नवीन लेखन...

माझी कथा – भाग ३

पुढे मी त्या कारखान्यातील कामाकडे लक्ष केंद्रित केले आणि एका एका यंत्रावर स्वार झालो. या दरम्यान मला वाचनाची गोडी लागली कारण जाधव आणि जावळे रोज कारखान्यात येताना वर्तमानपत्र आणत आणि मी ही त्यावेळी आमच्या बसमध्ये वर्तमान पत्र वाचणारा मी एकटाच होतो. […]

माझी कथा – भाग २

आमची आई आमच्या शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही होती म्हणूनच तिने आमच्यासाठी गुरुकुल विद्यालय या खाजगी शाळेत प्रवेश घेतला होता तिला काय माहीत पुढे जाऊन नियतीचे फासे कसे उलटे पडणार होते. […]

माझी कथा – भाग १

धो धो पाऊस कोसळत होता विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत होता विजांच्या प्रकाशात काही झोपड्या रात्रीच्या अंधारातही उजळून निघत होत्या. […]

क्याप – हिंदी कादंबरी

क्याप कादंबरी ही एका कम्यूनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालेल्या हिमालयातील वाल्मीकीनगर जिल्हयातील  अस्पृश्य डुम जातीतील साधारण माणसाची आहे.  कस्तुरीकोट या काल्पनिक संस्थानातील हा एक  उत्तराचंलातील  प्रदेश आहे.  उत्तर आधुनिकतेतील  मिडियाग्रस्त ढोंगी समाजाची  त्यांनी  खिल्ली उडवली आहे. […]

रुद्रा – कादंबरी – भाग २५

आज साडेदहा पासूनच कोर्ट प्रेक्षकांनी भरले होते. कारण आज रुद्राचा बचावासाठी युक्तिवाद होणार होता. खुनाचा भक्कम पुरावा विरोधात असून हि, ‘मी खून केलाच नाही!’ या विधानावर रुद्रा ठाम होता! डॉ. रेड्डीच्या उलटतपासणी नंतर अडोव्हकेट दीक्षितही गांगरल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटले नव्हते. एकीकडे करोडोची संपत्ती आणि एकीकडे फाशीचा दोर! मोठी विचित्र केस होती आणि ती शेवटच्या टप्प्यावर होती. दैनिकाचे रिपोर्टर्स, चॅनलचे प्रतिनिधी यांचा प्रेक्षकात भरणा अधिक होता. […]

रुद्रा – कादंबरी – भाग २४

संपूर्ण पुरावे आणि प्रत्यक्ष खून करतानाच व्हिडीओ असून सुद्धा रुद्रा फाशीवर जाईल याची खात्री दीक्षितांना वाटेना! विशेषतः डॉ. रेड्डीच्या साक्षीने त्यांना काळजीत टाकले होते. तरी ते आज शेवटचा प्रयत्न करणार होते.  […]

रुद्रा – कादंबरी – भाग २३

उंचेपुरे, कृश प्रकृतीचे प्राध्यापक डॉ. जोगदंडाच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्यांनी विरळ होत जाणारे डोक्यावरचे पांढरे केस मागे वाळवून व्यवस्थित विंचरले होते, ते त्यांच्या रुबाबदारपणात भरच घालत होते. सैलसर कोट-पॅन्ट आणि पांढराशुभ्र शर्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होती. […]

रुद्रा – कादंबरी – भाग २२

आज पासून रुद्राचे साक्षीदार साक्ष देणार होते. खून करतानाची व्हिडीओ असूनही रुद्राने खुनाचा आरोप धुडकावून लावला होता! कशाच्या जोरावर? हाच प्रश्न दीक्षितांना आणि प्रेक्षकांना पडला होता. म्हणून आजही न्यायालयाचा तो कक्ष भरगच्च भरला होता. रुद्रा काय दिवे लावणार? हीच भावना दीक्षितांच्या चेहऱ्यावर दिसत होती. 
कोर्टाचे कामकाज सुरु झाले.  […]

रुद्रा – कादंबरी – भाग २१

पुढील तारखेस पुरावा म्हणून दाखल केलेले  जसवंतचे घेतलेले जवाब, रुद्रास वाचून दाखवण्यात आले. राघवने हा भाग कोर्टास सांगितला. दीक्षितांनी काही जुबुबी प्रश्न जसवंतच्या संदर्भात विचारले.  “आरोपी रुद्रप्रसाद, आपणास जसवंतच्या जबानी समंधी काही विचारावयाचे असेल तर तुम्ही इन्स्पे. राघवला विचारू शकता. आपले काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा. ” रुद्राने ऑब्जेक्शन घेतले नाही.  […]

रुद्रा – कादंबरी – भाग २०

न्यायमूर्ती श्री हरिप्रसाद यांचे कोर्ट, खचाखच भरलेले होते. त्याला तसेच कारणही होते. कोट्याधीश संतुकराव सहदेव यांच्या खुनाची केस त्या दिवशी सुनावणीस असणार होती. न्याय निष्टुर जजेस मध्ये हरिप्रसादांचे नाव बरेच वरच्या बाजूस होते. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..