी – भाग १८

रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. रात्रभर खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेलतर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! […]

रुद्रा – कादंबरी – भाग १७

मनोहरच्या घरात राघवला काहीच क्लू लागला नव्हता. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या सोबत त्याचा मोबाईलही चाकाखाली चिरडला गेला होता. त्या मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीत खुन्याच्या पाऊल खुणा असण्याची शक्यता होती. खरेतर खून झाल्या दिवशी राघव ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आजही होता. प्रगती म्हणावी तर शून्य! […]

रुद्रा – कादंबरी – भाग १६

अनपेक्षितपणे तो बुटका टकलू ढाब्यातून वेगाने धावत हायवे कडे पळत होता, त्याच्या मागे राघव होता. क्षणात त्या बुटक्याला चिरडून तो राक्षसी ट्रक निघून गेला होता. रुद्राला हे नाट्य तो उभा होता तेथून दिसत होते. मेंदूने या सर्वांचा अर्थ लावेपर्यंत काहीवेळ तो एका जागी स्तब्ध उभा राहिला. या अपघातून तो बुटका वाचणे शक्यच नव्हते. […]

रुद्रा – कादंबरी – भाग १५

राघवला जेम तेम तीन तासाची झोप मिळाली होती. तो सकाळी आठच्या सुमारास तयार झाला होता. आज बरीच कामे होती. त्याने मोबाईल ऑन केला. जाधवकाकाचे दोन मिस्ड कॉल दिसत होते. तसाही तो त्यांना फोन करणारच होता. “हॅलो,जाधवकाका तुमचे दोन मिस्ड कॉल दिसतायत!” “सर, सकाळीच शकीलशी बोलणे झाले. काल रात्री तुम्ही धम्माल केलीत म्हणे. ” “धम्माल कसली काका? […]

रुद्रा – कादंबरी – भाग १४

मनोहर ‘पंजाब ढाब्या’च्या मागच्या लॉनवर आला, तेव्हा जसवंत अधीरतेने एका कोपऱ्यातल्या टेबल जवळ  उभा असलेला दिसला. मनोहरने आसपासचे निरीक्षण केले. लॉनवर फारशी गर्दी नव्हती. बहुतेक सुटे सुटे टेबल होते. जसवंतच्या टेबलच्या आसपास कोणी नव्हते. दूर एक मुसलमान आपल्या मुलासोबत काहीतरी खाण्यात दंग होता. मनोहर निश्चित मनाने जसवंतच्या टेबलवर जाऊन समोर बसला. “जसवंत, राघवला तुझा संशय आला […]

रुद्रा – कादंबरी – भाग १३

‘आनंद टी सेंटर’ सारखा चहा, जगाच्या पाठीवर कोठेच मिळत नाही असे जसवंतचे व्यक्तिगत मत होते. पुडी लावून झाली ली तो हळूच येथे यायचा. आणि एक ‘कडक मिठ्ठी’ चहा ढोसायचा! गंजावर गोड खाल्लेकि माणूस लवकर हवेत तरंगतो, हे त्या मागचे छुपे तत्व होते. इतरांच्या चहात दीड चमच्या साखर टाकणारा भट्टिवाल कार्ट जसवंतच्या चहात तीन चमचे टाकत असे. नेहमीच्या गिऱ्हाईकाच्या […]

रुद्रा – कादंबरी – भाग १२

कालच्या ‘राजयोग’ डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण नजरे समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते. […]

रुद्रा – कादंबरी – भाग ११

संतुकराव आणि जसवंत बोलत असताना मनोहर गेट बाहेर पडला. त्याने फोन काढला आणि रुद्राचा नम्बर लावला. “म्हातारा आऊट हाऊस मध्ये आहे!”एकच वाक्य बोलून त्याने फोन कट केला! रूद्रा तयारीतच होता. तो ‘नक्षत्र’च्या रोखाने निघाला! […]

रुद्रा – कादंबरी – भाग १०

मनोहरने हात डोक्याच्यावर ताणून मोठा आळस दिला. आपला हरामखोर बाप कुबेर आहे आणि त्याचा काटा परस्पर काढायचाय हे त्याने जेव्हा नक्की केले,तेव्हा त्याचा घरातील बित्तंबातमी हाती असणे आणि ती पुरवणारी व्यक्ती हुडकणे गरजेचे होते. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..